बार्शीत 2 कोटी 53 लाखाचे भव्य बौद्ध विहार उभारणार:आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली माहिती

बार्शीत 2 कोटी 53 लाखाचे भव्य बौद्ध विहार उभारणार:आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली माहिती

शहरातील गाडेगाव रोड भागात बौद्ध समाजासाठी सुमारे २ कोटी ५३ लाख ११ हजार रुपये खर्चून एक एकर जागेत भव्य बुद्ध विहार उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. यावेळी आमदार राऊत म्हणाले, बार्शी तालुक्यातील बौद्ध समाजासाठी भव्य बुद्ध विहार साकारण्याचा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता. नालंदा बहुद्देशीय संस्थेसह सर्व बौद्ध समाजाने शहरात बौद्ध विहार उभारण्याची मागणी गेली चार- पाच वर्षापासून केली होती. समाजासाठी गाडेगाव रोड येथे भव्य बुद्ध विहार स्तुप साकारण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच वैराग येथेही लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व भित्तीशिल्प उभारणार असल्याचे सांगितले.यावेळी सत्यजीत जानराव, रमेश गवळी, शंकर वाघमारे, विष्णू कांबळे, ॲड अविनाश गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी नालंदा बहुउद्देशीय संस्था, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, असंघटित कामगार संघटना, दलित महासंघ, भीम शक्ती बहुउद्देशीय संस्था, सम्यक बोधी ट्रस्ट बावी, भीम टायगर संघटना बार्शी, सिद्धार्थ तरुण मंडळ, आदि संघटनेनी आतषबाजी करून जल्लोष साजरा करत आमदार राऊत यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत दहा कोटीचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बार्शी नगर परिषदेला दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला . यामध्ये शंभर टक्के अनुदान असून या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही आमदार राऊत यांनी सांगितले.

​शहरातील गाडेगाव रोड भागात बौद्ध समाजासाठी सुमारे २ कोटी ५३ लाख ११ हजार रुपये खर्चून एक एकर जागेत भव्य बुद्ध विहार उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. यावेळी आमदार राऊत म्हणाले, बार्शी तालुक्यातील बौद्ध समाजासाठी भव्य बुद्ध विहार साकारण्याचा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता. नालंदा बहुद्देशीय संस्थेसह सर्व बौद्ध समाजाने शहरात बौद्ध विहार उभारण्याची मागणी गेली चार- पाच वर्षापासून केली होती. समाजासाठी गाडेगाव रोड येथे भव्य बुद्ध विहार स्तुप साकारण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच वैराग येथेही लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व भित्तीशिल्प उभारणार असल्याचे सांगितले.यावेळी सत्यजीत जानराव, रमेश गवळी, शंकर वाघमारे, विष्णू कांबळे, ॲड अविनाश गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी नालंदा बहुउद्देशीय संस्था, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, असंघटित कामगार संघटना, दलित महासंघ, भीम शक्ती बहुउद्देशीय संस्था, सम्यक बोधी ट्रस्ट बावी, भीम टायगर संघटना बार्शी, सिद्धार्थ तरुण मंडळ, आदि संघटनेनी आतषबाजी करून जल्लोष साजरा करत आमदार राऊत यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत दहा कोटीचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बार्शी नगर परिषदेला दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला . यामध्ये शंभर टक्के अनुदान असून या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही आमदार राऊत यांनी सांगितले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment