आपले हिंदुत्व कळल्यावर मुस्लिम आपल्यासोबत:ख्रिश्चन समाजाचाही पाठिंबा, उद्धव ठाकरेंनी केला विश्वास व्यक्त
आपले हिंदुत्व कळल्यामुळे मुसलमान आपल्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत. तसेच ख्रिश्चन धर्मगुरू देखील आपल्याकडे येऊन पाठिंब्याचे पत्र दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक दिवस बाकी असताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आपले हिंदुत्व काय आहे, हे कळल्यानंतर मुस्लिम आपल्यासोबत आहेत. सगळ्या समाजाचे लोक आपल्यासोबत आले. आता कोणाला दंगली नको, किती काळ हे करत राहणार…एकत्र आलो तर आपण जगातील सर्वांत प्रसिद्ध राज्य म्हणून पुढे येऊ, असे ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचेही आभार मानले आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की गुजरातमधून 90 हजार लोक इथे बोलावले आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे कल्याण करण्यासाठी नाही तर महाराष्ट्र बळकवण्यासाठी आले आहेत. इथल्या भाजपच्या लोकांवर तुमचा विश्वास नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझी तब्येत सोडा महाराष्ट्राची तब्येत चांगली राहिली पाहिजे. यावेळी जर मत फुटले तर नशीब फुटेल आणि हे सगळे आपल्या डोक्यावर बसतील. मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला. पण शिवसेना आणि मराठी माणूस हे कोणी तोडणार नाही, असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. कोस्टल रोडचे वचन शिवसेनेने दिलेले होते आणि ते पूर्ण देखील केले आहे. आता हे फिती कापायला येतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. आता हे लोक चर्चा करतात की उद्धव ठाकरेंनी त्यांचे सरकार असताना पूर्ण वेळ काम करण्यास यायला पाहिजे होते. बटेंगे तो कटेंगे असे म्हणत आहेत. पण, मी मुख्यमंत्री असताना कोणाची हिंमत नव्हती, असेही ठाकरे म्हणाले.