एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मनसेनेबरोबर काही जागांवर युती:देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा युतीमध्ये समावेश होण्याबाबत मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर काही जागांवर युती होऊ शकते, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता माहीम विधानसभा मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्थ पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. इतकेच नाही तर राज ठाकरे यांनी अनेक मतदारसंघ उमेदवार देखील घोषित केले आहेत. मात्र विधानसभेमध्ये मनसे आणि युतीमध्ये समावेश होण्याची शक्यता अजूनही वर्तवली जात आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे या घटना घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. मात्र या निवडणुकीत त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही समोरासमोर लढत आहोत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमती दिली तर एक दोन ठिकाणी त्यांना मदत करणे सोपे होईल, त्यामुळे ते युतीचा एक भाग होऊ शकतात. त्यासाठी फडणवीस यांनी शिवडी सारख्या जागेचे उदाहरण देखील दिले. माहीमध्ये सर्वांचेच लक्ष माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार रिंगणात आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी देखील इथे उमेदवार दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात सदा सरवणकर यांनी माघार घेतल्यास अमित ठाकरे यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्यामुळे या घटना घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. संजय राऊत यांचा रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप:आमचे फोन आजही टॅप होत असल्याचा दावा; राज ठाकरेंवरही साधला निशाणा राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी आम्ही निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून केली आहे. मात्र, तरी देखील निर्णय घेतला जात नाही. रश्मी शुक्ला या आमच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. पूर्ण बातमी वाचा…. प्रमोद महाजन यांना सख्ख्या भावानेच का घातल्या गोळ्या?:मोदी आणि वाघेला यांच्यात समेट घडवला; भाजपचे चाणक्य म्हटले जायचे 1995-96 मध्ये प्रमोद महाजन यांनी चतुराईने शंकरसिंह वाघेला आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष काही काळासाठी लांबवला होता. नंतर प्रमोद महाजन यांना अटलबिहारी वाजपेयी यांनी लक्ष्मण ही उपाधी दिली. आज ‘महाराष्ट्रातील दिग्गज’ मालिकेत भाजपचे चाणक्य म्हणवले जाणारे प्रमोद महाजन यांची कहाणी… वाचा पूर्ण बाातमी….