दुःख कैसे फूल झाले:वाचा दिली, प्रेम दिले, पंख दिले, उडण्याचे बळ दिले; ऐकू न येणाऱ्या मुलांचा ‘उत्कर्ष’ साधणारा विघ्नहर्ता!

दुःख कैसे फूल झाले:वाचा दिली, प्रेम दिले, पंख दिले, उडण्याचे बळ दिले; ऐकू न येणाऱ्या मुलांचा ‘उत्कर्ष’ साधणारा विघ्नहर्ता!

आपली मुलगी साडेतीन वर्षांची झाल्यावर त्यांना कळाले की ती ऐकू शकत नाही. आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. आपल्या लेकीचे कसे होणार, तिचे बोबडे बोल आपण कधीच ऐकू शकणार नाही का, अशा अनेक विचारांचे मळभ त्यांच्या मनात दाटून आले. घरातली परिस्थितीही हलाखीची होती. त्यांना उत्कर्ष या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षण केंद्राची माहिती मिळाली. त्यांनी मुलीला याठिकाणी आणले. पहिल्याच दिवसापासून तिच्यात सकारात्मक बदल जाणवू लागला. पुढे ती सामान्य मुलांच्या शाळेतही गेली. 10 व्या इयत्तेत 88 टक्के मिळवले. आज ती पदवीचे शिक्षण घेत आहे. परवीन खान यांनी कातर स्वरात आपलांचा अनुभव सांगितला. विघ्नहर्ता सिरीजच्या नवव्या भागासाठी मी उत्कर्ष या संस्थेत पोहोचले. शेकडो मुलांच्या आयुष्यातले संकट निवारण करणारी उत्कर्ष ही संस्था खऱ्या अर्थाने कित्येक वर्षांपासून विघ्नहर्त्याची भूमिका निभावत आहे. परवीन यांची मुलगी मुस्कान आज सर्वसामान्य मुलींप्रमाणेच आपले आयुष्य जगत आहे. आणि याचे श्रेय त्या ‘उत्कर्ष’ला देतात. सगळीकडे गडद अंधार दाटलेला असताना ‘उत्कर्ष’ त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनूल आले. आणि त्यांच्यासह मुलगी मुस्कानचेही आयुष्य बदलले. आपली मुलगी बोलू शकेल का हा एकच प्रश्न घेऊन त्या संस्थेत आल्या. जिद्द आणि परिश्रमांनी मुस्कान बोलायली लागली. परवीन देखील आज याच प्रशिक्षण केंद्रात कर्णबधिर मुलांना शिकवतात. शिकवताना त्या मुलांमध्ये अगदी रमून जातात. याठिकाणी 0 ते 6 वयोगटातील मुलांना प्रशिक्षण दिले जाते व त्यानंतर ही मुले सामान्य शाळेत प्रवेश घेऊन सर्वसामान्य मुलांसोबत शिकू शकतात. विशेष बाब म्हणजे संस्था सर्व महिला चालवतात. याठिकाणी संस्थापक, शिक्षिका, संचालक मंडळ, साफसफाई कर्मचारी सर्व महिला आहेत. 1999 मध्ये ‘उत्कर्ष’चा प्रारंभ अंधत्व, अपंगत्व, तिरळेपणा हे शारीरिक व्यंग बघताक्षणी दिसून येतात. पण, कर्णबधिरपणा हे अदृश्य असे व्यंग आहे. समाजात वावरताना देहबोली स्पष्ट असल्याने अनेकदा गरज असूनही अशा व्यक्ती दुर्लक्षित राहतात. मात्र, आंतरकर्णामध्ये दोष असल्याने कर्णबधिरत्व आलेल्या या व्यक्तींना समाजाकडून साथ मिळण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या कुटुंबांमध्येही या व्यंगाविषयी प्रबोधनाची करण्याची मोठी गरज असल्याचे ‘उत्कर्ष’च्या संस्थापक नीता देवळाणकर, कविता अग्निहोत्री यांच्या लक्षात आले. नीता देवळाणकर यांनी मुंबईला जाऊन विशेष प्रशिक्षण घेतले. 1999 मध्ये ‘उत्कर्ष’चा प्रारंभ झाला. विद्यार्थीनी झाली शिक्षिका ‘उत्कर्ष’ची सुरुवात झाली. मात्र मराठवाड्यात तोपर्यंत कर्णबधिर मुलांविषयी जागरुकता नव्हती. हे मुलही बोलू शकतात. सामान्य मुलांप्रमाणे आपले आयुष्य जगू शकतात. हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. त्यावेळी अवघ्या एका मुलीला घेऊन ‘उत्कर्ष’ची शाळा सुरु झाली. एकावर सुरु झालेला हा प्रवास आज शेकडो विद्यार्थ्यांच्याही पुढे गेलाय. संस्थेतून बाहेर पडणारी मुले विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे ‘उत्कर्ष’ची पहिली विद्यार्थीनी नेहा पाटणी आज संस्थेतच कार्यरत आहे. फाईन आर्टसचे शिक्षण घेतलेली नेहा येथे मुलांना हस्तकला शिकवते. नेहाला बालश्री पुरस्कार मिळाल्याचे मुख्याध्यापिका अपर्णा वैद्य अभिमानाने सांगतात. प्रत्येकाची गोष्ट वेगळी मुख्याध्यापिका अपर्णा वैद्य आपली एक विद्यार्थीनी रेणुकाचा अनुभव सांगतात. त्या म्हणाल्या, ‘आमच्या संस्थेत आलेली रेणुका कर्णबधिर होती. पण तिचे आई-वडिलही कर्णबधिर होते. ते दोघंही बोलू शकत नाही. कारण त्यावेळी जागरुकता नसल्याने त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. आपल्या मुलीच्या वाट्यालाही आपल्या सारखेच आयुष्य आले, यामुळे दोघेही हतबल झाले होते. त्यांनी रेणुकाला आपल्या संस्थेत दाखल केलं. इथे ती रुळु लागली. तिच्यात बदल होत होते. आणि ज्यादिवशी तिने पहिला शब्द उच्चारला त्यादिवशी तिच्या आई-वडिलांचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्यांना झालेला आनंद मी शब्दात मांडूच शकत नाही.’ अपर्णा वैद्य पुढे म्हणाल्या, संस्थेत असे खूप अनुभव आहेत. प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. 250 मुले आसामान्य शाळेत ‘उत्कर्ष’मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लेव्हलमध्ये प्रवेश दिला जातो. त्यानुसार त्यांना प्रशिक्षित केले जाते. पहिली लेव्हल ही 0.1 ची आहे. यात सुरुवातीला मुल आले की त्याला बसण्याची सवय केली जाते. त्यानुसार मशीन लावून ऐकण्याची सवय केली जाते. त्यानंतर त्यांना स्वर शिकवले जातात. ज्यामध्ये प्राणी, पक्ष्यांचे आवाज ऐकवून त्यांची श्रवण क्षमता विकसित केली जाते. टाळ, खंजीरी, शिट्टी हे आवाज ऐकवले जातात. आपली मुले सामान्य शाळेत जावीत यासाठी उत्कर्षचा विशेष प्रयत्न असतो. या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर यशही आले आहे. उत्कर्षची 250 मुले आज सामान्य शाळेत जाऊन शिक्षण घेतात. सामान्य मुलांप्रमाणे धम्माल करतात. मस्ती करतात. यापाठिमागे ‘उत्कर्ष’ची अपार मेहनत आहे. प्रबोधनाची गरज कर्णबधिरांसाठी असलेल्या विशेष शाळांमध्ये त्यांना योग्य वयात घातल्यास काही प्रमाणात सक्षम होण्यास या व्यक्तींना मदत होते. मात्र, याविषयी प्रबोधनाच्या अभावामुळे या व्यक्तींना पुढे हे व्यंग घेऊनच आयुष्य कंठावे लागते. त्यांना ऐकायचे ज्ञान मिळाले तरी त्यांना बोलायचे ज्ञान मिळालेले नसते. मशिन्सचा आधार घेऊन या व्यक्तींना ऐकू आले तरी त्यांच्यात भाषिक मागासलेपण तसेच राहते. त्यांच्यातील भाषेच्या विकासासाठी कर्णबधिर शाळा मदतशीर ठरत आहेत. मात्र, या शाळांचा रस्ता दाखवण्यासाठी प्रबोधनाची गरज असल्याचे मत ‘उत्कर्ष’ने व्यक्त केले. जागेचा शोध सुरु ‘उत्कर्ष’च्या कोषाध्यक्ष सुचिता देशमुख म्हणाल्या, ‘उत्कर्ष’मध्ये आम्ही सर्व महिला आहोत. महिला ही संस्था चालवतात. सध्या संस्था भाड्याच्या जागेत आहे. संस्थेला कर्णबधिर मुलांसाठी आणखी काम करायचे आहे. मात्र त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. संस्था शासनमान्य तर आहे मात्र संस्थेला शासनाचे कुठलेही अनुदान नाही. दात्यांच्या मदतीवर संस्थेचा गाडा चालतो. सध्या तरी आम्ही जागेच्या शोधात आहोत. विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या पदांवर मुख्याध्यापिका अपर्णा वैद्य म्हणाल्या, आमच्या शाळेत 0 ते 6 वर्षांपर्यंतची मुले आहेत. 0 ते 3 वर्षाच्या मुलांना आम्ही आवाज ऐकण्याचे प्रशिक्षण देतो. तर 3 ते 6 पर्यंतच्या मुलांना आवाज काढणे, शब्द, वाक्य, चित्रकला, हस्तकला हे सर्व शिकवले जाते. आमच्याकडे 4 वर्ष शिकल्यानंतर ही मुले पुढे सामान्य शाळेत प्रवेश मिळवतात. सामान्य शाळेत गेल्यानंतरही मुले अभ्यासातील अडचणींसाठी आमच्याकडे येतात. उत्कर्षमध्ये मौखिक पद्धतीने शिकवले जातात. पालकांनाही याबाबत प्रशिक्षण दिले जाते. उत्कर्ष प्रशिक्षण केंद्रातून शिकून गेलेली मुले आज विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. कर्णबधिरपणा म्हणजे काय? ध्वनीलहरींचे वहन आंतरकर्णांपासून मेंदूपर्यंत पोहोचत नसल्याने कर्णबधिरपणा येतो. बाळ जन्माला येताच आईला तो देत असलेल्या प्रतिसादावरून त्याचे दिसणे, ऐकू येणे या क्षमतांची जाणीव होते. कर्णबधिर बाळ जन्मतःच प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्या व्यंगाविषयीदेखील ही जाणीव होते. परंतु, यावरील उपचारांविषयी पुरेशी माहिती नसल्याने त्या बाळावर त्यादृष्टीने उपाय केले जात नाहीत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 32 कोटी 80 लाख इतक्या व्यक्तींना कर्मबधिरत्त्व आहे. हे प्रमाण एकूण टक्केवारीच्या 5 टक्के इतके आहे. भारतात हे प्रमाण 0.1 टक्के इतके आहे. कर्णबधिर मुल बोलू शकते. मात्र जन्मजात कर्णबधिर बालकांना लहान वयात ओळखले पाहिजे. त्यांना संस्थेत आणले पाहिजे. अशा मुलांच्या पालकांना आमच्या संस्थेची माहिती देणे आवश्यक आहे. नवजात कर्णबधिर शिशू वयाच्या 6-7 वर्षांपर्यंतच्या काळात योग्य वैद्यकीय उपचार, श्रवणयंत्र, कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया व स्पीच थेरपीच्या मदतीने बोलू लागतात. या अबोल, कोवळ्या मुलांना दया नको. तर त्यांना हवी आहे संधी. स्वावलंबी व स्वतंत्र जीवन जगण्याची. आत्मविश्वासाने जगात वावरण्याची. आपल्या गुणांचा विकास करण्याची. इतरांच्या बरोबरीने माणूस म्हणून जगण्याची! या वस्तुस्थितीला व सत्याला सामोरे जात कर्णबधीर मुलांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवणारी मराठवाड्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणजे ‘उत्कर्ष’….!

​आपली मुलगी साडेतीन वर्षांची झाल्यावर त्यांना कळाले की ती ऐकू शकत नाही. आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. आपल्या लेकीचे कसे होणार, तिचे बोबडे बोल आपण कधीच ऐकू शकणार नाही का, अशा अनेक विचारांचे मळभ त्यांच्या मनात दाटून आले. घरातली परिस्थितीही हलाखीची होती. त्यांना उत्कर्ष या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षण केंद्राची माहिती मिळाली. त्यांनी मुलीला याठिकाणी आणले. पहिल्याच दिवसापासून तिच्यात सकारात्मक बदल जाणवू लागला. पुढे ती सामान्य मुलांच्या शाळेतही गेली. 10 व्या इयत्तेत 88 टक्के मिळवले. आज ती पदवीचे शिक्षण घेत आहे. परवीन खान यांनी कातर स्वरात आपलांचा अनुभव सांगितला. विघ्नहर्ता सिरीजच्या नवव्या भागासाठी मी उत्कर्ष या संस्थेत पोहोचले. शेकडो मुलांच्या आयुष्यातले संकट निवारण करणारी उत्कर्ष ही संस्था खऱ्या अर्थाने कित्येक वर्षांपासून विघ्नहर्त्याची भूमिका निभावत आहे. परवीन यांची मुलगी मुस्कान आज सर्वसामान्य मुलींप्रमाणेच आपले आयुष्य जगत आहे. आणि याचे श्रेय त्या ‘उत्कर्ष’ला देतात. सगळीकडे गडद अंधार दाटलेला असताना ‘उत्कर्ष’ त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनूल आले. आणि त्यांच्यासह मुलगी मुस्कानचेही आयुष्य बदलले. आपली मुलगी बोलू शकेल का हा एकच प्रश्न घेऊन त्या संस्थेत आल्या. जिद्द आणि परिश्रमांनी मुस्कान बोलायली लागली. परवीन देखील आज याच प्रशिक्षण केंद्रात कर्णबधिर मुलांना शिकवतात. शिकवताना त्या मुलांमध्ये अगदी रमून जातात. याठिकाणी 0 ते 6 वयोगटातील मुलांना प्रशिक्षण दिले जाते व त्यानंतर ही मुले सामान्य शाळेत प्रवेश घेऊन सर्वसामान्य मुलांसोबत शिकू शकतात. विशेष बाब म्हणजे संस्था सर्व महिला चालवतात. याठिकाणी संस्थापक, शिक्षिका, संचालक मंडळ, साफसफाई कर्मचारी सर्व महिला आहेत. 1999 मध्ये ‘उत्कर्ष’चा प्रारंभ अंधत्व, अपंगत्व, तिरळेपणा हे शारीरिक व्यंग बघताक्षणी दिसून येतात. पण, कर्णबधिरपणा हे अदृश्य असे व्यंग आहे. समाजात वावरताना देहबोली स्पष्ट असल्याने अनेकदा गरज असूनही अशा व्यक्ती दुर्लक्षित राहतात. मात्र, आंतरकर्णामध्ये दोष असल्याने कर्णबधिरत्व आलेल्या या व्यक्तींना समाजाकडून साथ मिळण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या कुटुंबांमध्येही या व्यंगाविषयी प्रबोधनाची करण्याची मोठी गरज असल्याचे ‘उत्कर्ष’च्या संस्थापक नीता देवळाणकर, कविता अग्निहोत्री यांच्या लक्षात आले. नीता देवळाणकर यांनी मुंबईला जाऊन विशेष प्रशिक्षण घेतले. 1999 मध्ये ‘उत्कर्ष’चा प्रारंभ झाला. विद्यार्थीनी झाली शिक्षिका ‘उत्कर्ष’ची सुरुवात झाली. मात्र मराठवाड्यात तोपर्यंत कर्णबधिर मुलांविषयी जागरुकता नव्हती. हे मुलही बोलू शकतात. सामान्य मुलांप्रमाणे आपले आयुष्य जगू शकतात. हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. त्यावेळी अवघ्या एका मुलीला घेऊन ‘उत्कर्ष’ची शाळा सुरु झाली. एकावर सुरु झालेला हा प्रवास आज शेकडो विद्यार्थ्यांच्याही पुढे गेलाय. संस्थेतून बाहेर पडणारी मुले विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे ‘उत्कर्ष’ची पहिली विद्यार्थीनी नेहा पाटणी आज संस्थेतच कार्यरत आहे. फाईन आर्टसचे शिक्षण घेतलेली नेहा येथे मुलांना हस्तकला शिकवते. नेहाला बालश्री पुरस्कार मिळाल्याचे मुख्याध्यापिका अपर्णा वैद्य अभिमानाने सांगतात. प्रत्येकाची गोष्ट वेगळी मुख्याध्यापिका अपर्णा वैद्य आपली एक विद्यार्थीनी रेणुकाचा अनुभव सांगतात. त्या म्हणाल्या, ‘आमच्या संस्थेत आलेली रेणुका कर्णबधिर होती. पण तिचे आई-वडिलही कर्णबधिर होते. ते दोघंही बोलू शकत नाही. कारण त्यावेळी जागरुकता नसल्याने त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. आपल्या मुलीच्या वाट्यालाही आपल्या सारखेच आयुष्य आले, यामुळे दोघेही हतबल झाले होते. त्यांनी रेणुकाला आपल्या संस्थेत दाखल केलं. इथे ती रुळु लागली. तिच्यात बदल होत होते. आणि ज्यादिवशी तिने पहिला शब्द उच्चारला त्यादिवशी तिच्या आई-वडिलांचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्यांना झालेला आनंद मी शब्दात मांडूच शकत नाही.’ अपर्णा वैद्य पुढे म्हणाल्या, संस्थेत असे खूप अनुभव आहेत. प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. 250 मुले आसामान्य शाळेत ‘उत्कर्ष’मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लेव्हलमध्ये प्रवेश दिला जातो. त्यानुसार त्यांना प्रशिक्षित केले जाते. पहिली लेव्हल ही 0.1 ची आहे. यात सुरुवातीला मुल आले की त्याला बसण्याची सवय केली जाते. त्यानुसार मशीन लावून ऐकण्याची सवय केली जाते. त्यानंतर त्यांना स्वर शिकवले जातात. ज्यामध्ये प्राणी, पक्ष्यांचे आवाज ऐकवून त्यांची श्रवण क्षमता विकसित केली जाते. टाळ, खंजीरी, शिट्टी हे आवाज ऐकवले जातात. आपली मुले सामान्य शाळेत जावीत यासाठी उत्कर्षचा विशेष प्रयत्न असतो. या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर यशही आले आहे. उत्कर्षची 250 मुले आज सामान्य शाळेत जाऊन शिक्षण घेतात. सामान्य मुलांप्रमाणे धम्माल करतात. मस्ती करतात. यापाठिमागे ‘उत्कर्ष’ची अपार मेहनत आहे. प्रबोधनाची गरज कर्णबधिरांसाठी असलेल्या विशेष शाळांमध्ये त्यांना योग्य वयात घातल्यास काही प्रमाणात सक्षम होण्यास या व्यक्तींना मदत होते. मात्र, याविषयी प्रबोधनाच्या अभावामुळे या व्यक्तींना पुढे हे व्यंग घेऊनच आयुष्य कंठावे लागते. त्यांना ऐकायचे ज्ञान मिळाले तरी त्यांना बोलायचे ज्ञान मिळालेले नसते. मशिन्सचा आधार घेऊन या व्यक्तींना ऐकू आले तरी त्यांच्यात भाषिक मागासलेपण तसेच राहते. त्यांच्यातील भाषेच्या विकासासाठी कर्णबधिर शाळा मदतशीर ठरत आहेत. मात्र, या शाळांचा रस्ता दाखवण्यासाठी प्रबोधनाची गरज असल्याचे मत ‘उत्कर्ष’ने व्यक्त केले. जागेचा शोध सुरु ‘उत्कर्ष’च्या कोषाध्यक्ष सुचिता देशमुख म्हणाल्या, ‘उत्कर्ष’मध्ये आम्ही सर्व महिला आहोत. महिला ही संस्था चालवतात. सध्या संस्था भाड्याच्या जागेत आहे. संस्थेला कर्णबधिर मुलांसाठी आणखी काम करायचे आहे. मात्र त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. संस्था शासनमान्य तर आहे मात्र संस्थेला शासनाचे कुठलेही अनुदान नाही. दात्यांच्या मदतीवर संस्थेचा गाडा चालतो. सध्या तरी आम्ही जागेच्या शोधात आहोत. विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या पदांवर मुख्याध्यापिका अपर्णा वैद्य म्हणाल्या, आमच्या शाळेत 0 ते 6 वर्षांपर्यंतची मुले आहेत. 0 ते 3 वर्षाच्या मुलांना आम्ही आवाज ऐकण्याचे प्रशिक्षण देतो. तर 3 ते 6 पर्यंतच्या मुलांना आवाज काढणे, शब्द, वाक्य, चित्रकला, हस्तकला हे सर्व शिकवले जाते. आमच्याकडे 4 वर्ष शिकल्यानंतर ही मुले पुढे सामान्य शाळेत प्रवेश मिळवतात. सामान्य शाळेत गेल्यानंतरही मुले अभ्यासातील अडचणींसाठी आमच्याकडे येतात. उत्कर्षमध्ये मौखिक पद्धतीने शिकवले जातात. पालकांनाही याबाबत प्रशिक्षण दिले जाते. उत्कर्ष प्रशिक्षण केंद्रातून शिकून गेलेली मुले आज विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. कर्णबधिरपणा म्हणजे काय? ध्वनीलहरींचे वहन आंतरकर्णांपासून मेंदूपर्यंत पोहोचत नसल्याने कर्णबधिरपणा येतो. बाळ जन्माला येताच आईला तो देत असलेल्या प्रतिसादावरून त्याचे दिसणे, ऐकू येणे या क्षमतांची जाणीव होते. कर्णबधिर बाळ जन्मतःच प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्या व्यंगाविषयीदेखील ही जाणीव होते. परंतु, यावरील उपचारांविषयी पुरेशी माहिती नसल्याने त्या बाळावर त्यादृष्टीने उपाय केले जात नाहीत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 32 कोटी 80 लाख इतक्या व्यक्तींना कर्मबधिरत्त्व आहे. हे प्रमाण एकूण टक्केवारीच्या 5 टक्के इतके आहे. भारतात हे प्रमाण 0.1 टक्के इतके आहे. कर्णबधिर मुल बोलू शकते. मात्र जन्मजात कर्णबधिर बालकांना लहान वयात ओळखले पाहिजे. त्यांना संस्थेत आणले पाहिजे. अशा मुलांच्या पालकांना आमच्या संस्थेची माहिती देणे आवश्यक आहे. नवजात कर्णबधिर शिशू वयाच्या 6-7 वर्षांपर्यंतच्या काळात योग्य वैद्यकीय उपचार, श्रवणयंत्र, कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया व स्पीच थेरपीच्या मदतीने बोलू लागतात. या अबोल, कोवळ्या मुलांना दया नको. तर त्यांना हवी आहे संधी. स्वावलंबी व स्वतंत्र जीवन जगण्याची. आत्मविश्वासाने जगात वावरण्याची. आपल्या गुणांचा विकास करण्याची. इतरांच्या बरोबरीने माणूस म्हणून जगण्याची! या वस्तुस्थितीला व सत्याला सामोरे जात कर्णबधीर मुलांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवणारी मराठवाड्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणजे ‘उत्कर्ष’….!  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment