नवी दिल्ली: देशात्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ सादर केलं. यामध्ये त्यांनी महिला आणि मुलींचा विशेष उल्लेख केला. अर्थमंत्री सीतारामन आपल्या भाषणात म्हणाल्या की, गेल्या १० वर्षात सरकारने महिला कल्याणासाठी खूप महत्त्वपूर्ण कामं केली आहेत. तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणे, महिलांसाठी एक तृतीयांश विधानसभेच्या जागा आरक्षित करणे हे सरकारच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमावर प्रकाश टाकणारे आहे. याशिवाय, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

महिला उद्योजकतेत २८ टक्के वाढ झाल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, गेल्या १० वर्षात पीएम मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना ३० कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लसीकरण

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्याची सरकारची योजना आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ९ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलींना लसीकरण करण्यात येणार आहे, असं अर्थमंत्री म्हणाल्या.

लखपती दीदी २ कोटींवरुन ३ कोटींवर नेणार

लखपती दीदींवर बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की ९ कोटी महिला ८३ लाख बचत गटांमध्ये सामील होऊन सामाजिक वातावरण बदलत आहेत. यामुळे महिलांच्या जीवनात बदल झाला आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, आतापर्यंत सुमारे १ कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. ती लोकांसाठी प्रेरणा बनत आहे. लखपती दीदींना २ कोटींवरून ३ कोटींपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या योजनेने ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल घडून येईल.

अर्थमंत्र्यांच्या भाषणातील महिलांसाठी विशेष मुद्दे

  • गेल्या १० वर्षात महिलांच्या विकासावर सरकारचे विशेष लक्ष
  • उच्च शिक्षणात महिला आणि मुलींची नोंदणी वाढली
  • मुद्रा योजनेअंतर्गत ३० कोटी महिलांना कर्ज
  • उद्योजकतेच्या मदतीने महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न
  • तिहेरी तलाक बेकायदेशीर केला, कडक कायदा आणला
  • देशातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ३३ % आरक्षण विधेयक
  • लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट २ कोटींवरून ३ कोटींवर
  • सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान भारतचे फायदे
  • पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात ७० टक्के महिलांना घरे
  • नऊ कोटी महिला उद्योजकांचे देशाच्या जडणघडणीत योगदानSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *