मदरशात दहा वर्षीय मुलावर मौलानाकडून अनैसर्गिक अत्याचार:नांदेड येथील घटनेने खळबळ, आरोपींचा शोध सुरू

मदरशात दहा वर्षीय मुलावर मौलानाकडून अनैसर्गिक अत्याचार:नांदेड येथील घटनेने खळबळ, आरोपींचा शोध सुरू

नांदेडयेथील वाघी रोड हस्सापूर येथे दार-ए-अरखांम नामक मदरशात धक्कादायक घटना घडली आहे. या मदरशात शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलावर मौलानाकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. पीडित मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर वजिराबाद पोलिस ठाण्यात मौलानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नांदेड शहाराजवळ वाघी रोड हस्सापूर येथील दार-ए-अरखांम नावाची मदरशा आहे. या मदरशात जवळपास 30 मुले निवासी राहून धार्मिक शिक्षण घेतात. या मुलांसोबतच मूळचा बिहारचा असलेला 26 वर्षांचा महोमद शाहनवाज नामक मौलाना येथेच राहून शिक्षण देतो. दोन दिवसांपूर्वी आरोपी मौलाना महोमद शाहनवाजने दहा वर्षीय मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्रास होत असल्याने पीडित मुलाने मदरशाबाहेर असलेल्या टपरीचालकाला या घटनेबद्दल सांगितले. त्यामुळेच घडलेली घटना समोर आली. पीडित मुलाच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरुन आरोपी मौलाना शाहनवाज सह मदरसा चालक मौलाना अय्युब खासमी विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मदरसा चालकाने आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्याला सहआरोपी करण्यात आले. दरम्यान दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पुण्यात देखील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पुणे येथील मुंढवा परिसरात 60 वर्षीय नराधमाने दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले आहेत. आरोपी नराधम पीडित मुलींचा शेजारी राहतो. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment