युगेंद्र पवारांकडून आजीचे तर जय पवारांकडून श्रीनिवास पवारांचे आशीर्वाद:बारामतीमध्ये पुन्हा लोकसभेचा कित्ता की दादांना संधी?

युगेंद्र पवारांकडून आजीचे तर जय पवारांकडून श्रीनिवास पवारांचे आशीर्वाद:बारामतीमध्ये पुन्हा लोकसभेचा कित्ता की दादांना संधी?

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात हॉट सीट म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांची पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आज मतदानाच्या दिवशी युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जात आपल्या आजीचे आशीर्वाद घेतले. तर दुसरीकडे जय पवार यांनी देखील युगेंद्र पवार यांचे वडील आणि आपले काका श्रीनिवास पवार...

जयपूर-डेहराडून विमानाचे इंजिन 18 हजार फूट उंचीवर बिघडले:विमानात 70 प्रवासी, 30 मिनिटे जीव टांगणीला; दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग

जयपूर-डेहराडूनच्या इंडिगो एअरलाइन्सच्या (6E-7468) विमानाचे इंजिन 18 हजार फुटांवर निकामी झाले. विमानात 70 प्रवासी होते. विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान सुमारे 30 मिनिटे हवेतच राहिले. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वास्तविक, इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट 19 नोव्हेंबर रोजी जयपूर विमानतळावरून संध्याकाळी 5:55 वाजता डेहराडूनसाठी टेक ऑफ करणार होते,...

अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील:जय पवार यांचा दावा; तेच किंगमेकर राहणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील:जय पवार यांचा दावा; तेच किंगमेकर राहणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी केला आहे. आगामी निकालानंतर अजित पवार हे राज्यात किंग मेकर असतील. तसेच तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असे जय पवार यांनी म्हटले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्वात हॉट सीट म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जात...

राज-शर्मिला ठाकरेंचे मतदान:’अमित’च्या रुपाने चांगला उमेदवार मिळाल्याचा आनंद; तर तावडेंच्या प्रकारावर राज यांचे मौन

राज-शर्मिला ठाकरेंचे मतदान:’अमित’च्या रुपाने चांगला उमेदवार मिळाल्याचा आनंद; तर तावडेंच्या प्रकारावर राज यांचे मौन

आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असल्याचे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. अमित ठाकरे यांच्या रुपाने मतदारसंघाला एक चांगला उमेदवार लोकांना मिळाला, याचा आनंद त्यांना वाटत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळेच येथील मतदार हे आमच्यासाठी संवाद साधत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माहिम...

दिल्लीच्या हवेत थोडी सुधारणा, AQI 450 वर:79 उड्डाणे उशिराने, CJI म्हणाले- कोर्टाने हायब्रिड मोडवर काम करावे

बुधवारीही दिल्लीतील हवा विषारी होती. सकाळी 6 वाजता, अनेक भागात AQI ने 450 ओलांडल्याची नोंद केली, जी ‘अतिशय गंभीर प्लस’ श्रेणीत येते. मात्र, मंगळवारी हा आकडा 500 होता. शहरातील सर्वात प्रदूषित क्षेत्र मुंडका (464) होते. तर, वजीरपूर आणि अलीपूरमध्ये AQI 462 ची नोंद झाली. प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या धुक्यामुळे पालमसह काही भागात दृश्यमानता 150 मीटरपर्यंत घसरली. त्यामुळे ७९ उड्डाणे उशिराने तर...

दिव्य मराठी अपडेट्स:‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन

दिव्य मराठी अपडेट्स:‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची आज प्रक्षाळपूजा, राजोपचार पूर्ववत पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची बुधवारी (20 नोव्हेंबर) प्रक्षाळपूजा होत आहे. श्रींचे 24 तास सुरू असणारे दर्शन बुधवारपासून बंद होऊन सर्व नित्य राजोपचार सुरू होणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी संपन्न झाली, तर 4 नोव्हेंबरपासून श्रींचा...

5 राज्यांमधील 15 विधानसभा आणि 1 लोकसभेच्या जागेवर आज पोटनिवडणूक:भाजप, सपा आणि काँग्रेस 4-4 जागांवर होते, नांदेड लोकसभा काँग्रेसकडे होती

आज महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांवर आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांसाठी तसेच 4 राज्यांतील 15 विधानसभा जागांसाठी आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या 15 पैकी 13 जागा आमदार खासदार झाल्यामुळे, 1 चा मृत्यू आणि 1 तुरुंगात गेल्याने रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी 2 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव...

झारखंडमधील 38 जागांसाठी आज मतदान:शेवटच्या टप्प्यात CM हेमंत, कल्पना आणि बाबूलाल मरांडी यांच्यासह 528 उमेदवार रिंगणात

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि दुसऱ्या टप्प्यात आज 12 जिल्ह्यांतील 38 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये १.२३ कोटी मतदारांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांपैकी 18 जागा संथाल, 18 जागा उत्तर छोटेनागपूर आणि दोन जागा रांची जिल्ह्यातील आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. 14,218 मतदान केंद्रांपैकी 31 बूथवर दुपारी 4 वाजता मतदान...

मणिपूरमध्ये 24 तासांचा अल्टिमेटम:अन्यथाशासकीय कार्यालयांना टाळे ठोकणार, रालोआ बैठकीत पारित प्रस्ताव मैतेईंनी फेटाळला

मणिपुरात परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे राजकीय प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. एक दिवसापूर्वी मुख्यमंत्री एन.बीरेनसिंह यांनी रालोआ आमदारांची बैठक बोलवून ८ कलमी प्रस्ताव पारित केला होता. परंतु मैतेई समुदायाची सर्वात मोठी संघटना कोकोमीने तो फेटाळला आहे. इंफाळच्या इमा मार्केटमध्ये ठिय्या आंदोलन करणाऱ्या कोकोमीचे प्रवक्ते अथौबा खुराईजाम ‘भास्कर’शी बोलताना सांगितले, सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. प्रस्तावात सुधारणा करून आमच्या मागण्या त्यात जोडा,...

महाराष्ट्राच्या 288 जागांवर मतदान सुरू:दुपारी 1 पर्यंत 32.18% मतदान; सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉईन घोटाळ्याचा आरोप

महाराष्ट्राच्या 288 जागांवर मतदान सुरू:दुपारी 1 पर्यंत 32.18% मतदान; सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉईन घोटाळ्याचा आरोप

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता येईल. दुपारपी 1 वाजेपर्यंत 32.18% मतदान झाले असून, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 50.89%, तर मुंबई शहर विभागात सर्वात कमी 27.73% मतदान झाले. राज्यात एकीकडे मतदान सुरू असताना दुसरीकडे भाजपने पुन्हा एकदा बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचा...