भाजपच्या अतुल सावेंची हॅट्रिक:औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तिसरा विजय

भाजपच्या अतुल सावेंची हॅट्रिक:औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तिसरा विजय

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार अतुल सावे विजयी झाले आहेत. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात सुरुवातीच्या मंतमोजणीच्या वेळी एमआयएमचे उमेदवार व माजी खासदार इम्तियाज जलील हे आघाडीवर होते, मात्र दुसऱ्या सत्राच्या मतमोजणीत जलील पिछाडीवर आले व अतुल सावे यांनी बाजी मारली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीचा मोठा विजय झाला आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत महायुतीने सर्वाधिक 225 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी अवघ्या 50 जागांवर आघाडीवर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या विजयावर आनंद व्यक्त करताना हा महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आजच्या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे असल्याचे स्पष्ट झाले. मोदींनी दिलेला एक है तो सेफ है चा नारा मतदारांनी यशस्वी केला. सर्वांनी एकत्रित मतदान केले. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो. त्यांनी आम्हाला मोठा आशीर्वाद दिला. विरोधकांनी राज्यात फेक नरेटिव्ह तयार केला होता. या नरेटिव्हचा यशस्वी सामना करणाऱ्या आमच्या राष्ट्रीय विचारांच्या विविध संघटनांचा हा विजय आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण याविरोधात आमच्या विविध पंथांच्या संतांनी जनजागृती केली. हा त्यांचा विजय आहे. खेड्यापाड्यात गावोगावी जाऊन पक्षासाठी घाम गाळणाऱ्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment