एकनाथ शिंदेंचा कसा मान राखायचा हे दिल्लीने ठरवावे:आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध केले, दीपक केसरकरांचे सूचक विधान

एकनाथ शिंदेंचा कसा मान राखायचा हे दिल्लीने ठरवावे:आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध केले, दीपक केसरकरांचे सूचक विधान

आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सुद्धा सिद्ध करुन दाखवलं. आता त्यांचा कसा मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, आम्ही ठरवणार नाहीत, असे सूचक विधान शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. दीपक केसरकर म्हणाले, 5 तारखेला शपत विधी होणार आहे, पण अनेक तर्क वितर्क लावले जात असल्याने मी ही पत्रकार परिषद घेत आहेत. भाजपची निवड प्रकिया कधी व्हावी हा भाजपचा विषय आहे. तरी आज बैठक रद्द वैगरे ह्या बातम्या येत आहेत. आज कोणतीही बैठक नव्हती. त्यांची तब्येत ठीक नाही. भाजपकडून जो काही निर्णय होइल तो मान्य असेल हे त्यांनी आधीच सांगितले आहे, असे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले आहे. पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, विरोधकांना अतिशय कमी जागा मिळाल्या. युतीची महायुती झाली. विरोधक आता वेगवेगळे कारण शोधत आहेत. काहीतरी तर्क काढायचा आणि बातमी बनवायची हे थांबलं पाहिजे. पक्षातल्या नेत्यांनी पण कमेंट करणे थांबवले पाहिजे. तसेच आमच्याकडून कोणताही उशीर झालेला नाही असेही केसरकर म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले, आमची एकच मागणी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाहीत. आम्ही सगळ्यांसोबत एकत्र काम केल आहे. मी फडणवीसांना मेसेज केला, की महायुतीची सत्ता येत आहे. पण मैदानाची पाहाणी करायला एकच पक्ष जातात. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज गेला आहे. कळवले असते तर आम्हीही आलो असतो. तसेच जनतेने गैरसमज करु नये, आम्ही शंभर टक्के एकत्र आहोत, असे दीपक केसरकर म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment