[ad_1]

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरुत पोलीस हवालदारानं त्याच्या पत्नीची हत्या केली. आरोपी त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका घ्यायचा. त्याची पत्नी तिच्या आई, वडिलांकडे राहत होती. तिनं ११ दिवसांपूर्वीच गोंडस मुलाला जन्म दिला होता. हवालदार किशोर डीनं त्याच्या २४ वर्षीय पत्नीला फोन केला. तिच्याशी गैरवर्तन केलं. त्यामुळे पत्नी प्रतिभानं त्याचे फोन घेणं बंद केलं.

किशोरनं प्रतिभाला १५० फोन केले. पण प्रतिभानं त्याचे फोन घेतले नाहीत. त्यामुळे किशोर संतापला. तो चामनगर शहरातून निघाला. २३० किलोमीटर अंतरावर कापून तो होसकोटेमधील त्याच्या सासरवाडीत पोहोचला. तिथं त्यानं कीटकनाशक सेवन केलं आणि गळा दाबून पत्नीची हत्या केली. आरोपीची प्रकृती गंभीर आहे. त्याला सुरुवातीला कोलारमधील तमाकास्थित आर एल जलप्पा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती बिघडल्यानं त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर किशोरला अट करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मूल कसं जन्माला येतं, प्रॅक्टिकल दाखवा! NEET विद्यार्थ्याचा प्रश्न, शिक्षिकेचं सडेतोड उत्तर
प्रतिभा बेट्टहलासूर ग्रामपंचायतीचे सचिव सुब्रमण्यम यांची लहान मुलगी होती. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी तिचा विवाह किशोर सोबत झाला. किशोर कोलार जिल्ह्याच्या वीरपुराचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुर, किशोर प्रतिभाच्या चारित्र्यावर शंका घ्यायचा. तो सतत तिच्या मोबाईलमधील मेसेज आणि कॉलचे तपशील तपासायचा. पत्नीला मेसेज पाठवणाऱ्या, तिच्याशी बोलणाऱ्या व्यक्तींच्या भूतकाळाबद्दल प्रश्न उपस्थित करायचा.

रविवारी संध्याकाळी किशोरनं प्रतिभाला फोन केला. तिला ओरडण्यास सुरुवात केली. प्रतिभा रडू लागली. तेव्हा तिच्या आईनं फोन कट केला. किशोरचे फोन घेऊ नकोस असा सल्ला आईनं प्रतिभाला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिभानं मोबाईल पाहिला. किशोरनं तिला १५० कॉल केले होते. प्रतिभानं याची माहिती आई, वडिलांना दिली.
थोडक्यात अनर्थ टळला! रथात स्वार असलेले अमित शहा बालंबाल बचावले; चौकशीचे आदेश
प्रतिभाला संपवल्यानंतर किशोरनं घरातून पळ काढला. मी तिला मारुन टाकलंय, मी तिला मारुन टाकलंय, असं किशोरनं पळून जाताना प्रतिभाच्या आईला सांगितलं. किशोरला आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी अशी मागणी प्रतिभाच्या कुटुंबियांनीी केली आहे. किशोरची आई हुंड्याच्या मागणीवरुन लेकीला त्रास द्यायची, असाही आरोप प्रतिभाच्या कुटुंबियांनी केला. प्रतिभाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन किशोरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *