आमदार मुंबईत, मंत्रिपदासाठी फिल्डिंग:लंघे शिंदे सेनेकडून, विखे भाजप तर आमदार जगताप दादांकडून रांगेत
विधानसभा निवडणुकीनंतर विजयी आमदारांनी मुंबईगाठली असून, नव्या कारभाऱ्यांना मंत्रिपदाचे वेध लागलेआहेत. इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच असल्याने,मंत्रीपदाची हौस पुरवताना महायुतीतील श्रेष्ठींची,दमछाक होणार आहे. जिल्ह्यात शिंदे सेनेसह दादांच्याराष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक मंत्रिपदासाठी प्रयत्न होतअसतानाच, भाजपकडूनही दोन मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरूआहेत. तीस वर्षानंतर आ. संग्राम जगतापांच्या रूपाने नगर शहराला मंत्रिपदाची अपेक्षा आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळात, पहिल्या यादीत जिल्ह्यातील कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचे आमदार मुंबईला गेले आहेत. सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला अाहे. मंगळवारी (२६ नोव्हेंबर) नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो, असा अंदाज आहे. तत्पूर्वी महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.पाच ते सहा आमदारांमागे एक मंत्रीपदअसे सूत्र ठरवल्यास जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळतील,पण जिल्ह्याचे राजकीय महत्व पाहता तीन मंत्रीपदे जिल्ह्याच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. नेवासेत ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने धक्का दिला. तेथे प्रभाव वाढवण्यासाठी शिंदेंकडून लंघेंना बळदेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. दुसरीकडे जायंट किलरठरलेले अमोल खताळ हे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्येआहेत, पण त्यांची पहिलीच टर्म आहे. मागील तीसवर्षांपासून मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्याअहिल्यानगरवासीयांना आ. संग्राम जगताप यांच्या रुपानेमंत्रिपद मिळून, शहर विकासाला चालना मिळेल अशीअपेक्षा आहे. उत्तरेतून दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिल्या यादीत कोण घेणार शपथ
सरकार स्थापनेवेळी पहिल्या यादीतभाजपचे दहा, राष्ट्रवादी पाच,शिवसेनेचे पाच आमदार मंत्रिपदाचीशपथ घेतील, अशी माहिती आहे.भाजपची यादी समोर आली नसली,तरी त्यात विखेंचा समावेशअसल्याचे बोलले जात आहे. शिंदेंचीशिवसेना व दादांच्या राष्ट्रवादीकडूनकोणत्या आमदाराची वर्णी लागेल हेपाहणे औत्सुक्याचे आहे. राजळेंच्या रूपाने महिलेला संधी मिळणार का ? जिल्ह्यात महायुतीला दहा जागांवर यशमिळाले, पक्षीय बलाबल पाहताभाजपकडून सलग आठव्यांदा राधाकृष्णविखे, शिवाजी कर्डिले, विक्रम पाचपुते,मोनिका राजळे विजयी झाले. शिंदेसेनेकडून अमोल खताळ, विठ्ठल लंघे,दादांच्या राष्ट्रवादीतून आ. संग्रामजगताप, आशुतोष काळे, काशिनाथदाते, किरण लहामटे विजयी झाले.त्यामुळे मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा आहे. ५ वर्षांत जिल्ह्यात ५ मंत्री २०१९ च्या विधानसभानिवडणुकीनंतर आघाडीसरकारच्या काळात महसूलमंत्रीपदबाळासाहेब थोरात, पालकमंत्रीपदहसन मुश्रीफांकडे होते. तर शंकरगडाख, प्राजक्त तनपुरे यांनाही मंत्रीपदे होती. त्यानंतर राजकीयउलथापालथ होऊन, सत्तेतआलेल्या महायुतीच्या काळातएकमेव राधाकृष्ण विखे यांच्याकडेमंत्रिपद राहिले. आशुतोष काळे दावेदार मानले जातअसल्याने, रस्सीखेच दिसून येते.भाजपमध्ये विखेंच्या गळ्यातमंत्रिपदाची माळ पडेल, यात शंकानाही. पण भाजपकडून माजी मंत्रीशिवाजी कर्डिले, पाथर्डीत हॅट्रिककरणाऱ्या मोनिका राजळेमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.कर्डिलेंच्या शुभेच्छा बॅनरवर अनेकठिकाणी लाल दिव्यांची गाडीदाखवून मंत्रीपदावर दावा ठोकण्यातआला आहे. नवीन राजकीयसमिकरणे जुळवताना, महायुतीभक्कम करण्यासाठी नव्या दमाच्याआमदारांना बळ देऊ शकते,असाही अंदाज वर्तवला जात आहे.शिंदे सनेच्या सर्व आमदारांसमवेतकालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीचर्चा केली आहे. त्यावेळी आ. लंघेयांनीही मंत्री शिंदे यांची भेटघेतल्याची माहिती समजली.