[ad_1]

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील १८ मेट्रो स्टेशनपासून शेअर रिक्षाचे १०७ मार्ग पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओने) निश्चित केले आहेत. या मार्गासाठीचे भाडेदेखील निश्चत केले असून, त्याला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) परवानगी दिली आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकापासून शेअर रिक्षा सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मेट्रो स्थानकापासून जलद प्रवासी सेवा मिळावी, यासाठी मेट्रो स्थानक व पुणे रेल्वे स्टेशन येथून शेअर रिक्षा सुरू करण्याचे आदेश मिळाले होते. त्यानुसार ‘आरटीओ’ने १८ मेट्रो स्थानके आणि पुणे रेल्वे स्टेशनपासून शेअर रिक्षाचे मार्ग निश्चित केले आहेत. मेट्रो स्थानकाजवळ जागेनुसार किती रिक्षा उभ्या असाव्यात, त्या ठिकाणाहून किती मार्गांवर शेअर रिक्षा असावी, त्याचे प्रति व्यक्ती दर किती असावेत, हे निश्चित करून दिले आहे. त्यानुसार किमान ११ ते कमाल ४२ रुपयांपर्यंत शेअर रिक्षाचे तिकीट असणार आहे.

बच्चू कडू पुन्हा आक्रमक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा वाचला, शिंदे सरकारवर प्रहार, मोर्चाद्वारे ताकद दाखवली
शहरातील १८ मेट्रो स्टेशनबरोबरच पुणे रेल्वे स्टेशन येथून शेअर रिक्षा सुरू केली आहे. पुणे रेल्वे स्टेशनपासून पुलगेट, वाडिया कॉलेज, संचेती हॉस्पिटल अशा मार्गांवर शेअर रिक्षा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत. नागरिक शेअर रिक्षासह मीटरनेही प्रवास करू शकणार आहेत.

– संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

मेट्रो स्टेशनपासून शेअर रिक्षाचे भाडे

रिक्षा मार्ग प्रति प्रवासी भाडे (रुपयांत)

सिव्हिल कोर्ट ते फडके हौद/ कमला नेहरू रुग्णालय, सिव्हिल कोर्ट ते जे. एम. कॉर्नर/ मॉडर्न शाळा, नळस्टॉप ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालय : ~११

वनाझ ते महात्मा सोसायटी/एकलव्य कॉलेज, वनाझ ते कर्वे पुतळा, रुबी हॉल ते जीपीओ, पुणे महापालिका ते लक्ष्मी रोड/स्वीट होम : ~१२

पुणे रेल्वे स्टेशन ते पोलिस आयुक्त कार्यालय, नाशिक फाटा (भोसरी) ते एमआयडीसी कॉर्नर : ~१३

पीसीएमसी ते साई चौक : ~१४

रुबी हॉल ते एसजीएस मॉल, गरवारे कॉलेज ते टिळक रोड/ सदाशिव पेठ, नळस्टॉप ते सिम्बायोसिस कॉलेज, दापोडी ते जुनी सांगवी : ~१५

नाशिक फाटा ते पिंपळे गुरव : ~१७

पुणे रेल्वे स्टेशन ते एमएसईबी (रास्ता पेठ), शिवाजीनगर ते ज्ञानेश्वर पादुका चौक : ~२१

पीसीएमसी ते केएसबी चौक : ~२२

दापोडी ते नवी सांगवी : ~२५

शिवाजीनगर ते दीपबंगला चौक : ~२८
अमित शहांचं सुप्रिया सुळेंना थेट प्रत्युत्तर, ‘सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली’

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *