भारतीय-चीनी सैन्याची पूर्व लडाखमधून माघार घेण्यास सुरुवात:4 दिवसांपूर्वी झाला करार, गस्त घालण्यावर सहमती; दोन्ही देश 2020 ची स्थिती पूर्ववत करतील
पूर्व लडाख सेक्टरमधील डेमचोक आणि डेपसांग येथून भारतीय आणि चिनी सैन्याच्या माघारीला सुरुवात झाली आहे. 4 दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये मोठा करार झाला होता. दोन्ही देशांमधील करारानुसार भारतीय सैनिकांनी त्यांची वाहने आणि दारूगोळा परत आणण्यास सुरुवात केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारतीय सैनिक माघारल्याची माहिती मिळाली. यापूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते की, भारत आणि चीन...