भाजपचे आज शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन:आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणनिती ठरणार; जे.पी.नड्डा, अमित शहा करणार मार्गदर्शन
भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन आज शिर्डीत होत आहे. अधिवेशना निमित्त शिर्डीत १ हजार व्हीआयपी येणार आहेत. मुख्य रस्त्यावर स्वागताचे शेकडो फलक, 50 कमानी, 2500 भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. केंद्रीयगृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यासपीठावर संविधानपूजन करण्यात येणार आहे. शिर्डीमध्ये पक्षाचे राज्यस्तरीयअधिवेशन प्रथमच होत आहे. या अधिवेशनाला राज्यातीलविधानसभा निवडणूकीतील महाविजयाची पार्श्वभूमी आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये पुन्हा यश मिळविण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात येणार आहे.अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील भाजपचे सर्व मंत्री शिर्डीमध्ये दाखल झाले असून, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह हे रविवारी दुपारी शिर्डीत येणार आहे. त्यांच्याप्रमुख उपस्थितीत आधिवेशनाचा समारोप होणार आहे. अगामी सर्व निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री शाह राज्यातील पक्षनेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात याची उत्सुकता राजकीय क्षेत्राला आहे. जेवणासाठी 100 बाय 200 आकाराचा शामियाना अधिवेशनासाठीआठ एकर जागेवर 132 बाय 700 आकाराचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांसाठी 15 हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. त्यात 1000 व्हीआयपी खुर्च्या आहेत.व्यासपीठ 80 बाय 40 आकाराचे आहे. व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री यांच्या आसनाची व्यवस्था केली आहे. जेवणासाठी व्हीआयपी 100 बाय 200 आकाराचा शामियाना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी एकाचवेळी 500 व्हीआयपी नेते जेवण घेऊ शकतील. 132 बाय 700 फुट आकाराच्या दुसऱ्या शामियान्यात 15 हजार पदाधिकारी जेवतील असा शामियाना आहे. अधिवेशन स्थळाला लागुनच पार्कींगसाठी 15 एकर जागेव रव्यवस्था केली आहे.