दिल्लीत ‘आप’च्या मोहल्ला क्लिनिकमध्ये 70 % रुग्णांची केवळ मिनिटात तपासणी:दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर कॅगचे ताशेरे

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शुक्रवारी आरोग्यसेवेशी संबंधित महालेखापाल (कॅग) यांचा अहवाल विधानसभेत मांडला. पूर्वाश्रमीच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या कार्यकाळात रुग्णालयात गरजेची औषधी, सुविधांचा तुटवडा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, उपकरणांचा तुटवडा आणि निधीचा वापर झाला नसल्याने दिल्लीच्या आरोग्यसेवेचा डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे. मोहल्ला क्लिनिकमधील त्रुटीही निदर्शनास आल्या आहेत. आप सरकार कोरोना व्यवस्थापनात अपयशी ठरले. एवढेच नव्हे तर केंद्राने जारी केलेल्या ७८७.९१ कोटी रुपयांपैकी केवळ ५८२.८४ कोटी खर्च करण्यात आले. ७४ मोहल्ला क्लिनिकपैकी एकाही दवाखान्यात आवश्यक १६५ आैषधींचा साठा नव्हता. ऑक्सिमीटर, ग्लुकोमीटर, एक्स-रे व्ह्युअर, थर्मामीटर, रक्तदाब तपासणीचा मॉनिटरसारखी अत्यावश्यक उपकरणेही कमी होती. ४७ टक्के औषधी बाहेरून घ्यावी लागत होती

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment