अहमदपूर- अहिल्यानगर मार्गावर मध्यरात्री कार समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात:कारचा चक्काचूर; तीन प्रवाशांचा मृत्यू
बीड मधील अहमदपूर – अहिल्यानगर मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास दोन कार एकमेकांना समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही कारचा चक्काचूर झाला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या वेळी अहमदपूर आणि अहिल्यानगर मार्गावर दोन कार भरधाव वेगाने समोरासमोर धडकल्या. ही धडक एवढी जोरदार होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर अवस्थेत होता. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. याबाबत वडगाव पोलिस ठाण्याचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली होती. मात्र, पोलिस प्रशासनाने तात्काळ वाहतूक सुरळीत केली. दोन्ही कारचा वेग जास्त असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. वेगावर नियंत्रण नसल्यामुळेच अपघात वेगावर नियंत्रण सुटल्याने रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज आला नाही. आणि त्यामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा अपघातीत इतका भयंकर होता की, दोन्ही गाड्यांचा पूर्णतः चक्काचूर झाला होता. यात मृतांची ओळख देखील अद्याप पटलेली नाही. या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून योग्य उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे. वेगावर नियंत्रण नसल्यामुळेच अपघात झाला आहे, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.