Category: marathi

दिव्य मराठी अपडेट्स:मुंबईच्या लोअर परळ परिसरातील कमला मिल कंपनीतील टाईम्स टॉवरला आग, विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

दिव्य मराठी अपडेट्स:मुंबईच्या लोअर परळ परिसरातील कमला मिल कंपनीतील टाईम्स टॉवरला आग, विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स मोदी 19 सप्टेंबरला वर्धेत फोडणार प्रचाराचा नारळ नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 19 सप्टेंबर रोजी वर्धा येथे सभा होणार आहे. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेंतर्गत लाभार्थींना मोदी यांच्या हस्ते मदत किट आणि मनी धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे. याचवेळी ते विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फाेडतील.
गणरायाच्या स्वागतासाठी आजपासून पावसाची हजेरी नाशिक – शनिवार, 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून शुक्रवार, 6 सप्टेंबरपासूनच राज्यात पुढील चार दिवस सर्वत्र पाऊस पडणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार तर उर्वरित भागात मध्यम, पुणे व साताऱ्यात जोरदार तर उत्तर व मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात दोन दिवसांपासून गडचिरोली, गोंदिया, नागपूर , वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस कोसळत आहे.
दिव्यांगांना एसटी बसमध्येकायमस्वरूपी आरक्षण मुंबई – दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्वच बसमध्ये कायमस्वरूपी आरक्षित आसन मिळू शकेल. ते कोणत्याही थांब्यावरुन बसमध्ये चढले तरी त्यांना आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल. एसटीच्या वाहतूक विभागाने एका परिपत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार साध्या बसेस पासून शिवनेरीपर्यंत सर्वच बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना जागा राखीव ठेवली जाईल. ‍दिव्यांग प्रवासी नसतील तेव्हा ते आसन सामान्यांसाठी उपलब्ध होईल. तथापि, दिव्यांग प्रवाशाला आसन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल.

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स मोदी 19 सप्टेंबरला वर्धेत फोडणार प्रचाराचा नारळ नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 19 सप्टेंबर रोजी वर्धा येथे सभा होणार आहे. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेंतर्गत लाभार्थींना मोदी यांच्या हस्ते मदत किट आणि मनी धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे. याचवेळी ते विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फाेडतील.
गणरायाच्या स्वागतासाठी आजपासून पावसाची हजेरी नाशिक – शनिवार, 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून शुक्रवार, 6 सप्टेंबरपासूनच राज्यात पुढील चार दिवस सर्वत्र पाऊस पडणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार तर उर्वरित भागात मध्यम, पुणे व साताऱ्यात जोरदार तर उत्तर व मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात दोन दिवसांपासून गडचिरोली, गोंदिया, नागपूर , वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस कोसळत आहे.
दिव्यांगांना एसटी बसमध्येकायमस्वरूपी आरक्षण मुंबई – दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्वच बसमध्ये कायमस्वरूपी आरक्षित आसन मिळू शकेल. ते कोणत्याही थांब्यावरुन बसमध्ये चढले तरी त्यांना आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल. एसटीच्या वाहतूक विभागाने एका परिपत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार साध्या बसेस पासून शिवनेरीपर्यंत सर्वच बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना जागा राखीव ठेवली जाईल. ‍दिव्यांग प्रवासी नसतील तेव्हा ते आसन सामान्यांसाठी उपलब्ध होईल. तथापि, दिव्यांग प्रवाशाला आसन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल.  

मायलेकीचा बुडून मृत्यू, आत्महत्या की घातपात कारण अस्पष्ट:गल्लेबोरगावच्या दुधारे‎वस्तीवरील घटना‎

मायलेकीचा बुडून मृत्यू, आत्महत्या की घातपात कारण अस्पष्ट:गल्लेबोरगावच्या दुधारे‎वस्तीवरील घटना‎

गल्लेबोरगाव येथील आखतवाडा रोडवरील दुधारे वस्तीवर राहणाऱ्या एका माय-लेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आई वंदना भरत दुधारे (३६) वर्षे तर मुलगी पल्लवी भरत दुधारे (१८)असे आत्महत्या केलेल्या आई व मुलीचे नाव आहे. आई व मुलीने आत्महत्या का केली याचा तपास खुलताबाद पोलिस करत आहेत. आईचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला तर मुलीचा मृतदेह तळाला असल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलिस पाटील सिंधुताई बढे यांनी दिली. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की,भरत दुधारे आपल्या पत्नी, मुलाबाळासह व आई-वडिलांना सोबत गल्लेबोरगाव ते आखतवाडा रोड वरील गट नं. ४०३ शेत वस्तीवर राहतात. बुधवारी रात्री सर्व नेहमीप्रमाणे कामे आटोपून भरत दुधारे त्यांचे कुटुंबीय झोपले होते. गुरुवारी पहाटे कुटुंब प्रमुख भरत उठले असता त्यांना त्यांची पत्नी वंदना दुधारे व मुलगी पल्लवी या दोन्ही माय-लेकी घरात दिसून आल्या नाही. यामुळे भरत दुधारे यांनी काही वेळ पत्नी व मुलीची घरात येण्याची वाट बघितली.नंतर शोध घेण्यास सुरुवात केली. शेतातील विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीच्या कडेला पत्नी व मुलीची चप्पल दिसून आल्या. भरत दुधारे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीतील पाण्यात त्यांच्या पत्नीचा मृतदेह तरंगत असताना त्यांच्या निदर्शनास आले. मात्र मुलगी दिसली नाही. भरत दुधारे बुचकळ्यात पडले. नेमकी मुलगी पल्लवी चप्पल विहिरीच्या कडेला ठेवून गेली कुठे म्हणून भरत दुधारे यांनी पोलिस पाटील सिंधुताई बढे यांना फोनवर घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील बढे यांनी तत्काळ खुलताबाद पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी तत्काळ ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले. पल्लवी प्रथम वर्षात तर आई घरकाम करायची पल्लवी ही गल्लेबोरगाव येथील नाथ माध्यमिक विद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर पल्लवीची आई घरची शेतीची कामे करत होती. अचानक आई व मुलीने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन का संपवले याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस या विषयी चौकशी करत आहेत. याप्रकरण खुलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​गल्लेबोरगाव येथील आखतवाडा रोडवरील दुधारे वस्तीवर राहणाऱ्या एका माय-लेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आई वंदना भरत दुधारे (३६) वर्षे तर मुलगी पल्लवी भरत दुधारे (१८)असे आत्महत्या केलेल्या आई व मुलीचे नाव आहे. आई व मुलीने आत्महत्या का केली याचा तपास खुलताबाद पोलिस करत आहेत. आईचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला तर मुलीचा मृतदेह तळाला असल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलिस पाटील सिंधुताई बढे यांनी दिली. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की,भरत दुधारे आपल्या पत्नी, मुलाबाळासह व आई-वडिलांना सोबत गल्लेबोरगाव ते आखतवाडा रोड वरील गट नं. ४०३ शेत वस्तीवर राहतात. बुधवारी रात्री सर्व नेहमीप्रमाणे कामे आटोपून भरत दुधारे त्यांचे कुटुंबीय झोपले होते. गुरुवारी पहाटे कुटुंब प्रमुख भरत उठले असता त्यांना त्यांची पत्नी वंदना दुधारे व मुलगी पल्लवी या दोन्ही माय-लेकी घरात दिसून आल्या नाही. यामुळे भरत दुधारे यांनी काही वेळ पत्नी व मुलीची घरात येण्याची वाट बघितली.नंतर शोध घेण्यास सुरुवात केली. शेतातील विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीच्या कडेला पत्नी व मुलीची चप्पल दिसून आल्या. भरत दुधारे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीतील पाण्यात त्यांच्या पत्नीचा मृतदेह तरंगत असताना त्यांच्या निदर्शनास आले. मात्र मुलगी दिसली नाही. भरत दुधारे बुचकळ्यात पडले. नेमकी मुलगी पल्लवी चप्पल विहिरीच्या कडेला ठेवून गेली कुठे म्हणून भरत दुधारे यांनी पोलिस पाटील सिंधुताई बढे यांना फोनवर घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील बढे यांनी तत्काळ खुलताबाद पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी तत्काळ ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले. पल्लवी प्रथम वर्षात तर आई घरकाम करायची पल्लवी ही गल्लेबोरगाव येथील नाथ माध्यमिक विद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर पल्लवीची आई घरची शेतीची कामे करत होती. अचानक आई व मुलीने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन का संपवले याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस या विषयी चौकशी करत आहेत. याप्रकरण खुलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

पावसामुळे नांदर मंडळातील पिकांचे मोठे नुकसान:भरपाई देण्याची मागणी, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्याकडून ठिकठिकाणी पाहणी

पावसामुळे नांदर मंडळातील पिकांचे मोठे नुकसान:भरपाई देण्याची मागणी, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्याकडून ठिकठिकाणी पाहणी

नांदर (ता. पैठण) महसूल मंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे नांदर मंडळातील दावरवाडी, कौंदर, कुतुबखेडा- सालवडगाव, हर्षी, सोनवाडी, वडजी, नानेपुसेगाव खेर्डा आदी गावांतील शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दावरवाडीत भेट देऊन शेतकऱ्यांसोबत थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांनी तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. नुकसानीमुळे पिकांवर झालेला खर्च कसा वसूल होईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रकाश देशमुख यांनी दावरवाडीतील शेतकरी कल्याण काशीनाथ तांगडे यांच्या गट नं. ४२४ मधील कपाशी, तूर, सोयाबीन व मूग पिकांची पाहणी केली. त्यांनी पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव, पैठण तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, तालुका कृषितंत्र अधिकारी नंदकिशोर थोरे, सुहास धस, अनिरुद्ध हनवते, माजी सरपंच मुस्तफा पठाण आदी उपस्थित होते. पीक विम्याची अट रद्द करा, सरसकट मदत द्यावी ^पावसामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच पिक विम्याच्या जाचक अटी रद्द करण्यात येऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. -सूर्यभान राऊत, शेतकरी, नांदर

​नांदर (ता. पैठण) महसूल मंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे नांदर मंडळातील दावरवाडी, कौंदर, कुतुबखेडा- सालवडगाव, हर्षी, सोनवाडी, वडजी, नानेपुसेगाव खेर्डा आदी गावांतील शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दावरवाडीत भेट देऊन शेतकऱ्यांसोबत थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांनी तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. नुकसानीमुळे पिकांवर झालेला खर्च कसा वसूल होईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रकाश देशमुख यांनी दावरवाडीतील शेतकरी कल्याण काशीनाथ तांगडे यांच्या गट नं. ४२४ मधील कपाशी, तूर, सोयाबीन व मूग पिकांची पाहणी केली. त्यांनी पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव, पैठण तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, तालुका कृषितंत्र अधिकारी नंदकिशोर थोरे, सुहास धस, अनिरुद्ध हनवते, माजी सरपंच मुस्तफा पठाण आदी उपस्थित होते. पीक विम्याची अट रद्द करा, सरसकट मदत द्यावी ^पावसामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच पिक विम्याच्या जाचक अटी रद्द करण्यात येऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. -सूर्यभान राऊत, शेतकरी, नांदर  

नाभिक समाजाने शैक्षणिक प्रगती साधावी:वरणगाव येथील कार्यक्रमात गोपाळ बाणाईत यांचे आवाहन, संत सेना महाराज पुण्यतिथी

नाभिक समाजाने शैक्षणिक प्रगती साधावी:वरणगाव येथील कार्यक्रमात गोपाळ बाणाईत यांचे आवाहन, संत सेना महाराज पुण्यतिथी

श्री संत सेना महाराजांची शिकवण आचरणात आणावी. नाभिक समाजाने एकसंघ राहून शैक्षणिक व सामाजिक प्रगतीची कास धरावी, असे आवाहन गोपाळ बाणाईत यांनी केले. वरणगाव येथील नाभिक समाजाने नागेश्वर मंदिरात संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष चंद्र‌कांत बढे, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी पंकज सूर्यवंशी, माजी नगरा‌ध्यक्ष सुनील काळे, राजेंद्र चौधरी, गणेश धनगर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठितांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात संत शिरोमणी सेना महाराजांची प्रतिमा पूजन व आरतीने झाली. नंतर नेपाळ येथील दुर्घटनेत जीव गमावलेल्या वरणगावमधील भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर संत सेना यांच्या विचारांचा सर्वांनी जागर केला. महाप्रसादाचे आयोजन : याप्रसंगी बाळू शिवरामे यांचेकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते. कमलेश येवले, संतोष रेलकर, सुधाकर आमोदकर, तुकाराम सनांसे, गोटू सनांसे, दत्ता निमकर व सर्व नाभिक समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

​श्री संत सेना महाराजांची शिकवण आचरणात आणावी. नाभिक समाजाने एकसंघ राहून शैक्षणिक व सामाजिक प्रगतीची कास धरावी, असे आवाहन गोपाळ बाणाईत यांनी केले. वरणगाव येथील नाभिक समाजाने नागेश्वर मंदिरात संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष चंद्र‌कांत बढे, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी पंकज सूर्यवंशी, माजी नगरा‌ध्यक्ष सुनील काळे, राजेंद्र चौधरी, गणेश धनगर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठितांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात संत शिरोमणी सेना महाराजांची प्रतिमा पूजन व आरतीने झाली. नंतर नेपाळ येथील दुर्घटनेत जीव गमावलेल्या वरणगावमधील भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर संत सेना यांच्या विचारांचा सर्वांनी जागर केला. महाप्रसादाचे आयोजन : याप्रसंगी बाळू शिवरामे यांचेकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते. कमलेश येवले, संतोष रेलकर, सुधाकर आमोदकर, तुकाराम सनांसे, गोटू सनांसे, दत्ता निमकर व सर्व नाभिक समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.  

नगरपालिकेतील 15 टक्के कर वाढीस स्थगिती देण्याची मागणी:एरंडोल येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे

नगरपालिकेतील 15 टक्के कर वाढीस स्थगिती देण्याची मागणी:एरंडोल येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे

एरंडोल येथील नगर परिषदेमार्फत सन २०२२-२३ ते २०२५-२६ साठी ची १५ टक्के कर वाढीस स्थगिती मिळावी व पालिका हद्दीतील खरेदी विक्रीवर आकारला जाणारा १ टक्के कर रद्द करण्यात यावा. या मागणीचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले. उपोषणकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष गोरख चौधरी सोबत भाजपचे जनजातीय क्षेत्र प्रमुख अँड. किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमित पाटील, शहर प्रमुख शिंदे गट शिवसेना आनंदा चौधरी,काँग्रेस पक्षाचे विजय महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख ठाकरे गट जगदीश पाटील व एरंडोल शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. एरंडोल व पारोळा या दोन्ही शहरात एकाच वेळेस करवाढ झाली होती. आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पारोळा येथील कर वाढीस स्थगिती मिळवली. त्या धर्तीवर एरंडोल नगरपालिकेने केलेल्या कर वाढीस स्थगिती मिळावी. अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे अश्वासित केले.

​एरंडोल येथील नगर परिषदेमार्फत सन २०२२-२३ ते २०२५-२६ साठी ची १५ टक्के कर वाढीस स्थगिती मिळावी व पालिका हद्दीतील खरेदी विक्रीवर आकारला जाणारा १ टक्के कर रद्द करण्यात यावा. या मागणीचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले. उपोषणकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष गोरख चौधरी सोबत भाजपचे जनजातीय क्षेत्र प्रमुख अँड. किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमित पाटील, शहर प्रमुख शिंदे गट शिवसेना आनंदा चौधरी,काँग्रेस पक्षाचे विजय महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख ठाकरे गट जगदीश पाटील व एरंडोल शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. एरंडोल व पारोळा या दोन्ही शहरात एकाच वेळेस करवाढ झाली होती. आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पारोळा येथील कर वाढीस स्थगिती मिळवली. त्या धर्तीवर एरंडोल नगरपालिकेने केलेल्या कर वाढीस स्थगिती मिळावी. अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे अश्वासित केले.  

पंढरपूर – मंगळवेढा विकास कामांसाठी 10 कोटी:राजमाता अहिल्यादेवी स्मारक 25 लाख तर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी 15 लाख रुपये

पंढरपूर – मंगळवेढा विकास कामांसाठी 10 कोटी:राजमाता अहिल्यादेवी स्मारक 25 लाख तर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी 15 लाख रुपये

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी १५ लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील ४० तर पंढरपूर शहरातील ४७ कामांसाठी हा निधी मंजूर असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. आवताडे म्हणाले कि, राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूरसाठी ५ आणि मंगळवेढा साठी ५ कोटी असे एकूण १० कोटी रुपये मंजूरीचा आदेश ३ सप्टेंबर रोजी निघाला आहे. या निधीतून पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक सुधारणांसाठी २५ लाख रुपये, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामासाठी १५ लाख रुपये, लिंगायत स्मशानभूमी सुधारणा साठी १५ लाख रुपये, हजरत बाराईमाम दर्ग्यातील कामांसाठी १० लाख रुपये, याशिवाय ८ उपनगरातील खुल्या जागा विकसित करणे, याशिवाय २७ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणसाठी प्रत्येकी १० लाख रुपये, ८ ठिकाणी सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये,मटण मार्केट येथे फुटपाथ करणे अशा कामासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. पंढरपूर शहराबरोबर मंगळवेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर हायमास्ट बसवणे, लतिफ़बाबा दर्गाह जवळ शादी खाना बांधकामासाठी ५० लाख रुपये, दर्गा परिसरात संरक्षित भिंत बांधणे,पथदिवे, विजेचे खांब बसवणे, रस्ते काँक्रीटीकरण, भूमिगत ड्रेनेज, नगरपालिका सभामंडप बांधणे अशा विविध ४० कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर झालेला आहे.

​पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी १५ लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील ४० तर पंढरपूर शहरातील ४७ कामांसाठी हा निधी मंजूर असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. आवताडे म्हणाले कि, राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूरसाठी ५ आणि मंगळवेढा साठी ५ कोटी असे एकूण १० कोटी रुपये मंजूरीचा आदेश ३ सप्टेंबर रोजी निघाला आहे. या निधीतून पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक सुधारणांसाठी २५ लाख रुपये, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामासाठी १५ लाख रुपये, लिंगायत स्मशानभूमी सुधारणा साठी १५ लाख रुपये, हजरत बाराईमाम दर्ग्यातील कामांसाठी १० लाख रुपये, याशिवाय ८ उपनगरातील खुल्या जागा विकसित करणे, याशिवाय २७ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणसाठी प्रत्येकी १० लाख रुपये, ८ ठिकाणी सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये,मटण मार्केट येथे फुटपाथ करणे अशा कामासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. पंढरपूर शहराबरोबर मंगळवेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर हायमास्ट बसवणे, लतिफ़बाबा दर्गाह जवळ शादी खाना बांधकामासाठी ५० लाख रुपये, दर्गा परिसरात संरक्षित भिंत बांधणे,पथदिवे, विजेचे खांब बसवणे, रस्ते काँक्रीटीकरण, भूमिगत ड्रेनेज, नगरपालिका सभामंडप बांधणे अशा विविध ४० कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर झालेला आहे.  

पाच लाख घरांमध्ये उद्या येणार बाप्पा, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लगबग:पंढरपूर, बार्शी, माढा, मोहोळसह जिल्हाभरात स्वागताची जय्यत तयारी‎

पाच लाख घरांमध्ये उद्या येणार बाप्पा, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लगबग:पंढरपूर, बार्शी, माढा, मोहोळसह जिल्हाभरात स्वागताची जय्यत तयारी‎

विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे उद्या आगमन होत असून जिल्ह्यातील सुमारे पाच लाख घरात स्वागताची तयारी करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसत आहे. गावो गावी आणि पंढरपूर शहरातही जागो जागी गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी जय्यत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे. दरम्यान पंढरपूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शांततामय गणेशोत्सवासाठी नियोजन केलेले आहे. यंदा नो डॉल्बी गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस प्रशासनाने बक्षीस ठेवले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गेले आठ – दहा दिवसांपासून गणेश मंडळांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. पंढरपूरच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. गौरी – गणपती च्या सजावटीसाठी इलेकट्रीक वस्तूंपासून हार, फुले, विविध खेळणी, गौरींचे मुखवटे विक्रीसाठी बाजारात आले आहेत. बार्शी सार्वजनिक मंडळे 70 एक गाव एक गणपती 17 एकूण 87 माढा माढा शहर 10 ग्रामीण 54 एक गाव एक गणपती 11 एकूण 75 करमाळा शहर 21 ग्रामीण 104 एक गाव एक गणपती 16 एकूण 141 पंढरपूर शहर 145 ग्रामीण 110 मोहोळ 167 टेंभूर्णी ९६ गणेशोत्सव काळात शांतता राहावी यासाठी होमगार्ड आणि आर सी पी एफ, च्या तुकड्या मागवण्यात येणार आहेत. दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहे. शिवाय रूट मार्च काढण्यात आलेला आहे. शहरातील गणेश मंडळांची बैठक बुधवारी पार पडलेली आहे. या बैठकीत गणेश मंडळांना मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. पोलिस बंदोबस्त वाढवला

​विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे उद्या आगमन होत असून जिल्ह्यातील सुमारे पाच लाख घरात स्वागताची तयारी करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसत आहे. गावो गावी आणि पंढरपूर शहरातही जागो जागी गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी जय्यत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे. दरम्यान पंढरपूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शांततामय गणेशोत्सवासाठी नियोजन केलेले आहे. यंदा नो डॉल्बी गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस प्रशासनाने बक्षीस ठेवले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गेले आठ – दहा दिवसांपासून गणेश मंडळांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. पंढरपूरच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. गौरी – गणपती च्या सजावटीसाठी इलेकट्रीक वस्तूंपासून हार, फुले, विविध खेळणी, गौरींचे मुखवटे विक्रीसाठी बाजारात आले आहेत. बार्शी सार्वजनिक मंडळे 70 एक गाव एक गणपती 17 एकूण 87 माढा माढा शहर 10 ग्रामीण 54 एक गाव एक गणपती 11 एकूण 75 करमाळा शहर 21 ग्रामीण 104 एक गाव एक गणपती 16 एकूण 141 पंढरपूर शहर 145 ग्रामीण 110 मोहोळ 167 टेंभूर्णी ९६ गणेशोत्सव काळात शांतता राहावी यासाठी होमगार्ड आणि आर सी पी एफ, च्या तुकड्या मागवण्यात येणार आहेत. दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहे. शिवाय रूट मार्च काढण्यात आलेला आहे. शहरातील गणेश मंडळांची बैठक बुधवारी पार पडलेली आहे. या बैठकीत गणेश मंडळांना मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. पोलिस बंदोबस्त वाढवला  

बार्शीत 2 कोटी 53 लाखाचे भव्य बौद्ध विहार उभारणार:आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली माहिती

बार्शीत 2 कोटी 53 लाखाचे भव्य बौद्ध विहार उभारणार:आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली माहिती

शहरातील गाडेगाव रोड भागात बौद्ध समाजासाठी सुमारे २ कोटी ५३ लाख ११ हजार रुपये खर्चून एक एकर जागेत भव्य बुद्ध विहार उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. यावेळी आमदार राऊत म्हणाले, बार्शी तालुक्यातील बौद्ध समाजासाठी भव्य बुद्ध विहार साकारण्याचा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता. नालंदा बहुद्देशीय संस्थेसह सर्व बौद्ध समाजाने शहरात बौद्ध विहार उभारण्याची मागणी गेली चार- पाच वर्षापासून केली होती. समाजासाठी गाडेगाव रोड येथे भव्य बुद्ध विहार स्तुप साकारण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच वैराग येथेही लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व भित्तीशिल्प उभारणार असल्याचे सांगितले.यावेळी सत्यजीत जानराव, रमेश गवळी, शंकर वाघमारे, विष्णू कांबळे, ॲड अविनाश गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी नालंदा बहुउद्देशीय संस्था, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, असंघटित कामगार संघटना, दलित महासंघ, भीम शक्ती बहुउद्देशीय संस्था, सम्यक बोधी ट्रस्ट बावी, भीम टायगर संघटना बार्शी, सिद्धार्थ तरुण मंडळ, आदि संघटनेनी आतषबाजी करून जल्लोष साजरा करत आमदार राऊत यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत दहा कोटीचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बार्शी नगर परिषदेला दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला . यामध्ये शंभर टक्के अनुदान असून या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही आमदार राऊत यांनी सांगितले.

​शहरातील गाडेगाव रोड भागात बौद्ध समाजासाठी सुमारे २ कोटी ५३ लाख ११ हजार रुपये खर्चून एक एकर जागेत भव्य बुद्ध विहार उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. यावेळी आमदार राऊत म्हणाले, बार्शी तालुक्यातील बौद्ध समाजासाठी भव्य बुद्ध विहार साकारण्याचा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता. नालंदा बहुद्देशीय संस्थेसह सर्व बौद्ध समाजाने शहरात बौद्ध विहार उभारण्याची मागणी गेली चार- पाच वर्षापासून केली होती. समाजासाठी गाडेगाव रोड येथे भव्य बुद्ध विहार स्तुप साकारण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच वैराग येथेही लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व भित्तीशिल्प उभारणार असल्याचे सांगितले.यावेळी सत्यजीत जानराव, रमेश गवळी, शंकर वाघमारे, विष्णू कांबळे, ॲड अविनाश गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी नालंदा बहुउद्देशीय संस्था, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, असंघटित कामगार संघटना, दलित महासंघ, भीम शक्ती बहुउद्देशीय संस्था, सम्यक बोधी ट्रस्ट बावी, भीम टायगर संघटना बार्शी, सिद्धार्थ तरुण मंडळ, आदि संघटनेनी आतषबाजी करून जल्लोष साजरा करत आमदार राऊत यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत दहा कोटीचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बार्शी नगर परिषदेला दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला . यामध्ये शंभर टक्के अनुदान असून या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही आमदार राऊत यांनी सांगितले.  

संभाजीराजे तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत:डॉ. राजरत्न आंबेडकरांसह इतरांना सोबत घेणार

संभाजीराजे तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत:डॉ. राजरत्न आंबेडकरांसह इतरांना सोबत घेणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुण्यातील स्वराज्य पक्षाच्या ‘स्वराज्य भवन’मध्ये स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर, भारतीय जवान किसान पक्षाचे प्रमुख नारायणराव अंकुशे व इतर घटक पक्षांची एकत्रित बैठक गुरुवारी पार पडली. सुसंस्कृत व सक्षम महाराष्ट्रासाठी राज्यात तिसरा पर्याय देण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केला. या बैठकीला स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, प्रहार पक्षाचे गौरव जाधव, स्वराज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर पाटील आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राने दुसऱ्या राज्यांना दिशा देण्याचे काम केले. परंतु सध्या राज्यातील राजकारण हेवेदाव्यांपुरते उरले असून, राज्य दिशाहीन झाले आहे. म्हणून सक्षम व सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आजची बैठक घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हेही आमच्यासोबत आले आहेत. शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जाण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. संविधानावर आता कुणी बोलत नाही : डॉ. राजरत्न राजरत्न आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी संविधान धोक्यात असल्याचे नरेटिव्ह पसरवले गेले. परंतु आता कुणीही त्यावर बोलताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लावण्याचा निर्णय घेतला. त्याचे काँग्रेसने स्वागत करणे दुर्दैवी आहे.

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुण्यातील स्वराज्य पक्षाच्या ‘स्वराज्य भवन’मध्ये स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर, भारतीय जवान किसान पक्षाचे प्रमुख नारायणराव अंकुशे व इतर घटक पक्षांची एकत्रित बैठक गुरुवारी पार पडली. सुसंस्कृत व सक्षम महाराष्ट्रासाठी राज्यात तिसरा पर्याय देण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केला. या बैठकीला स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, प्रहार पक्षाचे गौरव जाधव, स्वराज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर पाटील आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राने दुसऱ्या राज्यांना दिशा देण्याचे काम केले. परंतु सध्या राज्यातील राजकारण हेवेदाव्यांपुरते उरले असून, राज्य दिशाहीन झाले आहे. म्हणून सक्षम व सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आजची बैठक घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हेही आमच्यासोबत आले आहेत. शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जाण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. संविधानावर आता कुणी बोलत नाही : डॉ. राजरत्न राजरत्न आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी संविधान धोक्यात असल्याचे नरेटिव्ह पसरवले गेले. परंतु आता कुणीही त्यावर बोलताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लावण्याचा निर्णय घेतला. त्याचे काँग्रेसने स्वागत करणे दुर्दैवी आहे.  

छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्याची सुधारणा होणार:राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, 9500 कोटींचा खर्च

छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्याची सुधारणा होणार:राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, 9500 कोटींचा खर्च

पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या कामावर सुमारे ९५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे ते शिरुर हा ५३ किमीचा मार्ग एमएसआयडीसीमार्फत सहापदरी करण्यात येणार आहे. यासाठी ७ हजार ५१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण रस्तामार्गे छत्रपती संभाजीनगर रस्ता सुधारण्यासाठी २ हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरुर ते अहमदनगरपर्यंत टोल वसुली होत आहे. ती वसुली संपल्यानंतर हा मार्ग हस्तांतरित करण्यात येईल. अहमदनगर ते देवगड रस्ता सुधारण्यासाठी तो एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. तसेच देवगड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोल वसुली होत आहे. ती संपल्यावर हा मार्ग एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. याशिवाय बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. या योजनेत नवीन सिंचन विहिरीस अडीच एेवजी ४ लाख तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस ५० हजारांऐवजी १ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. इनवेल बोअरिंगसाठी ४० हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी ५० हजार रुपये आणि परसबागेकरिता ५ हजार अनुदान देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत १२ मिटर खोलींची, दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अटही रद्द करण्यात आली आहे. शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या १ लाख अनुदान देण्यात येते. आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा २ लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल. तुषार सिंचनासाठी सध्या २५ हजार रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच ४७ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल. अशाच प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना ९७ हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. मंत्रिमंडळाचे इतर निर्णय असे ३६ हजारांपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच देणार : स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना १ किलो वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. यासाठीच्या ५६४ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. औद्योगिक कामगार न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते मिळतील : १ जानेवारी २०१६ पासून हा निर्णय लागू करण्यास व त्याच्या थकबाकीपोटी ३७ कोटी ३ लाख ४२ हजार ७२३ रुपये देण्यास कार्योत्तर मान्यता मिळाली. ७ कोटी ५० लाख ४८ हजार ४०० रुपयांच्या मासिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. थकबाकी देणाऱ्या ३५ कुक्कुटपालन संस्थांना दंडव्याज माफ : राष्ट्रीय सहकार विकास निगमने अर्थसहाय्य केलेल्या पण सध्या अवसायनात न निघालेल्या ३५ सहकारी कुक्कुटपालन संस्थांकडील थकबाकी एकरकमी वसूल करून थकीत व्याज व दंडव्याज माफ होणार. या संस्थांकडील एकूण थकबाकी २४ कोटी ६९ लाख ८८ हजार आहे. सुकळीचे (ता. धारूर) खास बाब म्हणून पुनर्वसन यासाठी ११ कोटी ९३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील १५ हजार ४२० चौ. मीटर क्षेत्रावरील घरे रिकामी होणार असून ही जमीन महामंडळास वर्ग करण्यात येईल.

​पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या कामावर सुमारे ९५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे ते शिरुर हा ५३ किमीचा मार्ग एमएसआयडीसीमार्फत सहापदरी करण्यात येणार आहे. यासाठी ७ हजार ५१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण रस्तामार्गे छत्रपती संभाजीनगर रस्ता सुधारण्यासाठी २ हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरुर ते अहमदनगरपर्यंत टोल वसुली होत आहे. ती वसुली संपल्यानंतर हा मार्ग हस्तांतरित करण्यात येईल. अहमदनगर ते देवगड रस्ता सुधारण्यासाठी तो एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. तसेच देवगड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोल वसुली होत आहे. ती संपल्यावर हा मार्ग एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. याशिवाय बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. या योजनेत नवीन सिंचन विहिरीस अडीच एेवजी ४ लाख तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस ५० हजारांऐवजी १ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. इनवेल बोअरिंगसाठी ४० हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी ५० हजार रुपये आणि परसबागेकरिता ५ हजार अनुदान देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत १२ मिटर खोलींची, दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अटही रद्द करण्यात आली आहे. शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या १ लाख अनुदान देण्यात येते. आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा २ लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल. तुषार सिंचनासाठी सध्या २५ हजार रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच ४७ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल. अशाच प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना ९७ हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. मंत्रिमंडळाचे इतर निर्णय असे ३६ हजारांपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच देणार : स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना १ किलो वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. यासाठीच्या ५६४ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. औद्योगिक कामगार न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते मिळतील : १ जानेवारी २०१६ पासून हा निर्णय लागू करण्यास व त्याच्या थकबाकीपोटी ३७ कोटी ३ लाख ४२ हजार ७२३ रुपये देण्यास कार्योत्तर मान्यता मिळाली. ७ कोटी ५० लाख ४८ हजार ४०० रुपयांच्या मासिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. थकबाकी देणाऱ्या ३५ कुक्कुटपालन संस्थांना दंडव्याज माफ : राष्ट्रीय सहकार विकास निगमने अर्थसहाय्य केलेल्या पण सध्या अवसायनात न निघालेल्या ३५ सहकारी कुक्कुटपालन संस्थांकडील थकबाकी एकरकमी वसूल करून थकीत व्याज व दंडव्याज माफ होणार. या संस्थांकडील एकूण थकबाकी २४ कोटी ६९ लाख ८८ हजार आहे. सुकळीचे (ता. धारूर) खास बाब म्हणून पुनर्वसन यासाठी ११ कोटी ९३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील १५ हजार ४२० चौ. मीटर क्षेत्रावरील घरे रिकामी होणार असून ही जमीन महामंडळास वर्ग करण्यात येईल.