मुंबईत महाबळेश्वर पेक्षा कमी तापमान:नासिक, पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यात पारा घसरला; पुढील पाच दिवस थंडी कायम

मुंबईत महाबळेश्वर पेक्षा कमी तापमान:नासिक, पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यात पारा घसरला; पुढील पाच दिवस थंडी कायम

उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे. मुंबईत महाबळेश्वर पेक्षा कमी तापमान झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारी मुंबईचा पारा 13.7 अंशावर घसरला होता. तसेच पुढील पाच दिवस राज्यात अशीच थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई बरोबरच नासिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पारा घसरला आहे. पुढील पाच दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक शहर चांगलेच गारठले आहे. निफाडमध्ये 8.9 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक गारठले आहेत. मात्र रब्बी पिकांना थंडी लाभदायक ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. द्राक्ष बागांना मात्र याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यामध्ये पुढील पाच दिवस आणखी थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे, मुंबई भागात तापमान घरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत पुढील काही दिवस थंडी आणखी वाढणार आहे. राज्यभरात गारठा वाढल्यामुळे ठिकठिकाणी नागरिक शेकोटी पेटवत आहेत. कोकणात रायगड जिल्ह्याचे तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवेतील आद्रता कमी झाली असून वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. राज्यात दीड लाख कर्मचारी भरती:पारदर्शक, प्रामाणिक, गतिशील काम करा; 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करा, CM देवेंद्र फडणवीसांचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आगामी शंभर दिवसात राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये दीड लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. सर्व यंत्रणा या तांत्रिक दृष्ट्या सक्षम करून लोकांना कशाप्रकारे चांगली सेवा देता येईल, याचा विचार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पूर्ण बातमी वाचा… हिंदूंच्या बाबतीत मोदींची भोंदूगिरी:बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार विरोधातील आंदोलनात भाजप-संघ का नाही? संजय राऊत यांचा सवाल बांगलादेशांवर हिंदू वरील अत्याचार हा चिंतेचा विषय असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरांवर हल्ले होत आहेत. तेथील इस्कॉनच्या प्रमुखांना अटक झाली आहे. हिंदूंचे मोठ्या प्रमाणात खून होत आहेत. हे सर्व चिंताजनक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, हे सर्व चित्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचलित करत नसेल आणि फक्त सचिव पातळीवर चर्चा सुरू असेल तर हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदूगिरी आणि ढोंग करत असल्याचा आरोप राऊत त्यांनी केला आहे. यांना फक्त हिंदूंच्या बाबतीत मतांचे राजकारण करायचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment