वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा:मंदिराला सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट, पाहा VIDEO
वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा आज संपन्न होत असून त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. या विवाह सोहळ्यासाठी बंगळुरूहून आलेला पोशाख प्राप्त झाला आहे. जिप्सी, डिजी, सुर्यफुल, गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जरबरा, ऑर्किङ जिनेियम, तगर, गुलछडी, कामिनी, तुक्स, गोंडा (लाल पिवळा) बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, डीर्शना इत्यादी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे. श्रींचा गाभारा, विठ्ठल सभामंडप, श्री संत नामदेव महाराज पायरी, उत्तर द्वार (VIP Gate), सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. याकरिता सुमारे 100 स्वयंसेवकानी परिश्रम घेतले असून, सदरची सजावट पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे. पोशाख आषाढीत भाविकांना देण्याची व्यवस्था विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भाविकांकडून आलेला पोशाख आषाढी यात्रा काळात भाविकांना देणगी मूल्य घेऊन देण्याची व्यवस्था केली जाते. कपड्याचा पोत लक्षात घेऊन पाेशाख वस्त्रांचे देणगी मूल्य ठरते. काही साड्यांचा उपयोग मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांना भेट स्वरुपात देतात. विठ्ठलाला पांढरे पागोटे करतात परिधान वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे काकडा आरती वेळेस श्री विठ्ठलास सोन्याच्या मुखवट्याऐवजी पांढरे पागोटे घालण्यात येते. या दिवसापासून श्री विठ्ठलास पांढरा पोशाख रंगपंचमीपर्यंत सुरू होतो. पहाटे नित्यपूजेच्या वेळेस देवास गुलाल टाकण्यात येतो. तसेच श्री रुक्मिणी मातेकडे काकडा आरती व नित्यपूजेच्या वेळेस वसंत पंचमीनिमित्त सकाळी पांढरा पोशाख करण्यात येतो.