Category: marathi

तिवसा तालुक्यात सोयाबीन पिकावर रोगाचे आक्रमण:शेतकरी हवालदिल, निसर्गाच्या लहरीपणाने हिरावला गेला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

तिवसा तालुक्यात सोयाबीन पिकावर रोगाचे आक्रमण:शेतकरी हवालदिल, निसर्गाच्या लहरीपणाने हिरावला गेला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

तिवसा एकीकडे संततधार पाऊस, तर दुसरीकडे आहे त्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अशा दुहेरी संकटात सद्य:स्थितीत बळीराजा सापडला आहे. शेतकऱ्यांची पिके वाया जाऊ लागली आहेत. अशातच सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्याचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तिवसा तालुक्यातील मोझरी, शिवणगाव, शिरजगाव, धोत्रा, मार्डी येथील भागातील शेतकऱ्यांच्या शेतामधील काढणीला आलेले सोयाबीन पीक पूर्णतः पिवळे पडलेआहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याचे चित्र तिवसा तालुक्यात दिसून येत असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे . तिवसा तालुक्यात अनेकांच्या शेतात सध्या सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील शेतकरी योगेश टाले यांनी आपल्या अडीच एकर शेतात सोयाबीन पेरले होते. परंतु, ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या रोगामुळे शेतकरी योगेश टाले यांच्या अडीच एकरामधील सोयाबीन पीक पिवळे पडले आहे. परिणामी सोयाबीन पिकाला लागलेल्या शेंगा पूर्णपणे पोचट असून त्यामुळे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे पंचनामे करुन मदत द्यावी; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी ः तिवसा तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने याचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पिकावर पिवळ्या रंगाचे चट्टे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ पिवळ्या रंगाचे विखुरलेल्या अवस्थेत चट्टे दिसतात. सोयाबीनची पाने जशी वाढत जातात तस तसे त्यावर तांबूस रंगाचे चट्टे दिसू लागतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात आणि कोमजतात. या रोगामुळे उत्पादन क्षमता ३० ते ९० टक्क्यांपर्यंत घटते. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होऊन मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात. पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. काही वेळेला सोयाबीन शेंगाच लागत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा ^अडीच एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली. परंतु, अचानक आलेल्या रोगाने शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. शासनाने सर्वेक्षण करून मदत द्यावी योगेश टाले, शेतकरी गुरुकुंज, मोझरी कृषी विभागाकडून जनजागृती व उपाययोजना ^कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून पीक सर्वेक्षण प्रकल्प या अनुषंगाने टीम तयार केली . शेतातील सोयाबीन वर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कृषी विभागाकडून जनजागृती व उपाययोजना करण्यात येत आहे नीलेश राठोड, तालुका कृषी अधिकारी, तिवसा . रोगामुळे पिवळे पडलेले सोयाबीन.

​तिवसा एकीकडे संततधार पाऊस, तर दुसरीकडे आहे त्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अशा दुहेरी संकटात सद्य:स्थितीत बळीराजा सापडला आहे. शेतकऱ्यांची पिके वाया जाऊ लागली आहेत. अशातच सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्याचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तिवसा तालुक्यातील मोझरी, शिवणगाव, शिरजगाव, धोत्रा, मार्डी येथील भागातील शेतकऱ्यांच्या शेतामधील काढणीला आलेले सोयाबीन पीक पूर्णतः पिवळे पडलेआहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याचे चित्र तिवसा तालुक्यात दिसून येत असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे . तिवसा तालुक्यात अनेकांच्या शेतात सध्या सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील शेतकरी योगेश टाले यांनी आपल्या अडीच एकर शेतात सोयाबीन पेरले होते. परंतु, ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या रोगामुळे शेतकरी योगेश टाले यांच्या अडीच एकरामधील सोयाबीन पीक पिवळे पडले आहे. परिणामी सोयाबीन पिकाला लागलेल्या शेंगा पूर्णपणे पोचट असून त्यामुळे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे पंचनामे करुन मदत द्यावी; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी ः तिवसा तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने याचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पिकावर पिवळ्या रंगाचे चट्टे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ पिवळ्या रंगाचे विखुरलेल्या अवस्थेत चट्टे दिसतात. सोयाबीनची पाने जशी वाढत जातात तस तसे त्यावर तांबूस रंगाचे चट्टे दिसू लागतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात आणि कोमजतात. या रोगामुळे उत्पादन क्षमता ३० ते ९० टक्क्यांपर्यंत घटते. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होऊन मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात. पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. काही वेळेला सोयाबीन शेंगाच लागत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा ^अडीच एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली. परंतु, अचानक आलेल्या रोगाने शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. शासनाने सर्वेक्षण करून मदत द्यावी योगेश टाले, शेतकरी गुरुकुंज, मोझरी कृषी विभागाकडून जनजागृती व उपाययोजना ^कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून पीक सर्वेक्षण प्रकल्प या अनुषंगाने टीम तयार केली . शेतातील सोयाबीन वर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कृषी विभागाकडून जनजागृती व उपाययोजना करण्यात येत आहे नीलेश राठोड, तालुका कृषी अधिकारी, तिवसा . रोगामुळे पिवळे पडलेले सोयाबीन.  

अजून एक ठाकरे विधानसभेच्या रिंगणात?:अमित ठाकरे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक

अजून एक ठाकरे विधानसभेच्या रिंगणात?:अमित ठाकरे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक

मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माहीम (आमदार- सदानंद सरवणकर), भांडुप-पश्चिम (आमदार-रमेश कोरगावकर) आणि मागाठाणे (आमदार-प्रकाश सुर्वे) या तीनपैकी कोणत्याही एका जागेवरून त्यांना निवडणूक लढवायची आहे. मनसेच्या नेत्यांची राजगडवर सोमवारी बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक लढवणाऱ्या मनसे नेत्यांच्या संभाव्य नावांवरही चर्चा झाली. या वेळी अमित ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी त्यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार सदानंद सरवणकर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची सूचना केल्याची माहिती आहे.

​मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माहीम (आमदार- सदानंद सरवणकर), भांडुप-पश्चिम (आमदार-रमेश कोरगावकर) आणि मागाठाणे (आमदार-प्रकाश सुर्वे) या तीनपैकी कोणत्याही एका जागेवरून त्यांना निवडणूक लढवायची आहे. मनसेच्या नेत्यांची राजगडवर सोमवारी बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक लढवणाऱ्या मनसे नेत्यांच्या संभाव्य नावांवरही चर्चा झाली. या वेळी अमित ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी त्यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार सदानंद सरवणकर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची सूचना केल्याची माहिती आहे.  

हैदराबाद संस्थान मुक्त करणारे ‘ऑपरेशन पोलो’:निजामी सत्तेला पाच दिवसात पत्करावी लागली शरणागती; कसा राहिला अखेरचा लढा?

हैदराबाद संस्थान मुक्त करणारे ‘ऑपरेशन पोलो’:निजामी सत्तेला पाच दिवसात पत्करावी लागली शरणागती; कसा राहिला अखेरचा लढा?

भारत स्वातंत्र्यानंतर देखील हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा सुरूच होता. मात्र त्यासाठी सरकारला ‘ऑपरेशन पोलो’ राबवावे लागले. काय होते हे ‘ऑपरेशन पोलो’? निजामी सत्तेला पाच दिवसात कशी पत्करावी लागली शरणागती? कसा राहिला अखेरचा लढा? आजच्या मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने पाहुयात, या लढ्याच्या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी…. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात लढला गेलेला हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा ‘ऑपरेशन पोलो’ने संपला. मात्र या शेवटच्या टप्प्यांत अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. वास्तविक या अंतिम लढाईची सुरुवात झाली ती 16, 17 आणि 18 जून 1947 मध्ये झालेल्या स्टेट काँग्रेसच्या पहिल्या ऐतिहासिक हैदराबाद अधिवेशनात. या अधिवेशनात स्वामीजींनी आपल्या भाषणात अत्यंत समतोलपणे, शांतवृत्तीने परंतु अतिशय खंबीरपणे जबाबदार राज्यपद्धतीचा पुरस्कार केला. भारतीय संघराज्यात हैदराबाद राज्य विलीन झालेच पाहिजे, असा आग्रह देखील त्यांनी जाहीर केला. अधिवेशनाचा हाच संदेश घेऊन कार्यकर्ते आणि प्रतिनिधी आपापल्या गावी परत गेले आणि क्रांतीची ज्योती पेटून उठली. स्वामी रामानंद तीर्थ यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होतीच. त्यामुळेच तसे झाले तर त्याचीही तजबीज आधीच करून ठेवण्यात आली होती. या सर्व आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी दिगंबरराव बिंदू यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समितीची स्थापना करण्यात आली होती. स्वामी रामानंद तीर्थ यांना अटक झाल्यास याच कृती समितीच्या माध्यमातून सर्व चळवळ चालवली जाईल, असे ठरले होते. त्यानुसार सर्व अधिकार या कृती समितीला देण्यात आले होते. निजामाची सत्ता जुगारून लावण्यासाठी कृती समितीने जनतेला भरगच्च कार्यक्रम दिले होते. सर्वत्र झेंडावंदनाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. सरकारी यंत्रणा बंद पाडण्याचे तंत्र वापरण्यात आले, रेल्वेचे रूळ उखडणे, तारा तोडणे, यासारखे कार्यक्रम देखील हाती घेण्यात आले होते. संस्थानातील सर्व जिल्ह्यांत जंगल सत्याग्रहाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला. ग्रामीण भागात लेव्हीबंदी आणि साराबंदीचे कार्यक्रम यशस्वी झाले. तसेच संस्थानातील गावे स्वतंत्र करून तेथे निजामाची सत्ता झुगारून गावाची सत्ता प्रस्थापित करणे, तसेच करोडगिरी नाकी व पोलिस स्टेशन उध्वस्त करणे, आधी मार्गाचाही यात समावेश होता. स्वामी रामानंद तिर्थ यांचे नेतृत्व; अनेक मार्गानी पेटला लढा निजामशाहीने स्टेट काँग्रेसला अनेक मार्गानी दाबण्याचा प्रयत्न केला. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाने या लढ्याला धार आली, त्यांच्या नेतृत्वाचा झंझावात सुरु झाला, आणि लढाई अनेक मार्गानी सुरु झाली. दि. 16, 17 व 18 जून, 1947 स्टेट काँग्रेसचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन हैदराबाद व सिकंदराबाद या शहरांमध्ये असलेल्या मुशिराबाद या भागात झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे कामकाज पार पाडल्यानंतर हैदराबाद संस्थांनचे गृहमंत्री अलियावरजंग यांनी स्वामीजींना बोलावून घेतले व दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात सरकारच्या दृष्टीने आक्षेपार्ह असलेला मजूकर वगळून टाकावा असे बजावले. तसेच संस्थांनाबाहेरून आलेल्या पाहुण्यांची भाषणे होऊ देऊ नयेत असेही सांगितले. स्वामीजींनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले की, आम्ही आदरणीय पाहुण्यांना यात कमलादेवी चट्टापोध्याय तसेच अन्य पाहुण्यांवर काही बंधने घालणार नाही. सरकारने जे करायचे ते करावे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणे ही तारेवरची कसरत होती. सातवे निजाम मीर उस्मानअली हे पुराणमतवादी व राजेशाहीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी हैदराबाद संस्थांनात आपले राज्य टिकवण्यासाठी अनियंत्रित व अन्यायी मार्गाचा सर्रास वापर केला. रझाकारासारखी जातीयवादी संघटना जोपासली. अशा राजवटीशी धर्मनिरपेक्ष वृत्तीने, मानवतावादी मूल्ये उराशी बाळगून प्रखरपणे संघर्ष करणे अत्यंत अवघड होते. स्वामी रामानंद तीर्थांची गांधीप्रणीत मार्गावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे हा लढा धर्मनिरपेक्ष राहील आणि अहिंसक मार्गानेच चालेल, असा त्यांनी निश्चय केला होता. या अधिवेशनात शेवटी त्यांनी अत्यंत सडेतोड भाषण केले. ते म्हणाले की, ‘बंधुनों, आपल्याला फार मोठी कामगिरी पार पाडायची आहे. त्यासाठी आपणांत कमालीची एैक्य भावना असण्याची गरज आहे. तसेच आपल्यात कमालीची शिस्त पाहिजे. या लढ्यात सर्वस्व त्यागासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. त्यासाठी काही जणांचे बलिदानही होईल. तरी उर्वरित लोकांनी स्वातंत्र्यांची ही मशाल पुढे न्यायची आहे. हे कार्य हिमालयाएवढे उत्तुंग आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने या कार्यासाठी स्वत:ला झोकून दिले पाहिजे. हैदराबादच्या जनतेचा हा मुक्तिसंग्राम हा राष्ट्राच्या निकडीचा प्रश्न आहे. मित्रांनो, याप्रसंगी आपले सर्व धैर्य एकवटून स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा निर्धार करू या.’ स्वामीजींनी आपल्या भाषणात अत्यंत समतोलपणाने, शांतवृत्तीने परंतु अतिशय खंबीरपणे जबाबदार राज्यपद्धतीचा पुरस्कार केला. भारतीय संघराज्यात हैदराबाद राज्य विलीन झालेच पाहिजे असा आग्रह जाहीर केला. अधिवेशनाचा संदेश घेऊन कार्यकर्ते व प्रतिनिधी आपापल्या गावी परत गेले. दुहेरी चळवळ चालवण्याची नीती

स्वामीजींनी मुक्तीला तीव्र करण्यासाठी एकीकडे सत्याग्रहाचा अवलंब करण्याचे ठरवले होते तर दुसरीकडे काही लोकांनी भूमिगत होऊन 1942 च्या चळवळीसारखी चळवळ करायचे ठरवले. याचवेळेस हैदराबाद संस्थानात कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली इलेहादुल मुसलमीन या संघटनेची एक सशस्त्र सेनाच उभी राहिली होती. रझाकार या नावाने ते सर्वत्र प्रसिध्द होते. रझाकारांना तोंड देण्यासाठी स्टेट काँग्रेसने असेही ठरवले की, संस्थानाला लागून सरहद्दीवर स्टेट काँग्रेसच्या सशस्त्र लढ्याची कार्यालये सुरू करायची. रझाकारांचा प्रतिकार करण्यासाठी निवडक लोकांना शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण देण्याचे ठरले. त्या दृष्टीने मराठवाडा, कर्नाटक व तेलंगणाच्या सरहद्दीवर जवळपास 115 कॅम्पस उघडण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात साधारणत: 15 कॅम्प उभारण्यात आले होते. हे कँम्प प्रत्यक्ष निजामाच्या नियंत्रीत क्षेत्राच्या बाहेर होते. या सर्व आंदोलनाचे मार्गदर्शन करण्यासाठी दिगंबरराव बिंदू यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समिती स्थापन करण्यात आली होती. स्वामी रामानंद तीर्थ यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता होती. त्यांना अटक झाल्यास चळवळ चालवण्याचे सर्व अधिकार कृती समितीला देण्यात आले. स्वामीजी 26 जानेवारी ते 17 सप्टेंबर, 1948 पर्यंत जेलमध्ये होते. 1 डिसेंबर, 1947 ते सप्टेंबर, 1948 पर्यंत त्याचे रूपांतर तीव्र आंदोलनात झाले. जागोजागी होणारे सशस्त्र लढे आणि नांदेड जिल्ह्यातील उमरी बँक प्रकरण यांत स्वामीजींना खूप मनस्ताप झाला. परंतु, स्वामीजी सतत कृती समितीच्या पाठीशी राहिले. कार्यकर्त्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. म्हणून या आंदोलनातील कार्यकर्ते या अग्निदिव्यातून तावून – सुलाखून बाहेर पडले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली संस्थानातील सर्व जिल्ह्यांत व्यापक स्वरूपाचा लढा दिला गेला. म्हणून निजामी सत्तेची पाळेमुळे पोखरली गेली व पोलिस ॲक्शनच्या वेळी निजामी सत्तेला पाच दिवसात शरणागती पत्करावी लागली. इ.स. 1948 मधील पोलिस ॲक्शन म्हणजेच ऑपरेशन पोलो जैसे थे करारामुळे भारतीय संघराज्य आणि हैदराबाद संस्थान यांच्यात परस्पर सहकार्याचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होईल, अशी आशा सर्वांना वाटत होती. परंतु ती निरर्थक ठरली. करारातील तरतुदींचा गैरवापर करणे, त्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे, अनेक तरतुदींचा भंग करणे, त्यांचे पालन न करणे असे उद्योग पंतप्रधान मिर लायक अलीच्या सरकारने सुरू केले. कासीम रझवीने रझाकारांची संख्या व बळ वाढवून सर्वत्र अत्याचाराचे एक नवीन पर्व सुरू केले होते. संस्थांनातील नागरिकांवर, स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्यांवर, भारतीय सीमेवरील चौक्यांवर आणि तेथील खेड्यांवर हल्ले करून रझाकारांनी सर्वत्र विध्वंस व प्रचंड रक्तपात सुरू केला. या सर्व अत्याचारांना निजामाची मूक संमती होती. निजामाकडून झालेला करारभंग रझाकाराने सुरू केलेला रक्तपात, त्याचे लूटमारीचे सत्र, निजाम फौजेचे उपद्याप आणि हैदराबाद संस्थानातील उग्र होत जाणाऱ्या स्वातंत्र्यलढ्याचे दडपण यामुळे भारताच्या गव्हर्नर जनरलने 31 ऑगस्ट, 1948 रोजी निजामाला एक पत्र पाठवले. त्यात म्हटले होते की, निजामाने थोडेसे धाडस दाखवून रझाकारी संघटनेवर बंदी घालावी. जनतेच्या मनातील भीती दूर करावी. परंतु निजामाने या पत्राचे बेजबाबदारपणे उत्तर दिले. त्यामुळे निजामाविरुद्ध बळाचा वापर करणे अपरिहार्य होते. म्हणूनव दि. 7 सप्टेंबर, 1948 रोजी भारत सरकारने सैन्य दलाला हैदराबादवर चढाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 13 सप्टेंबर, 1948 रोजी पहाटे 4 वाजता संस्थांनाविरुद्ध ‘पोलिस ॲक्शन’ ची कारवाई झाली.

प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात 13 सप्टेंबर, 1948 रोजी भारतीय फौजा हैदराबाद संस्थानमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून घुसल्या. हैदराबाद संस्थांनावरील लढाईची ही योजना ‘ऑपरेशन पोलो’ या सांकेतिक नावाने ओळखली जाते. भारतीय सेनेच्या सदर्न कमांडचे प्रमुख जनरल गोडार्ड यांनी ही योजना तयार केली. मात्र, नंतर ते निवृत्त झाले आणि त्यांच्याजागी लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंग यांची नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंत चौधरी, मेजर जनरल डी. एस. ब्रार, मेजर जनरल ए. ए. रुद्र, ब्रिगेडीयर शिवदत्त सिंग आणि एअरव्हाईस मार्शल मुखर्जी यांनी ही योजना राबवली व पूर्णत्वाला नेली. मुख्य लढाई पहिल्या आर्म्ड डिव्हिजनने सोलापूर येथे सुरू केली. सोलापूर ते हैदराबाद असा लढाईचा मार्ग होता. या मुख्य लढाईचे नेतृत्व मेजर जनरल जयंत चौधरी यांनी केले. दुसरी आघाडी विजयवाडा मार्गे होती. तिचे नेतृत्व मेजर जनरल ए. ए. रुद्र हे करत होते. त्याशिवाय कर्नुल, आदिलाबाद, चाळीसगावमार्गे, औरंगाबादकडून वाशीम मार्गे, हिंगोलीतून बुलढाणामार्गे, जालन्यातून, सोलापूरमार्गे उस्मानाबाद लातूरकडून, गदग – रायपूरकडून अशा निरनिराळ्या ठिकाणांहून भारतीय फौजा हैदराबाद संस्थांनात घुसल्या. 13 सप्टेंबरच्या पहाटेपासून भारतीय फौजांनी आत्मविश्वासाने कारवाई सुरू केली. पोलिस ॲक्शनमुळे जनरल अल इद्रिस यांच्या नेतृत्वाखाली निजामी सैन्याची अक्षरशः वाताहत झाली. पोलिस ॲक्शनची कार्यवाही 17 सप्टेंबर, 1948 पर्यंत चालू राहिली. 17 सप्टेंबर ठरला मंगलदिन शेवटी 17 सप्टेंबर हा मंगलदिन उगवला. हैदराबादभोवती असलेल्या निजामी फौजांनी लिंगमपल्लीपर्यंत माघार घेतली होती. भारतीय सेनाधिकाऱ्यांनी निजामी फौजांचे प्रमुख जनरल अल इद्रिस यांना त्यांनी शरणागती पत्करावी असा संदेश पाठवला. त्याप्रमाणे 17 सप्टेंबर 1948 रोजी सायंकाळी निजामाने आपली शरणागती घोषित केली आणि आपल्या फौजांना युद्ध थांबवण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर, 1948 रोजी भारतीय सैन्याने निजामाची राजधानी हैदराबाद शहरात प्रवेश केला. तेथे मेजर जनरल – चौधरींनी अधिकृतपणे निजामाचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रिस यांच्याकडून शरणागती पत्करल्यानंतर सैनिकी कार्यवाही पूर्ण झाली. पोलिस ॲक्शननंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामाची सांगता झाली. दक्षिण भारतातील निजामी सत्तेचे जुलमी पाश स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या आंदोलनाने झुगारून दिले. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा जनतेच्या सामर्थ्यांचा अभूतपूर्व असामान्य विजय समजला जातो. 17 सप्टेंबर, 1948 रोजी मीर उस्मान अली याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. म्हणून हा दिवस खऱ्या अर्थाने मराठवाड्याचा मुक्तीदिन आणि भारतीय संघराज्यात सामिल होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

​भारत स्वातंत्र्यानंतर देखील हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा सुरूच होता. मात्र त्यासाठी सरकारला ‘ऑपरेशन पोलो’ राबवावे लागले. काय होते हे ‘ऑपरेशन पोलो’? निजामी सत्तेला पाच दिवसात कशी पत्करावी लागली शरणागती? कसा राहिला अखेरचा लढा? आजच्या मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने पाहुयात, या लढ्याच्या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी…. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात लढला गेलेला हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा ‘ऑपरेशन पोलो’ने संपला. मात्र या शेवटच्या टप्प्यांत अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. वास्तविक या अंतिम लढाईची सुरुवात झाली ती 16, 17 आणि 18 जून 1947 मध्ये झालेल्या स्टेट काँग्रेसच्या पहिल्या ऐतिहासिक हैदराबाद अधिवेशनात. या अधिवेशनात स्वामीजींनी आपल्या भाषणात अत्यंत समतोलपणे, शांतवृत्तीने परंतु अतिशय खंबीरपणे जबाबदार राज्यपद्धतीचा पुरस्कार केला. भारतीय संघराज्यात हैदराबाद राज्य विलीन झालेच पाहिजे, असा आग्रह देखील त्यांनी जाहीर केला. अधिवेशनाचा हाच संदेश घेऊन कार्यकर्ते आणि प्रतिनिधी आपापल्या गावी परत गेले आणि क्रांतीची ज्योती पेटून उठली. स्वामी रामानंद तीर्थ यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होतीच. त्यामुळेच तसे झाले तर त्याचीही तजबीज आधीच करून ठेवण्यात आली होती. या सर्व आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी दिगंबरराव बिंदू यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समितीची स्थापना करण्यात आली होती. स्वामी रामानंद तीर्थ यांना अटक झाल्यास याच कृती समितीच्या माध्यमातून सर्व चळवळ चालवली जाईल, असे ठरले होते. त्यानुसार सर्व अधिकार या कृती समितीला देण्यात आले होते. निजामाची सत्ता जुगारून लावण्यासाठी कृती समितीने जनतेला भरगच्च कार्यक्रम दिले होते. सर्वत्र झेंडावंदनाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. सरकारी यंत्रणा बंद पाडण्याचे तंत्र वापरण्यात आले, रेल्वेचे रूळ उखडणे, तारा तोडणे, यासारखे कार्यक्रम देखील हाती घेण्यात आले होते. संस्थानातील सर्व जिल्ह्यांत जंगल सत्याग्रहाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला. ग्रामीण भागात लेव्हीबंदी आणि साराबंदीचे कार्यक्रम यशस्वी झाले. तसेच संस्थानातील गावे स्वतंत्र करून तेथे निजामाची सत्ता झुगारून गावाची सत्ता प्रस्थापित करणे, तसेच करोडगिरी नाकी व पोलिस स्टेशन उध्वस्त करणे, आधी मार्गाचाही यात समावेश होता. स्वामी रामानंद तिर्थ यांचे नेतृत्व; अनेक मार्गानी पेटला लढा निजामशाहीने स्टेट काँग्रेसला अनेक मार्गानी दाबण्याचा प्रयत्न केला. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाने या लढ्याला धार आली, त्यांच्या नेतृत्वाचा झंझावात सुरु झाला, आणि लढाई अनेक मार्गानी सुरु झाली. दि. 16, 17 व 18 जून, 1947 स्टेट काँग्रेसचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन हैदराबाद व सिकंदराबाद या शहरांमध्ये असलेल्या मुशिराबाद या भागात झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे कामकाज पार पाडल्यानंतर हैदराबाद संस्थांनचे गृहमंत्री अलियावरजंग यांनी स्वामीजींना बोलावून घेतले व दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात सरकारच्या दृष्टीने आक्षेपार्ह असलेला मजूकर वगळून टाकावा असे बजावले. तसेच संस्थांनाबाहेरून आलेल्या पाहुण्यांची भाषणे होऊ देऊ नयेत असेही सांगितले. स्वामीजींनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले की, आम्ही आदरणीय पाहुण्यांना यात कमलादेवी चट्टापोध्याय तसेच अन्य पाहुण्यांवर काही बंधने घालणार नाही. सरकारने जे करायचे ते करावे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणे ही तारेवरची कसरत होती. सातवे निजाम मीर उस्मानअली हे पुराणमतवादी व राजेशाहीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी हैदराबाद संस्थांनात आपले राज्य टिकवण्यासाठी अनियंत्रित व अन्यायी मार्गाचा सर्रास वापर केला. रझाकारासारखी जातीयवादी संघटना जोपासली. अशा राजवटीशी धर्मनिरपेक्ष वृत्तीने, मानवतावादी मूल्ये उराशी बाळगून प्रखरपणे संघर्ष करणे अत्यंत अवघड होते. स्वामी रामानंद तीर्थांची गांधीप्रणीत मार्गावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे हा लढा धर्मनिरपेक्ष राहील आणि अहिंसक मार्गानेच चालेल, असा त्यांनी निश्चय केला होता. या अधिवेशनात शेवटी त्यांनी अत्यंत सडेतोड भाषण केले. ते म्हणाले की, ‘बंधुनों, आपल्याला फार मोठी कामगिरी पार पाडायची आहे. त्यासाठी आपणांत कमालीची एैक्य भावना असण्याची गरज आहे. तसेच आपल्यात कमालीची शिस्त पाहिजे. या लढ्यात सर्वस्व त्यागासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. त्यासाठी काही जणांचे बलिदानही होईल. तरी उर्वरित लोकांनी स्वातंत्र्यांची ही मशाल पुढे न्यायची आहे. हे कार्य हिमालयाएवढे उत्तुंग आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने या कार्यासाठी स्वत:ला झोकून दिले पाहिजे. हैदराबादच्या जनतेचा हा मुक्तिसंग्राम हा राष्ट्राच्या निकडीचा प्रश्न आहे. मित्रांनो, याप्रसंगी आपले सर्व धैर्य एकवटून स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा निर्धार करू या.’ स्वामीजींनी आपल्या भाषणात अत्यंत समतोलपणाने, शांतवृत्तीने परंतु अतिशय खंबीरपणे जबाबदार राज्यपद्धतीचा पुरस्कार केला. भारतीय संघराज्यात हैदराबाद राज्य विलीन झालेच पाहिजे असा आग्रह जाहीर केला. अधिवेशनाचा संदेश घेऊन कार्यकर्ते व प्रतिनिधी आपापल्या गावी परत गेले. दुहेरी चळवळ चालवण्याची नीती

स्वामीजींनी मुक्तीला तीव्र करण्यासाठी एकीकडे सत्याग्रहाचा अवलंब करण्याचे ठरवले होते तर दुसरीकडे काही लोकांनी भूमिगत होऊन 1942 च्या चळवळीसारखी चळवळ करायचे ठरवले. याचवेळेस हैदराबाद संस्थानात कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली इलेहादुल मुसलमीन या संघटनेची एक सशस्त्र सेनाच उभी राहिली होती. रझाकार या नावाने ते सर्वत्र प्रसिध्द होते. रझाकारांना तोंड देण्यासाठी स्टेट काँग्रेसने असेही ठरवले की, संस्थानाला लागून सरहद्दीवर स्टेट काँग्रेसच्या सशस्त्र लढ्याची कार्यालये सुरू करायची. रझाकारांचा प्रतिकार करण्यासाठी निवडक लोकांना शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण देण्याचे ठरले. त्या दृष्टीने मराठवाडा, कर्नाटक व तेलंगणाच्या सरहद्दीवर जवळपास 115 कॅम्पस उघडण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात साधारणत: 15 कॅम्प उभारण्यात आले होते. हे कँम्प प्रत्यक्ष निजामाच्या नियंत्रीत क्षेत्राच्या बाहेर होते. या सर्व आंदोलनाचे मार्गदर्शन करण्यासाठी दिगंबरराव बिंदू यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समिती स्थापन करण्यात आली होती. स्वामी रामानंद तीर्थ यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता होती. त्यांना अटक झाल्यास चळवळ चालवण्याचे सर्व अधिकार कृती समितीला देण्यात आले. स्वामीजी 26 जानेवारी ते 17 सप्टेंबर, 1948 पर्यंत जेलमध्ये होते. 1 डिसेंबर, 1947 ते सप्टेंबर, 1948 पर्यंत त्याचे रूपांतर तीव्र आंदोलनात झाले. जागोजागी होणारे सशस्त्र लढे आणि नांदेड जिल्ह्यातील उमरी बँक प्रकरण यांत स्वामीजींना खूप मनस्ताप झाला. परंतु, स्वामीजी सतत कृती समितीच्या पाठीशी राहिले. कार्यकर्त्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. म्हणून या आंदोलनातील कार्यकर्ते या अग्निदिव्यातून तावून – सुलाखून बाहेर पडले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली संस्थानातील सर्व जिल्ह्यांत व्यापक स्वरूपाचा लढा दिला गेला. म्हणून निजामी सत्तेची पाळेमुळे पोखरली गेली व पोलिस ॲक्शनच्या वेळी निजामी सत्तेला पाच दिवसात शरणागती पत्करावी लागली. इ.स. 1948 मधील पोलिस ॲक्शन म्हणजेच ऑपरेशन पोलो जैसे थे करारामुळे भारतीय संघराज्य आणि हैदराबाद संस्थान यांच्यात परस्पर सहकार्याचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होईल, अशी आशा सर्वांना वाटत होती. परंतु ती निरर्थक ठरली. करारातील तरतुदींचा गैरवापर करणे, त्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे, अनेक तरतुदींचा भंग करणे, त्यांचे पालन न करणे असे उद्योग पंतप्रधान मिर लायक अलीच्या सरकारने सुरू केले. कासीम रझवीने रझाकारांची संख्या व बळ वाढवून सर्वत्र अत्याचाराचे एक नवीन पर्व सुरू केले होते. संस्थांनातील नागरिकांवर, स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्यांवर, भारतीय सीमेवरील चौक्यांवर आणि तेथील खेड्यांवर हल्ले करून रझाकारांनी सर्वत्र विध्वंस व प्रचंड रक्तपात सुरू केला. या सर्व अत्याचारांना निजामाची मूक संमती होती. निजामाकडून झालेला करारभंग रझाकाराने सुरू केलेला रक्तपात, त्याचे लूटमारीचे सत्र, निजाम फौजेचे उपद्याप आणि हैदराबाद संस्थानातील उग्र होत जाणाऱ्या स्वातंत्र्यलढ्याचे दडपण यामुळे भारताच्या गव्हर्नर जनरलने 31 ऑगस्ट, 1948 रोजी निजामाला एक पत्र पाठवले. त्यात म्हटले होते की, निजामाने थोडेसे धाडस दाखवून रझाकारी संघटनेवर बंदी घालावी. जनतेच्या मनातील भीती दूर करावी. परंतु निजामाने या पत्राचे बेजबाबदारपणे उत्तर दिले. त्यामुळे निजामाविरुद्ध बळाचा वापर करणे अपरिहार्य होते. म्हणूनव दि. 7 सप्टेंबर, 1948 रोजी भारत सरकारने सैन्य दलाला हैदराबादवर चढाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 13 सप्टेंबर, 1948 रोजी पहाटे 4 वाजता संस्थांनाविरुद्ध ‘पोलिस ॲक्शन’ ची कारवाई झाली.

प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात 13 सप्टेंबर, 1948 रोजी भारतीय फौजा हैदराबाद संस्थानमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून घुसल्या. हैदराबाद संस्थांनावरील लढाईची ही योजना ‘ऑपरेशन पोलो’ या सांकेतिक नावाने ओळखली जाते. भारतीय सेनेच्या सदर्न कमांडचे प्रमुख जनरल गोडार्ड यांनी ही योजना तयार केली. मात्र, नंतर ते निवृत्त झाले आणि त्यांच्याजागी लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंग यांची नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंत चौधरी, मेजर जनरल डी. एस. ब्रार, मेजर जनरल ए. ए. रुद्र, ब्रिगेडीयर शिवदत्त सिंग आणि एअरव्हाईस मार्शल मुखर्जी यांनी ही योजना राबवली व पूर्णत्वाला नेली. मुख्य लढाई पहिल्या आर्म्ड डिव्हिजनने सोलापूर येथे सुरू केली. सोलापूर ते हैदराबाद असा लढाईचा मार्ग होता. या मुख्य लढाईचे नेतृत्व मेजर जनरल जयंत चौधरी यांनी केले. दुसरी आघाडी विजयवाडा मार्गे होती. तिचे नेतृत्व मेजर जनरल ए. ए. रुद्र हे करत होते. त्याशिवाय कर्नुल, आदिलाबाद, चाळीसगावमार्गे, औरंगाबादकडून वाशीम मार्गे, हिंगोलीतून बुलढाणामार्गे, जालन्यातून, सोलापूरमार्गे उस्मानाबाद लातूरकडून, गदग – रायपूरकडून अशा निरनिराळ्या ठिकाणांहून भारतीय फौजा हैदराबाद संस्थांनात घुसल्या. 13 सप्टेंबरच्या पहाटेपासून भारतीय फौजांनी आत्मविश्वासाने कारवाई सुरू केली. पोलिस ॲक्शनमुळे जनरल अल इद्रिस यांच्या नेतृत्वाखाली निजामी सैन्याची अक्षरशः वाताहत झाली. पोलिस ॲक्शनची कार्यवाही 17 सप्टेंबर, 1948 पर्यंत चालू राहिली. 17 सप्टेंबर ठरला मंगलदिन शेवटी 17 सप्टेंबर हा मंगलदिन उगवला. हैदराबादभोवती असलेल्या निजामी फौजांनी लिंगमपल्लीपर्यंत माघार घेतली होती. भारतीय सेनाधिकाऱ्यांनी निजामी फौजांचे प्रमुख जनरल अल इद्रिस यांना त्यांनी शरणागती पत्करावी असा संदेश पाठवला. त्याप्रमाणे 17 सप्टेंबर 1948 रोजी सायंकाळी निजामाने आपली शरणागती घोषित केली आणि आपल्या फौजांना युद्ध थांबवण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर, 1948 रोजी भारतीय सैन्याने निजामाची राजधानी हैदराबाद शहरात प्रवेश केला. तेथे मेजर जनरल – चौधरींनी अधिकृतपणे निजामाचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रिस यांच्याकडून शरणागती पत्करल्यानंतर सैनिकी कार्यवाही पूर्ण झाली. पोलिस ॲक्शननंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामाची सांगता झाली. दक्षिण भारतातील निजामी सत्तेचे जुलमी पाश स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या आंदोलनाने झुगारून दिले. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा जनतेच्या सामर्थ्यांचा अभूतपूर्व असामान्य विजय समजला जातो. 17 सप्टेंबर, 1948 रोजी मीर उस्मान अली याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. म्हणून हा दिवस खऱ्या अर्थाने मराठवाड्याचा मुक्तीदिन आणि भारतीय संघराज्यात सामिल होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.  

पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात:संजयकाका पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका

पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात:संजयकाका पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे दावे-प्रतिदावे होत आहेत तर कुठे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच सांगली येथील भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे समोर आले आहे. पद मिळाल्यावर माणसे बेताल होतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यावर केली आहे. तसेच मी माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर पदे मिळवलेली आहेत, असेही त्यांनी म्हणले आहे. संजयकाका पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात राजकीय जीवनामध्ये माणसाला पद, प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आहे. मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतोय, त्यामुळे माणसे बेताल होत आहेत. पण दिलेले पद लोकांनी कामासाठी दिलेले आहे याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना निवडणुकीत मदत करू, असा शब्द दिला होता. त्यानंतर तासगाव कवठेमहंकाळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अजितराव घोरपडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर आता त्यांनी याच मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या सर्व वक्तव्यावरून माजी खासदार संजय पाटील यांनी टीका केली आहे. काय म्हणाले होते खासदार विशाल पाटील? विशाल पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे आहे. रोहित पाटील टेंशन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत कायम उभा राहील. दरम्यान, तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघात रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे दावे-प्रतिदावे होत आहेत तर कुठे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच सांगली येथील भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे समोर आले आहे. पद मिळाल्यावर माणसे बेताल होतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यावर केली आहे. तसेच मी माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर पदे मिळवलेली आहेत, असेही त्यांनी म्हणले आहे. संजयकाका पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात राजकीय जीवनामध्ये माणसाला पद, प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आहे. मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतोय, त्यामुळे माणसे बेताल होत आहेत. पण दिलेले पद लोकांनी कामासाठी दिलेले आहे याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना निवडणुकीत मदत करू, असा शब्द दिला होता. त्यानंतर तासगाव कवठेमहंकाळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अजितराव घोरपडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर आता त्यांनी याच मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या सर्व वक्तव्यावरून माजी खासदार संजय पाटील यांनी टीका केली आहे. काय म्हणाले होते खासदार विशाल पाटील? विशाल पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे आहे. रोहित पाटील टेंशन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत कायम उभा राहील. दरम्यान, तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघात रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.  

शर्यतीच्या नादात वांद्रे-वरळी सागरी सेतुवर भीषण अपघात:दोन भरधाव आलीशान गाड्यांच्या धडकेत टॅक्सी उलटली

शर्यतीच्या नादात वांद्रे-वरळी सागरी सेतुवर भीषण अपघात:दोन भरधाव आलीशान गाड्यांच्या धडकेत टॅक्सी उलटली

मुंबई येथील वांद्रे-वरळी सागरी सेतुवर रविवारी भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. दोन आलीशान गाड्यांमध्ये शर्यत लागली होती. या शर्यतीत या भरधाव गाड्यांनी एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. या धडकेत टॅक्सीमधील प्रवासी व चालक जखमी झाले आहेत. तसेच टॅक्सीचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताप्रकरणी दोन्ही आलीशान गाड्यांच्या चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे वरळी सागरी सेतुवर बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. ही शर्यत यंत्यात वेगात सुरू झाली व काही अंतर पुढे जाताच या दोन्ही कारचालकांचा कारवरील ताबा सुटला आणि थेट समोर असलेल्या टॅक्सीवर जाऊन जोरची धडक बसली. या धडकेत टॅक्सी पुलावरच पलटी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही गाड्या जप्त करत दोन्ही आलीशान गाड्यांच्या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पूलाच्या 19 क्रमांकाच्या पिलरजवळ हा अपघात झाला आहे. बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. दोघेही वांद्रे-वरळी सागरी सेतुवर सुसाट वेगाने कार चालविण्यास सुरुवात केली. काही अंतर पुढे गेल्यावर दोघांच्याही हातून त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले व समोर प्रवाशांनी भरलेल्या टॅक्सीला जोरदार धडक बसली. दोन्ही भरधाव गाड्यांनी एकसाथ टॅक्सीला धडक दिल्याने टॅक्सी पूलावरच पलटी झाली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. टॅक्सीमधील जखमी चालक व प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच तातडीने वरळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज कार चालकांना अटक केली तसेच त्यांच्या गाड्या देखील जप्त केल्या. त्यांच्यावर भरदाव वेगाने गाडी चालवणे, शर्यत लावल्याप्रकरणी आणि अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

​मुंबई येथील वांद्रे-वरळी सागरी सेतुवर रविवारी भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. दोन आलीशान गाड्यांमध्ये शर्यत लागली होती. या शर्यतीत या भरधाव गाड्यांनी एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. या धडकेत टॅक्सीमधील प्रवासी व चालक जखमी झाले आहेत. तसेच टॅक्सीचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताप्रकरणी दोन्ही आलीशान गाड्यांच्या चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे वरळी सागरी सेतुवर बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. ही शर्यत यंत्यात वेगात सुरू झाली व काही अंतर पुढे जाताच या दोन्ही कारचालकांचा कारवरील ताबा सुटला आणि थेट समोर असलेल्या टॅक्सीवर जाऊन जोरची धडक बसली. या धडकेत टॅक्सी पुलावरच पलटी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही गाड्या जप्त करत दोन्ही आलीशान गाड्यांच्या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पूलाच्या 19 क्रमांकाच्या पिलरजवळ हा अपघात झाला आहे. बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. दोघेही वांद्रे-वरळी सागरी सेतुवर सुसाट वेगाने कार चालविण्यास सुरुवात केली. काही अंतर पुढे गेल्यावर दोघांच्याही हातून त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले व समोर प्रवाशांनी भरलेल्या टॅक्सीला जोरदार धडक बसली. दोन्ही भरधाव गाड्यांनी एकसाथ टॅक्सीला धडक दिल्याने टॅक्सी पूलावरच पलटी झाली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. टॅक्सीमधील जखमी चालक व प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच तातडीने वरळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज कार चालकांना अटक केली तसेच त्यांच्या गाड्या देखील जप्त केल्या. त्यांच्यावर भरदाव वेगाने गाडी चालवणे, शर्यत लावल्याप्रकरणी आणि अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  

मुंबई काँग्रेसचा बडा नेता फडणवीस यांच्या घरी:गणपतीचे दर्शन घेण्याचे निमित्त, पण पडद्यामागे राजकारण असल्याचा दावा; चर्चेला उधाण

मुंबई काँग्रेसचा बडा नेता फडणवीस यांच्या घरी:गणपतीचे दर्शन घेण्याचे निमित्त, पण पडद्यामागे राजकारण असल्याचा दावा; चर्चेला उधाण

मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल यांनी सोमवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या येथील निवासस्थानी धडक दिली. यावेळी त्यांनी फडणवीसांशी चर्चा करत त्यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. अमीन पटेल यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी व संजय निरुपम या 3 बड्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला होता. या दोघांच्या सत्ताधारी आघाडीत जाण्यामुळे काँग्रेसला हादरा बसला असताना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अमीन पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत प्रदिर्घ काळ चर्चा केली. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमीन पटेल काही वेगळा विचार करत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण पटेल यांनी स्वतः ही चर्चा फेटाळून लावली आहे. फडणवीसांच्या गणपतीचे दर्शन घेतले -पटेल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अमीन पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 2 कारणांसाठी गेलो होतो. एक म्हणजे मी त्यांच्या घरात विराजमान गणपतीचे दर्शन घेतले. आणि दुसरे म्हणजे 18 तारखेला ईद ए मिलाद नबी आहे. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्यात येणार आहेत. त्याची परवानगी लोकांना हवी आहे. याविषयी पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. अतिथी आला की पुष्पगच्छ द्यावा लागतो – बावनकुळे दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अमीन पटेल व फडणवीसांच्या भेटीत काहीही नवे नसल्याचे स्पष्ट केले. अमीन पटेल केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यात राजकारण करण्यासारखे काहीही नाही. काल शरद पवार साहेबांनीही अमरीश पटेल यांच्या खासगी हेलिपॅडचा वापर केला होता. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी आला की पुष्पगुच्छ द्यावा लागतो. पण काल अमरीश पटेल हाती तुतारी धरणार असल्याच्या बातम्या चालवण्यात आल्या. हे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. पवारांनी गिरीश महाजनांनाही घेरले दरम्यान, शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा 21 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दिलीप खोडपे यांना जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पवारांनी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांना घेरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

​मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल यांनी सोमवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या येथील निवासस्थानी धडक दिली. यावेळी त्यांनी फडणवीसांशी चर्चा करत त्यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. अमीन पटेल यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी व संजय निरुपम या 3 बड्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला होता. या दोघांच्या सत्ताधारी आघाडीत जाण्यामुळे काँग्रेसला हादरा बसला असताना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अमीन पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत प्रदिर्घ काळ चर्चा केली. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमीन पटेल काही वेगळा विचार करत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण पटेल यांनी स्वतः ही चर्चा फेटाळून लावली आहे. फडणवीसांच्या गणपतीचे दर्शन घेतले -पटेल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अमीन पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 2 कारणांसाठी गेलो होतो. एक म्हणजे मी त्यांच्या घरात विराजमान गणपतीचे दर्शन घेतले. आणि दुसरे म्हणजे 18 तारखेला ईद ए मिलाद नबी आहे. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्यात येणार आहेत. त्याची परवानगी लोकांना हवी आहे. याविषयी पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. अतिथी आला की पुष्पगच्छ द्यावा लागतो – बावनकुळे दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अमीन पटेल व फडणवीसांच्या भेटीत काहीही नवे नसल्याचे स्पष्ट केले. अमीन पटेल केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यात राजकारण करण्यासारखे काहीही नाही. काल शरद पवार साहेबांनीही अमरीश पटेल यांच्या खासगी हेलिपॅडचा वापर केला होता. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी आला की पुष्पगुच्छ द्यावा लागतो. पण काल अमरीश पटेल हाती तुतारी धरणार असल्याच्या बातम्या चालवण्यात आल्या. हे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. पवारांनी गिरीश महाजनांनाही घेरले दरम्यान, शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा 21 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दिलीप खोडपे यांना जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पवारांनी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांना घेरल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

शिंदे सरकार मराठवाड्याच्या जनतेविरोधात:​​​​​​​गतवर्षी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांना वाटण्याच्या अक्षता, अंबादास दानवे यांचा घणाघात

शिंदे सरकार मराठवाड्याच्या जनतेविरोधात:​​​​​​​गतवर्षी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांना वाटण्याच्या अक्षता, अंबादास दानवे यांचा घणाघात

आताचे राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरुद्ध आहे. या सरकारने गतवर्षी संभाजीनगरात घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी केला. राज्य सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १६ सप्टेंबर २०२३ रोजी संभाजीनगरात मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. या बैठकीत तब्बल 100 पेक्षा अधिक घोषणा व २० निर्णय घेण्यात आले होते. मराठवाड्यातील विकास कामांसाठी एकूण ३७ हजार १६ कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच ९ हजार ६७ कोटी ९० लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते. वर्षपूर्तीनिमित्त या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाकडे पाहिले असता राज्य शासनाने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची केलेली घोषणा हवेतच विरून गेल्याचे स्पष्ट होते. या सरकारच्या एकाही विकासात्मक कामाला अद्यापपर्यंत मुहूर्त लागला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकार सपशेल अपयशी अंबादास दानवे यांनी यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणांबाबत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी तब्बल १४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता. एका वर्षांमध्ये सदरील प्रकरणी फक्त प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी ६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकार हा प्रकल्प बनविण्यासाठी अशा संथ गतीने गेल्यास पुढील २० वर्षेही प्रकल्प पूर्ण होणार नाही. रस्त्यांचे काम पूर्ण होणार की नाही याविषयी शंका मराठवाड्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आगामी काळात १२ हजार ९३८ कोटी रुपयांचे कामे राज्य शासन हाती घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. मात्र अद्यापपर्यंत फक्त ३०४ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून हायब्रीड अन्युटी योजने अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे धोरण बदलल्यामुळे हे रस्ते पूर्ण होणार की नाही याची शंका सुद्धा निर्माण झाल्याची भिती अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दगडाबाई शेळके यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला असल्याने राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ कोटी रुपये खर्च करुन स्मारक बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु आज रोजी या स्मारकाच्या घोषणेची सद्यस्थिती पाहता पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी जालना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमिनीची मागणी केली आहे. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळख असणाऱ्या या स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मारकाच्या घोषणाकडे असे शासन दुर्लक्ष करत असेल तर सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान असल्याचीअसल्याची भावना यावेळी दानवे यांनी प्रकट केली. दूध क्रांतीची भीमगर्जनाही हवेतच राज्य शासनाने अडचणीत असलेल्या मराठवाड्यातील शेतीला जोडधंदा म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत ८६०० गावांमध्ये ३ हजार २२५ कोटी रुपये खर्च करून दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाद्वारे मराठवाड्यात दूध क्रांती येणार असल्याची भीमगर्जना केली होती.मात्र, मुख्यमंत्री आपल्या शब्दावरून पलटले असून सदरील घोषणेचा फेरविचार करण्यात येत असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी यावेळी दिली. मराठवाड्यात क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारने संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली तर होती. परंतु या घोषणाचे मागील एक वर्षात काय झाले याचे सुस्पष्ट माहिती समोर आली नाही. मात्र २ नोव्हेंबर २०२३ रोजी या संबंधित एक समिती गठीत करण्यात आली होती, तिला ३० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. याव्यतिरिक्त सदरील प्रकरणी कसलेही कामकाज झाले नसल्याची माहिती दानवे यांनी दिली. सरकारने मराठवाड्याची फसवणूक केली मंत्रिमंडळ बैठकीच्या एक वर्षानंतर राज्य शासनाने केलेल्या घोषणांकडे पाहिले असता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्याची पूर्णतः फसवणूक केली असून एका वर्षात सर्व घोषणांकडे प्रशासकीय व शासकीय पातळीवर दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागासले पण दूर करून मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू मुख्यमंत्र्यांची ही निव्वळ घोषणाच एका वर्षात राहिली असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी राज्य सरकारवर केला. सकल मराठा समाजाच्या वतीनेही सदरील मागण्या वेळोवेळी आंदोलन करून राज्य सरकार समोर मांडण्यात आलेल्या आहे. मात्र राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करून वेळ काढूपणा आणि मराठा समाजाला फसवत असल्याची भावना यावेळी दानवे यांनी व्यक्त केली.

​आताचे राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरुद्ध आहे. या सरकारने गतवर्षी संभाजीनगरात घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी केला. राज्य सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १६ सप्टेंबर २०२३ रोजी संभाजीनगरात मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. या बैठकीत तब्बल 100 पेक्षा अधिक घोषणा व २० निर्णय घेण्यात आले होते. मराठवाड्यातील विकास कामांसाठी एकूण ३७ हजार १६ कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच ९ हजार ६७ कोटी ९० लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते. वर्षपूर्तीनिमित्त या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाकडे पाहिले असता राज्य शासनाने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची केलेली घोषणा हवेतच विरून गेल्याचे स्पष्ट होते. या सरकारच्या एकाही विकासात्मक कामाला अद्यापपर्यंत मुहूर्त लागला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकार सपशेल अपयशी अंबादास दानवे यांनी यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणांबाबत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी तब्बल १४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता. एका वर्षांमध्ये सदरील प्रकरणी फक्त प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी ६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकार हा प्रकल्प बनविण्यासाठी अशा संथ गतीने गेल्यास पुढील २० वर्षेही प्रकल्प पूर्ण होणार नाही. रस्त्यांचे काम पूर्ण होणार की नाही याविषयी शंका मराठवाड्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आगामी काळात १२ हजार ९३८ कोटी रुपयांचे कामे राज्य शासन हाती घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. मात्र अद्यापपर्यंत फक्त ३०४ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून हायब्रीड अन्युटी योजने अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे धोरण बदलल्यामुळे हे रस्ते पूर्ण होणार की नाही याची शंका सुद्धा निर्माण झाल्याची भिती अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दगडाबाई शेळके यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला असल्याने राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ कोटी रुपये खर्च करुन स्मारक बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु आज रोजी या स्मारकाच्या घोषणेची सद्यस्थिती पाहता पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी जालना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमिनीची मागणी केली आहे. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळख असणाऱ्या या स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मारकाच्या घोषणाकडे असे शासन दुर्लक्ष करत असेल तर सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान असल्याचीअसल्याची भावना यावेळी दानवे यांनी प्रकट केली. दूध क्रांतीची भीमगर्जनाही हवेतच राज्य शासनाने अडचणीत असलेल्या मराठवाड्यातील शेतीला जोडधंदा म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत ८६०० गावांमध्ये ३ हजार २२५ कोटी रुपये खर्च करून दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाद्वारे मराठवाड्यात दूध क्रांती येणार असल्याची भीमगर्जना केली होती.मात्र, मुख्यमंत्री आपल्या शब्दावरून पलटले असून सदरील घोषणेचा फेरविचार करण्यात येत असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी यावेळी दिली. मराठवाड्यात क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारने संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली तर होती. परंतु या घोषणाचे मागील एक वर्षात काय झाले याचे सुस्पष्ट माहिती समोर आली नाही. मात्र २ नोव्हेंबर २०२३ रोजी या संबंधित एक समिती गठीत करण्यात आली होती, तिला ३० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. याव्यतिरिक्त सदरील प्रकरणी कसलेही कामकाज झाले नसल्याची माहिती दानवे यांनी दिली. सरकारने मराठवाड्याची फसवणूक केली मंत्रिमंडळ बैठकीच्या एक वर्षानंतर राज्य शासनाने केलेल्या घोषणांकडे पाहिले असता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्याची पूर्णतः फसवणूक केली असून एका वर्षात सर्व घोषणांकडे प्रशासकीय व शासकीय पातळीवर दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागासले पण दूर करून मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू मुख्यमंत्र्यांची ही निव्वळ घोषणाच एका वर्षात राहिली असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी राज्य सरकारवर केला. सकल मराठा समाजाच्या वतीनेही सदरील मागण्या वेळोवेळी आंदोलन करून राज्य सरकार समोर मांडण्यात आलेल्या आहे. मात्र राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करून वेळ काढूपणा आणि मराठा समाजाला फसवत असल्याची भावना यावेळी दानवे यांनी व्यक्त केली.  

हिंदू समाज देशाचा कर्ता व देशाचा शिल्पकार:सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

हिंदू समाज देशाचा कर्ता व देशाचा शिल्पकार:सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

रविवारी राजस्थान येथील अलवर या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत येथे बोलताना म्हणाले, हिंदू असणे म्हणजे उदार असणे, प्रत्येकाला सद्भावना दाखवणे, मग त्याची श्रद्धा, जात, आहार पद्धत काहीही असो. हिंदू समाज हा देशाचा कर्ता आहे. त्यामुळे या देशात काहीही घडले तरी त्याचा परिणाम हिंदू समाजावर होतो आणि चांगले घडले तर हिंदूचा अभिमान वाढतो, कारण हिंदू समाज हा देशाचा शिल्पकार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मोहन भागवत म्हणाले, हिंदू असणे म्हणजे जगातील सर्वात उदार व्यक्ती असणे, जी व्यक्ती सर्वांना सामावून घेते, सर्वांसमोर सद्भावना दाखवते. आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो, तोच मुळात एक वैश्विक मानवधर्म आहे. हिंदूंना सर्वांचे कल्याण हवे असते. हिंदूंना त्यांच्या महान पूर्वजांकडून या मूल्यांचा वारसा मिळालेला आहे. हिंदू शिक्षणाचा वापर कोणालाही कमी दाखवण्यासाठी नव्हे तर ज्ञान वाटण्यासाठी करतात. तसेच संपत्तीचा वापर स्वतःसाठी न करता परोपकारासाठी करतो. शक्तीचा वापर दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी करतो. संघाला विरोध करणारेच संघाचा आदर करतात मोहन भागवत म्हणाले, हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणाऱ्याला हिंदू मानले जाते. तो कोणाची पूजा करतो, कुठली भाषा बोलतो, त्याची जात, प्रदेश किंवा आहाराच्या सवयी काय, याचा काहीही फरक पडत नाही. एक काळ होता जेव्हा संघाला फारसे कोणी ओळखत नव्हते. पण त्याला आता व्यापक मान्यता प्राप्त झाली आहे. संघाला बाहेरून विरोध करणारे अनेक लोक आहेत. पण मनातून तेच लोक याचा आदर बाळगतात. राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्माचे रक्षण महत्त्वाचे मोहन भागवत म्हणाले, राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक मूल्य, आत्म जागरूकता आणि नागरी अनुशासन या पाच मूलभूत तत्वांचा अवलंब आणि प्रचार करावा, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण मोहन भागवत म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण होत आहे. यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर जबाबदार आहे. यामुळे पिढीची पारंपरिक मूल्यांशी झपाट्याने स्पर्श होत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आठवड्यातून एकदा धार्मिक कार्यक्रम आणि भोजनासाठी एकत्र यावे. यामुळे परस्पर संबंध दृढ होतील तसेच सांस्कृतिक मूल्यांचेही रक्षण होईल.

​रविवारी राजस्थान येथील अलवर या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत येथे बोलताना म्हणाले, हिंदू असणे म्हणजे उदार असणे, प्रत्येकाला सद्भावना दाखवणे, मग त्याची श्रद्धा, जात, आहार पद्धत काहीही असो. हिंदू समाज हा देशाचा कर्ता आहे. त्यामुळे या देशात काहीही घडले तरी त्याचा परिणाम हिंदू समाजावर होतो आणि चांगले घडले तर हिंदूचा अभिमान वाढतो, कारण हिंदू समाज हा देशाचा शिल्पकार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मोहन भागवत म्हणाले, हिंदू असणे म्हणजे जगातील सर्वात उदार व्यक्ती असणे, जी व्यक्ती सर्वांना सामावून घेते, सर्वांसमोर सद्भावना दाखवते. आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो, तोच मुळात एक वैश्विक मानवधर्म आहे. हिंदूंना सर्वांचे कल्याण हवे असते. हिंदूंना त्यांच्या महान पूर्वजांकडून या मूल्यांचा वारसा मिळालेला आहे. हिंदू शिक्षणाचा वापर कोणालाही कमी दाखवण्यासाठी नव्हे तर ज्ञान वाटण्यासाठी करतात. तसेच संपत्तीचा वापर स्वतःसाठी न करता परोपकारासाठी करतो. शक्तीचा वापर दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी करतो. संघाला विरोध करणारेच संघाचा आदर करतात मोहन भागवत म्हणाले, हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणाऱ्याला हिंदू मानले जाते. तो कोणाची पूजा करतो, कुठली भाषा बोलतो, त्याची जात, प्रदेश किंवा आहाराच्या सवयी काय, याचा काहीही फरक पडत नाही. एक काळ होता जेव्हा संघाला फारसे कोणी ओळखत नव्हते. पण त्याला आता व्यापक मान्यता प्राप्त झाली आहे. संघाला बाहेरून विरोध करणारे अनेक लोक आहेत. पण मनातून तेच लोक याचा आदर बाळगतात. राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्माचे रक्षण महत्त्वाचे मोहन भागवत म्हणाले, राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक मूल्य, आत्म जागरूकता आणि नागरी अनुशासन या पाच मूलभूत तत्वांचा अवलंब आणि प्रचार करावा, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण मोहन भागवत म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण होत आहे. यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर जबाबदार आहे. यामुळे पिढीची पारंपरिक मूल्यांशी झपाट्याने स्पर्श होत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आठवड्यातून एकदा धार्मिक कार्यक्रम आणि भोजनासाठी एकत्र यावे. यामुळे परस्पर संबंध दृढ होतील तसेच सांस्कृतिक मूल्यांचेही रक्षण होईल.  

राऊत यांचे वादग्रस्त वक्तव्य:म्हणाले, नरेंद्र मोदींचे डोके सडले, मानसिक संतुलन ठीक नाही; निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोप

राऊत यांचे वादग्रस्त वक्तव्य:म्हणाले, नरेंद्र मोदींचे डोके सडले, मानसिक संतुलन ठीक नाही; निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोप

आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी पंतप्रधानांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पीएम मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले की, त्यांचे डोके सडलेले आहे, त्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही. याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोपही केला. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतील हे माहीत नाही. त्यांचे मानसिक संतुलन कळत नाही. त्यांचे डोके सडलेले आहे. झारखंडमध्ये जर लाडकी बहीण सारखीच असलेली योजना चुकीची असेल तर. महाराष्ट्रात ती योग्य कशी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. निवडणूक आयोगावरही टीका निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, “या देशात निवडणूक आयोग आता स्वतंत्र राहिलेला नाही. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच निवडणुका जाहीर करतो. राज्यात महापालिका निवडणुका होत नाहीत. कारण भाजपचा पराभव होणार आहे हे निवडणूक आयोगाला माहीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली होती. यावरही राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवरही साधला निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, “मुख्यमंत्री निवडणुकीबद्दल बोलतील का? ते फक्त तारीख देत आहेत. निवडणूक कधी होणार, हे निवडणूक आयोगाने सांगायला हवे, एकनाथ शिदेंना ते सांगत आहेत. त्यांना माहिती आहे का? दिल्लीत नोव्हेंबरमध्ये निवडणुका?” जोपर्यंत दिल्लीच्या दोन्ही मालकांना महाराष्ट्रात निवडणुका घ्यायच्या नाहीत, तोपर्यंत आमचा विजय निश्चित आहे, असे आम्ही म्हणतो. लोकसभा निवडणुकीत हेच झाले, विधानसभा निवडणुकीतही तेच होईल. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा…

​आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी पंतप्रधानांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पीएम मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले की, त्यांचे डोके सडलेले आहे, त्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही. याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोपही केला. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतील हे माहीत नाही. त्यांचे मानसिक संतुलन कळत नाही. त्यांचे डोके सडलेले आहे. झारखंडमध्ये जर लाडकी बहीण सारखीच असलेली योजना चुकीची असेल तर. महाराष्ट्रात ती योग्य कशी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. निवडणूक आयोगावरही टीका निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, “या देशात निवडणूक आयोग आता स्वतंत्र राहिलेला नाही. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच निवडणुका जाहीर करतो. राज्यात महापालिका निवडणुका होत नाहीत. कारण भाजपचा पराभव होणार आहे हे निवडणूक आयोगाला माहीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली होती. यावरही राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवरही साधला निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, “मुख्यमंत्री निवडणुकीबद्दल बोलतील का? ते फक्त तारीख देत आहेत. निवडणूक कधी होणार, हे निवडणूक आयोगाने सांगायला हवे, एकनाथ शिदेंना ते सांगत आहेत. त्यांना माहिती आहे का? दिल्लीत नोव्हेंबरमध्ये निवडणुका?” जोपर्यंत दिल्लीच्या दोन्ही मालकांना महाराष्ट्रात निवडणुका घ्यायच्या नाहीत, तोपर्यंत आमचा विजय निश्चित आहे, असे आम्ही म्हणतो. लोकसभा निवडणुकीत हेच झाले, विधानसभा निवडणुकीतही तेच होईल. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा…  

मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मात्र,तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनधरणीचे प्रयत्न सुरू मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीच्या आधी सरकारला घेरण्याची मनोज जरांगे पाटील यांनी योजना आहे. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून ते पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. त्या आधीच सरकारच्या वतीने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. भुमरे ‎यांची जरांगेंसोबत 2 तास चर्चा‎ छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान‎भुमरे यांनी रविवारी आंतरवाली सराटीत ‎मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघा‎ नेत्यांमध्ये अडीच तास चर्चा झाली. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून जरांगे पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. तसेच यापूर्वी जरांगे यांनी ‎खासदार संदिपान भुमरे यांच्यावर नाराजी‎ व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने संदिपान ‎भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेत नाराजी दूर‎ केल्याचे समोर आले. या भेटीत दोघा ‎नेत्यांमधील चर्चेचा तपशील जाहीर झालेला ‎नाही खासदार संदिपान भुमरे यांनी अचानकपणे आंतरवाली सराटी गाठल्याने राजकीय ‎वर्तुळाच चर्चा झाली. जरांगे पाटील यांची भेट ‎मी नेहमीच भेट घेतो. या आधी जेव्हा जरांगे‎ उपोषणाला बसले होते, त्या वेळीही मी त्यांची‎भेट घेतली होती. समाजाच्या हितावर आमची‎चर्चा झाली, असे भुमरे म्हणाले.‎

​मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मात्र,तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनधरणीचे प्रयत्न सुरू मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीच्या आधी सरकारला घेरण्याची मनोज जरांगे पाटील यांनी योजना आहे. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून ते पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. त्या आधीच सरकारच्या वतीने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. भुमरे ‎यांची जरांगेंसोबत 2 तास चर्चा‎ छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान‎भुमरे यांनी रविवारी आंतरवाली सराटीत ‎मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघा‎ नेत्यांमध्ये अडीच तास चर्चा झाली. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून जरांगे पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. तसेच यापूर्वी जरांगे यांनी ‎खासदार संदिपान भुमरे यांच्यावर नाराजी‎ व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने संदिपान ‎भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेत नाराजी दूर‎ केल्याचे समोर आले. या भेटीत दोघा ‎नेत्यांमधील चर्चेचा तपशील जाहीर झालेला ‎नाही खासदार संदिपान भुमरे यांनी अचानकपणे आंतरवाली सराटी गाठल्याने राजकीय ‎वर्तुळाच चर्चा झाली. जरांगे पाटील यांची भेट ‎मी नेहमीच भेट घेतो. या आधी जेव्हा जरांगे‎ उपोषणाला बसले होते, त्या वेळीही मी त्यांची‎भेट घेतली होती. समाजाच्या हितावर आमची‎चर्चा झाली, असे भुमरे म्हणाले.‎