दिव्य मराठी अपडेट्स:पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज युद्धनौकांचे लोकार्पण; महाराष्ट्रातील मंत्री, युतीच्या निवडक आमदारांशी संवाद साधणार
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज युद्धनौकांचे लोकार्पण मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवार, 15 जानेवारी रोजी मुंबईत येत अाहेत. या दौऱ्यात नौदलाच्या दोन युद्धनौका आणि एका पाणबुडी मोदींच्या हस्ते राष्ट्राला अर्पण केल्या जातील. नौदल डॉकयार्ड येथील या सोहळ्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्रातील मंत्री व महायुतीच्या निवडक आमदारांशी संवाद साधणार आहेत. विधानसभेतील विजयानंतर आता महायुतीचे लक्ष्य मुंबई सह राज्यातील महापालिका,जि.प.निवडणुका जिंकण्याचे असून त्यासाठी मोदी आमदारांना काय कानमंत्र देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे. सायंकाळी पंतप्रधानांच्या हस्ते इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे शिर्डीमध्ये भाजपपाठोपाठ अजित पवार गटाचे शिबिर मुंबई – 11, 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 18, 19 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणारे नियोजित दोन दिवसीय ‘नवसंकल्प शिबिर’ आता शिर्डी येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, या शिबिराला उपस्थित राहण्याचा आग्रह मोठ्या संख्येने पदाधिकारी करत आहेत. त्यांची भूमिका योग्य वाटली. वाढीव संख्येसाठी छत्रपती संभाजीनगरातील निवास व्यवस्था अपुरी पडत असल्याने शिर्डीचा पर्याय निवडला आहे. गोंदियाच्या जंगलात टी 14 वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू गोंदिया – जिल्ह्यातील दासगाव बीट, गोंदिया वनपरिक्षेत्रामधील कोहका- भानपूर परिसरात वाघाचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. मृत नर वाघ ‘टी 14 वाघिणी’चा अंदाजे 20 महिन्यांचा बछडा आहे. टी- 14 वाघीण आपल्या बछड्यांना घेऊन नागझिराच्या पूर्व भागात राहायची. काही दिवसांआधी हा बछडा दुसऱ्या मोठ्या नर वाघाच्या भीतीने वेगळया क्षेत्रात स्थलांतर झाल्याचे समजले होते. स्थळाची संपूर्ण पाहणी करून मृत वाघाला कुडवा येथील वन विभागाच्या उद्यान परिसरात आणून शवविच्छेदन केले. प्रथमदर्शी वाघ इन्फेक्शनने मृत झाल्याचे निदर्शनात आले. त्याचे अवयव प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. विमान प्रवाशाच्या पिशवीतून पावणेदोन लाख चोरीला पुणे – विमान प्रवाशाच्या पिशवीतून एक लाख 80 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. निगडीतील एक व्यावसायिक यमुनानगर भागात राहायला आहेत. ते कामानिमित्त दिल्लीला गेले होते. रविवारी (12 जानेवारी) सायंकाळी ते दिल्लीहून विमानाने पुण्याकडे निघाले. त्यांनी 1 लाख 80 हजारांची रोकड असलेली पिशवी विमानतळावर दिली. विमानातील सामान ठेवण्याच्या कप्प्यात पिशवी ठेवली. लोहगाव विमानतळावर ते रात्री 12 च्या सुमारास उतरून पिशवी ताब्यात घेतली असता त्यातील रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. विमान प्रवाशाच्या पिशवीतून पावणेदोन लाख चोरीला पुणे – विमान प्रवाशाच्या पिशवीतून एक लाख 80 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. निगडीतील एक व्यावसायिक यमुनानगर भागात राहायला आहेत. ते कामानिमित्त दिल्लीला गेले होते. रविवारी (12 जानेवारी) सायंकाळी ते दिल्लीहून विमानाने पुण्याकडे निघाले. त्यांनी 1 लाख 80 हजारांची रोकड असलेली पिशवी विमानतळावर दिली. विमानातील सामान ठेवण्याच्या कप्प्यात पिशवी ठेवली. लोहगाव विमानतळावर ते रात्री 12 च्या सुमारास उतरून पिशवी ताब्यात घेतली असता त्यातील रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. बडतर्फ पूजा खेडकरची सुप्रीम कोर्टामध्ये धाव नवी दिल्ली – बडतर्फ अायएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिने अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली अाहे. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेत बनावट प्रमाणपत्रांवर अोबीसी अाणि दिव्यांग प्रवर्गातून लाभ घेतल्याचा पूजावर अारोप अाहे. न्या. बी.व्ही. नागरत्न आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी बुधवार, 15जानेवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. 23 डिसेंबर 2024 रोजी पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला होता. यूपीएससी परीक्षेत पूजाने खोटी माहिती सादर केल्याचा अारोप अाहे. माध्यम क्षेत्रातील व्यवस्थापक संदीप विश्नोई यांचे निधन मुंबई – माध्यम क्षेत्रातील वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी संदीप विश्नोई (48) यांचे मंगळवारी ऋषिकेश (उत्तराखंड) येथे त्यांच्या मूळ गावी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. इंदूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर विश्नोई यांनी पुण्यातून उच्च शिक्षण पूर्ण केले. दिव्य मराठीसह अनेक मराठी, हिंदी दैनिकांत त्यांनी महत्त्वाच्या पदांवर सुमारे 19 वर्षे काम केले. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचे ते संवाद सल्लागारही होते. डावखुऱ्या लोकांसाठी त्यांनी ‘इंडिया लेफ्ट हँडेड क्लब’ ही संघटना स्थापना केली. यामार्फत 3 लाख लोकांसाठी ‘अल्बर्ट आइन्स्टाइन शिष्यवृत्ती’, ‘मदर तेरेसा डावखुरे सक्षमीकरण मोहीम’ आणि ‘लेफ्टीज गॉट टॅलेंट बुक’ असे उपक्रम राबवले. निराधार नागरिकांना मंडळांची मदत पुणे – मणिपूरमधील हिंसाचारामुळे सुमारे साठ हजार नागरिक तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये राहत आहेत. त्यांना सहकार्य करण्यासाठी पुण्यातील 35 पेक्षा अधिक गणेश मंडळांनी पुढाकार घेतला. यासह काही सामाजिक संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने 5 हजार ब्लँकेट्स आणि जेवणाच्या भांड्यांचे 5 हजार संच देणार आहेत. पुणे परिवार संस्थेच्या वतीने 15 जानेवारी रोजी 5.30 वाजता टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे हे वितरणाचा कार्यक्रम होईल. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, हेमंत रासने, विजय कुवळेकर उपस्थित राहणार आहेत. राज्यात बिबट्यांची नसबंदीकरणार, केंद्राकडे पाठवला प्रस्ताव : वनमंत्री नाईक मुंबई – बिबट्या व मानव संघर्षाला आळा घालण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारही सकारात्मक असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. बिबट्यांची नसबंदी करण्याचा विचार करण्यासंबंधी आमदार सत्यजित तांबे यांचे पत्र आले आहे. मानवी वस्तीत बिबटे शिरकाव करत असतील तर काही विशिष्ट उपाययोजना केल्या पाहिजेत. बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्राची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राच्या परवानगीसाठी हे पत्र पाठवण्यात आले असून, त्यासाठी केंद्रीय मंत्र्याचीही भेट घेतली जाईल, अशी माहिती नाईक यांनी दिली. दरम्यान, नागपूर येथील वाघांच्या मृत्युप्रकरणी चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात गेल्या वर्षी 2023-24 मध्ये 26 वाघांचा मृत्यू झाला आहे तर यंदा 13 वाघांचा मृत्यू झाला आहे. काही मृत्यू अपघाती आहेत, तर काही ठिकाणी डुकराची शिकार करण्याकरिता इलेक्ट्रिक वायर वापरण्यात आली होती. त्यात वाघ सापडल्याने मृत्यू झाला आहे. बॉम्ब धमकीचा ईमेल पाठवणारा अफजल गुरूच्या एनजीओशी संबंधित नवी दिल्ली – दिल्लीतील 400 हून अधिक शाळांना बनावट बॉम्बची धमकी 12 वीच्या विद्यार्थ्याने दिली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी मंगळवारी केला. यामध्ये गेल्या वर्षी 1 मे रोजी झालेल्या 350 धमक्यांचा समावेश आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याची ओळख पटवली आहे. त्याचे पालक एका एनजीओशी संबंधित असून ते एका राजकीय पक्षाला समर्थन देतात. या एनजीओने संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूलाही पाठिंबा दिला होता. पोलिसांनी पक्षाचे नाव उघड केले नाही. मात्र, ही एनजीओ आम आदमी पार्टीशी निगडित असल्याचा आरोप भाजपने केला आहे. इंडिगो विमानालाही बॉम्बची खोटी धमकी
मुंबई – गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची खोटी धमकी मिळाली होती. विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी रात्री फ्लाइट क्रमांक 6 ई 5101 मध्ये धमकीची नोट सापडली. यानंतर मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. मात्र, विमान उतरल्यानंतर तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. उदगीरला अज्ञात आजाराने39 कावळे दगावले लातूर / उदगीर – गेल्या 48 तासात उदगीर शहरातीलतीन ठिकाणी 39 कावळे मृतावस्थेतसापडले असून अन्य 3 कावळ्यांवरउदगीरच्या पशू सर्वचिकीत्सालयातउपचार करण्यात येत आहेत. उदगीरतहसीलदारांनी दिलेल्या आदेशानंतरमृत कावळ्यांच्या रक्ताचे नमुने पुणेयेथील पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेतपाठवण्यात आले आहेत.
उदगीर शहरातील महात्मा गांधीउद्यान, हुतात्मा स्मारक परिसर, शहरपोलीस ठाण्याचा आवार येथेकावळ्यांचा मोठा अधिवास आहे.परंतु मागील दोन दिवसांपासून अनेककावळे झाडांच्या खाली मृतावस्थेतपडलेले आढळून येत आहेत. या तीनठिकाणीच प्रशासनाला 39 कावळेमृतावस्थेत आढळून आल्यामुळे पशूवैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. पालम येथील सार्वजनिक शौचालयावर अतिक्रमण परभणी – पालम येथीलसार्वजनिक ठिकाणी अतिक्रमणकरण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासूनअतिक्रमण धारकाची मोठ्याप्रमाणात धावपळ सुरु आहे.अनेकांनी सार्वजनिक ठिकाणीअतिक्रमणासाठी विविध प्रकारचे साहित्य टाकूत शासकीय जमिनीवर खुणा मारल्या आहेत. याचधावपळीत एका अतिक्रमण धारकाने चक्क नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयावरच ताबा मिळवला अाहे. पालम येथील मुख्य चौकापासून ते महावितरण कंपनीचे कार्यालय व जायकवाडी वसाहतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून कब्जा करण्याच्या उद्देशाने दोन दिवसांपूर्वी धावपळ उडाली होती.त्या धावपळीमध्ये मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. पत्नीवर चाकूने वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न पुणे – बाणेर परिसरातील एका हाॅटेल मधील खाेलीत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करून तिला गंभीर जखमी करत, त्यानंतर पतीनेदेखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर परिसरात घडली. या घटनेत महिलेसह तिचा पती गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दाेघांची प्रकृती चिंताजनक अाहे. नसीमा मुल्ला ( 32), अमजद युसुफ मुल्ला ( 39, रा. चेंबूर, विष्णूनगर, मुंबई) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश कचरु लंके (वय 36, रा. ग्रॅव्हेंटाइन हाॅटेल, ज्युपिटर हाॅस्पिटलशेजारी, बाणेर) यांनी चतु:शृंगी (बाणेर) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद मुल्ला टेम्पोचालक असून त्याचे पत्नी नसीमा हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन सातत्याने वाद सुरु हाेते आज तिसरा वनडे : भारतीय महिलांची नजर वर्षातील पहिल्या क्लीन स्वीपकडे राजकोट – भारतीय महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंड यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता तिसरा सामना जिंकून वर्षातील पहिल्या मालिकेत क्लीन स्वीप करण्यावर त्याची नजर असेल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 14 वनडे सामने खेळले गेले आहेत आणि ते सर्व भारताने जिंकले. भारत आणि आयर्लंड यांच्यातील ही पाचवी वनडे मालिका आहे. भारताची सलामीवीर प्रतिका रावलने पहिल्या दोन्ही वनडेत अर्धशतके झळकावली. तिने व स्मृती मानधना सोबत पहिल्या गड्यासाठी दमदार भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. मानधनाच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे संघ मजबूत झाला आहे. जेमिमाह रॉड्रिग्जनेही आपली भूमिका चोख बजावली आहे.