राहुल गांधी, पवार एकाच मंचावर मात्र, ठाकरेंचे पत्रिकेत नावही नाही:आघाडीत सांगलीवरुन वाद कायम? विश्वजीत कदमांचे स्पष्टीकरण

राहुल गांधी, पवार एकाच मंचावर मात्र, ठाकरेंचे पत्रिकेत नावही नाही:आघाडीत सांगलीवरुन वाद कायम? विश्वजीत कदमांचे स्पष्टीकरण

विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याने या बाबतची चांगलीच चर्चा रंगली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीवरून देखील राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली होती. महाविकास आघाडी विरोधात बंड पुकारत विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यांना त्यासाठी आमदार विश्वजीत कदम यांची देखील मोलाची साथ लाभली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सांगली लोकसभेवरुन महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडते की काय? अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर सांगलीतून अपक्ष म्हणून विजयी झालेले काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे हा वाद मिटला, असे बोलले जात होते. वाद खरेच मिटला का? मात्र आता हा वाद खरेच मिटला का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याला कारणही तसेच आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील सांगलीतील मतदार संघांवर उद्धव ठाकरे गट दावा सांगत आहे. तर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनीही विधानसभेसाठी कंबर कसली आहे. आज सांगलीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील सर्व बडे नेते उपस्थित असताना उद्धव ठाकरे यांचे कार्यक्रम पत्रिकेतही नाव नसल्यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहेत. विश्वजीत कदम यांनी दिले स्पष्टीकरण याबाबत विश्वजीत कदम यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. आपण बारा दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. तसेच त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले होते. मात्र, वैयक्तिक कामानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी आधीच सांगितले होते. महाविकास आघाडीमध्ये कुठलाही वाद नाही. उद्धव ठाकरे यांनी मला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे विश्वजीत कदम यांनी सांगितले. नियोजित कार्यक्रमामुळे कार्यक्रमाला अनुपस्थित विश्वजीत कदम यांनी स्वतः माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला जात नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पतंगराव कदम हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहकारी होते. त्यांच्या पुतळ्याचे आरावरण होतेय, याचा आम्हाला मनस्वी आनंद असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

​विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याने या बाबतची चांगलीच चर्चा रंगली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीवरून देखील राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली होती. महाविकास आघाडी विरोधात बंड पुकारत विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यांना त्यासाठी आमदार विश्वजीत कदम यांची देखील मोलाची साथ लाभली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सांगली लोकसभेवरुन महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडते की काय? अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर सांगलीतून अपक्ष म्हणून विजयी झालेले काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे हा वाद मिटला, असे बोलले जात होते. वाद खरेच मिटला का? मात्र आता हा वाद खरेच मिटला का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याला कारणही तसेच आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील सांगलीतील मतदार संघांवर उद्धव ठाकरे गट दावा सांगत आहे. तर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनीही विधानसभेसाठी कंबर कसली आहे. आज सांगलीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील सर्व बडे नेते उपस्थित असताना उद्धव ठाकरे यांचे कार्यक्रम पत्रिकेतही नाव नसल्यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहेत. विश्वजीत कदम यांनी दिले स्पष्टीकरण याबाबत विश्वजीत कदम यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. आपण बारा दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. तसेच त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले होते. मात्र, वैयक्तिक कामानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी आधीच सांगितले होते. महाविकास आघाडीमध्ये कुठलाही वाद नाही. उद्धव ठाकरे यांनी मला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे विश्वजीत कदम यांनी सांगितले. नियोजित कार्यक्रमामुळे कार्यक्रमाला अनुपस्थित विश्वजीत कदम यांनी स्वतः माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला जात नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पतंगराव कदम हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहकारी होते. त्यांच्या पुतळ्याचे आरावरण होतेय, याचा आम्हाला मनस्वी आनंद असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment