संसद ठप्प; कामकाज शून्य:विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे कामकाज तिसऱ्या दिवशीही तहकूब
हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सलग तिसऱ्या दिवशीदेखील संसदेचे कामकाज सुरळीत चालले नाही. संसदेत विरोधी पक्षाचा गदारोळ सुरू राहिला. त्यामुळे दोन्ही सभागृहांत सुरुवातीच्या काही िमनिटांनंतर कामकाज तहकूब करावे लागले. दुपारी बारा वाजता पुन्हा सत्र सुरू झाले. परंतु गदारोळ थांबला नव्हता. मग कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. अदानी मुद्दा, संभल हिंसाचार, मणिपूरवरील चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. परंतु त्यास परवानगी मिळाली नाही. लोकसभेत काँग्रेस नेते प्रियंका गांधी-वढेरा व रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेतल्यानंतर लगेच प्रश्नोत्तरात गदारोळ सुरू झाला. विरोधी सदस्य वेलमध्ये येऊन घोषणा देत होते. तत्पूर्वी, लोकसभेने वक्फ दुरुस्ती विधेयकावर स्थापन संयुक्त समितीला पुढील वर्षीच्या बजेट सत्राच्या शेवटच्या दिवसापर्यंत विस्तार करण्याच्या प्रस्तावास मंजूर केले. संसदीय व्यत्यय हा रोग, पाया कमकुवत करतोय : धनखड राज्यसभेत सभापती जगदीप धनखड म्हणाले, संसदीय कामकाजातील व्यत्यय हा उपाय नसून रोग आहे. यामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होत आहे. संसदेचे महत्त्व कायम ठेवले पाहिजे. धनखड यांच्याकडे बोलण्याकडे विरोधी सदस्यांनी कानाडोळा केला. म्हणून सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाले. महामार्गावर १.४४ लाख कोटी रुपयांची वसुली : गडकरी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात टोलसंबंधी माहिती दिली. डिसेंबर २००० पासून राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत संचालित टोल प्लाझातून टोल कराच्या रूपात १.४४ लाख कोटी रुपये वसूल केले. फास्टॅग व्यतिरिक्त तंत्रज्ञानावर आधारित ईटीसी प्रणालीही सुरू करण्याची तयारी आहे. संसदेत गांधी परिवारातील तीन सदस्य दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रियंका यांच्या आई सोनिया गांधी (७७) राज्यसभा सदस्य आहेत. भाऊ राहुल (५४) रायबरेलीचे खासदार आहेत. नेहरू-गांधी घराण्याचे १६ व्या सदस्य. या घराण्यातील भाऊ-बहिण संसदेत जाण्याची ही दुसरी वेळ.१९५१ मध्ये जवाहरलाल नेहरू व विजयालक्ष्मी पंडित संसदेत होते. कसावूचा अर्थ जर होतो. ही साडी कापूस, रेशमाची असते. काठ सोने किंवा चांदीचे असतात. वायनाडच्या पोटनिवडणुकीत निवडून पहिल्यांदाच संसदेत दाखल झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी गुरुवारी लोकसभेत शपथ घेतली. केरळची कसावू साडी परिधान केलेल्या ५२ वर्षीय प्रियंका यांनी राज्यघटनेची प्रत हाती घेतलेली होती.