बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचा विजय निश्चित:अजित पवारांना काही आम्ही फार मोठे समजत नाही- श्रीनिवास पवार
बारामतीचा मतदार सूज्ञ आहे. बारामती मतदारसंघात 100 टक्के युगेंद्र जिंकेल असा मला विश्वास आहे. मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागातून आम्हाला मते मिळतील. युगेंद्र विजयी होईल मला विश्वास आहे, असा विश्वास श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान श्रीनिवास पवार पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवारांशी आमची फोनवरुन चर्चा झाली. त्यांनी काही सूचना दिल्या आहेत पण त्या मी सांगणार नाही. बारामती शरद पवारांचीच आहे लक्षात ठेवा. आमची लढाई विचारांची आहे. अजित पवारांना काही आम्ही फार मोठे समजत नाही. शरद पवार यांच्याशी चर्चा श्रीनिवास पवार म्हणाले की, नवाब मलिक किती राजकीय तज्ज्ञ आहेत मला माहीत नाही. बारामतीचा मतदार बोलत नाही तो करुन दाखवतो, अजित पवार किंगमेकर वगैरे काहीही होणार नाहीत, असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार गेली 30 वर्षे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकांना भेटले नसतील. युगेंद्र पवार यांची पहिली निवडणूक असल्याने ते लोकांपर्यंत गेले. शरद पवारांशी आमची फोनवरुन चर्चा झाली. त्यांनी काही सूचना दिल्या आहेत पण त्या मी सांगणार नाही. अजित पवारांना 11 हजारांची लीड बारामतीमध्ये अजित पवार यांना साडेदहा वाजेच्या दरम्यान 27145 मते मिळाली असून युगेंद्र पवार यांना 15837 मते मिळाली आहेत. अजितदादांना पुतण्यापेक्षा 11308 मते जास्त मिळाली. आहेत. हा कौल जनतेचा नसून अदाणी आणि त्यांच्या टोळीने लावून घेतलेला कौल आहे, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.