शस्त्रक्रियेनंतर मुलाचा मृत्यू:मृत्यूनंतर 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर, 6 डॉक्टरांवर गुन्हा

फायमोसिस विथ पिनलाइन टाॅर्शन (लघवीच्या जागेवरील खाज) या आजाराची सुमारे २५ मिनिटांत शस्त्रक्रिया होईल, असे सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर ६ डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. बालकाला भुलीनंतर ३-३ इंजेक्शन्स देण्यात आली होती. मल्टिआॅर्गन फेल्युअरमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. शस्त्रक्रियेपूर्वी, ‘मम्मी टेन्शन मत लो, सिम्पलसी बात है,’ असे सांगून तो ऑपरेशन थिएटरमध्ये गेला होता. विशेष म्हणजे, चिमुकल्याचा मृत्यू २४ एप्रिल २०२४ रोजी झाला. मात्र, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला ११ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. हा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दैविक अविनाश अघाव असे या मृत बालकाचे नाव आहे. अविनाश दत्तात्रय आघाव (४१, रा. सप्तश्री वाटिका, स्वप्ननगरी, गारखेडा परिसर) यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा दैविकला गुप्तांगावर खाजेचा त्रास होत होता. त्यामुळे २० एप्रिल रोजी त्याला वेदांत बाल रुग्णालयात नेले. तेथे डॉ. अर्जुन पवार यांनी त्याला तपासले. ‘फायमोसिस विथ पिनाइल टॉर्शन’ हा आजार असल्याचे सांगून त्यासाठी छोटेसे ऑपरेशन करावे लागते. त्याचा १६ हजार रुपये खर्च येतो, अशी माहिती दिली. २६ एप्रिल रोजी ऑपरेशन ठरले. २५ एप्रिल रोजी रात्री दैविकला रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी १० हजार रुपये भरले. २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता त्याला ऑपरेशनसाठी नेण्याची तयारी केली. सव्वासात वाजता डॉ. अर्जुन पवार, भूलतज्ज्ञ डॉ. शेख मोहंमद इलियास आले. २५ मिनिटांत ऑपरेशन होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, ४५ मिनिटे झाली तरी ऑपरेशन झाले नव्हते. एक तासाने डॉ. पवार ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. डॉ. इलियास यांनी बाळाला स्पाइनलमध्ये भूल दिली होती. पण, त्याने हात हलवल्यामुळे झोपेचे इंजेक्शन दिले. बालक सध्या बेशुद्ध असल्याचे सांगितले.
भुलीनंतर ३ इंजेक्शन्स दिल्याचे सीसीटीव्हीत कैद दैविकला भूल दिल्यानंतर तीन इंजेक्शन्स ​​​​​​्देण्यात आली. याचे सीसीटीव्हीत चित्रीकरण झाले आहे. हे इंजेक्शन कशाचे होते याची समितीला माहिती नाही. ११ दिवस दैविक व्हेंटिलेटरवर होता. ६ जून २०२४ रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्युप्रकरणी हे आहेत आरोपी डॉक्टर डॉ. अभिजित देशमुख बालरोगतज्ज्ञ
डॉ. अजय काळे बालरोगतज्ज्ञ
डॉ. तुषार चव्हाण बालरोगतज्ज्ञ
डॉ. नितीन आधाने बालरोगतज्ज्ञ साडेपाच वर्षांच्या माझ्या चिमुकल्याचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. इतर पालकांबाबत असे होऊ नये यासाठी आमचा लढा आहे. ‘पप्पा मी उठलो, अरे पप्पा मला झोप आली,’ हे त्याचे शब्द आजही कानात घुमतात. घरातील प्रत्येक वस्तू त्याची आठवण देते. फुटबॉल, स्केटिंग त्याच्या आवडीचे होते. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील सोढी हे त्याचे आवडे कॅरेक्टर होते, अशा आठवणी सांगताना पालकांना अश्रू अनावर झाले होते. आशा दाखवून मरण यातना दिल्याची पालकांची भावना ११ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर हॉस्पिटलने चुकीची माहिती दिली. दैविकने काही वेळापूर्वी डोळे उघडले होते. थोड्या वेळाने तो शुद्धीवर येईल, असे म्हणत १० दिवस उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, तो शुद्धीवर आला नाही. खोटे सांगून त्याला दररोज मरणयातना दिल्या, अशा भावना त्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या. खंडपीठाने आदेश दिल्यानंतर चौकशी आघाव दांपत्य वकील आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मेडिकल बोर्डाने डॉक्टर निर्दोष असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर त्यांनी १८ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणाची मेडिकल बोर्डाकडे उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. खंडपीठाच्या आदेशानंतर नेमलेल्या समितीच्या अहवालात डॉक्टरांचा निष्काळजीपणा व चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचे नमूद केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  

Share