दिल्लीत भाजपचा विजय होणार नाही:संजय राऊत यांचा दावा; म्हटले- इंडिया आघाडीतले दोन्ही प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले हे दुर्दैव
![दिल्लीत भाजपचा विजय होणार नाही:संजय राऊत यांचा दावा; म्हटले- इंडिया आघाडीतले दोन्ही प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले हे दुर्दैव](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2025/02/06/730-x-548-2025-02-06t104229971_1738818737.jpg)
दिल्लीमध्ये एक्झिट पोल पाहता खऱ्या मतदानाचा निकाल 8 तारखेला लागणार आहे. एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात विजय होतोय आणि हरियाणात काँग्रेसचा विजय होतोय, असे दाखवण्यात आले होते. त्यामुळे खरे 8 तारखेलाच कळेल असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कला आहे. आम्हाला विश्वास आहे की, दिल्लीत भाजपची सत्ता येणार नाही. पण भाजपचे लोक दिल्लीत विजयासाठी पैसे वाटत होते आणि येथील प्रशासन किंवा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. भाजपला विश्वास असेल की आम्ही हे सर्व केले म्हणून आम्ही जिंकू, पण जनता शक्तिशाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीतले दोन्ही प्रमुख पक्ष हे दुर्दैवाने वेगवेगळे लढले. त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. इंडिया आघाडी एकत्र लढले असते तर भारतीय जनता पक्ष जवळपास देखील फटकला नसता, असा शब्दात संजय राऊत यांनी दिल्लीच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. 19 स्ट्राँग रूम मध्ये ईव्हीएम ठेवलेल्या आहेत. या स्ट्राँग रूम मध्येच घोटाळा होतो. महाराष्ट्रातील सर्व प्रकार समोर आले आहेत. मात्र, दिल्लीत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते याबाबत अधिक तज्ञ आणि माहिर आहेत. त्यामुळे आम्ही आठ तारखेची वाट पाहत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या संबंधीत खालील बातमी देखील वाचा… राज्यात मंत्र्यांना बहुमताचे डिप्रेशन:तर देवेंद्र फडणवीसांना वर्षावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा महायुतीवर पलटवार सरकारमधील कोण काय म्हणते? हे महत्त्वाचे नाही. या सरकारला विजयाचे डिप्रेशन आलेले आहे. त्यांच्यात बहुमताचे डिप्रेशन असून हा अधिक गंभीर आजार आहे. त्या डिप्रेशन मधून ते बाहेर पडायला तयार नाहीत. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. वर्षा बंगला परिसरात कामाख्या मंदीरात बळी दिलेल्या रेड्याची शिंगे पुरली असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावरुन अनेक मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पूर्ण बातमी वाचा….