पतंजली फूड्सविरुद्ध हमदर्द फाउंडेशन प्रकरण:रामदेव यांच्या ‘शरबत जिहाद’ ने आम्हाला धक्का बसला, उच्च न्यायालयाचे कठोर मत

‘हमदर्द’च्या रूह अफजाबद्दल योगगुरू रामदेवांनी ‘शरबत जिहाद’ बद्दल केलेल्या विधानावर दिल्ली उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहे आणि ते अयोग्य म्हटले आहे. रामदेव यांच्या ‘पतंजली फूड्स’ विरुद्ध ‘हमदर्द नॅशनल फाउंडेशन इंडिया’च्या याचिकेवर सुनावणी करणारे न्यायमूर्ती अमित बन्सल म्हणाले, ‘या टिप्पणीने आमचा विवेक हादरवून टाकला.’ तुम्ही (रामदेवचे वकील) तुमच्या अशिलाला सूचना द्या, अन्यथा कडक आदेश दिले जातील.’ तत्पूर्वी, हमदर्दच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, रामदेव यांनी पतंजलीच्या गुलाब शरबतचा प्रचार करताना असा दावा केला होता की हमदर्दच्या रूह अफजापासून मिळणारे पैसे मदरसे आणि मशिदी बांधण्यासाठी वापरले जातात. जज म्हणाले- व्हिडिओ पाहिल्यावर विश्वासच बसत नव्हता न्यायमूर्ती बन्सल म्हणाले, ‘जेव्हा मी हा (रामदेवांचा) व्हिडिओ पाहिला तेव्हा मला माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता.’ यानंतर नायर म्हणाले, ‘या संदर्भात जारी केलेल्या सर्व प्रिंट आणि व्हिडिओ जाहिराती काढून टाकल्या जातील. मी व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी १ मे रोजी निश्चित करत न्यायालयाने म्हटले, “त्यांनी (रामदेव) विचार मनात ठेवावे, ते व्यक्त करण्याची गरज नाही.”