मुंबई: राज्यात बुधवारी जे.एन.१ च्या २१४ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील जे.एन.१ रुग्णांची संख्या ६६२ वर पोहोचली आहे. यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक १३८ रुग्ण सापडले आहेत. तसेच राज्यामध्ये बुधवारी करोनाचे ४५ नवे रुग्ण सापडले असून, सांगलीमध्ये एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.राज्यात करोनाबाधित आढळणाऱ्या रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात येते. या चाचणीचा बुधवारी आलेल्या अहवालानुसार राज्यामध्ये जे.एन.१ या ओमिक्रॉनच्या नव्या उपप्रकाराचे तब्बल २१४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक १३८ रुग्णांची नोंद झाली असून, त्याखालोखाल नागपूर २५, छत्रपती संभाजी नगरमध्ये २३, सोलापूर व काेल्हापूरमध्ये प्रत्येकी ४, चंद्रपूरमध्ये ३, गडचिरोली व जालनामध्ये प्रत्येकी २ तसेच अकोला, जळगाव, नांदेड आणि रायगडमध्ये प्रत्येकी १ रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील जे.एन.१ रुग्णांची संख्या ६६२ इतकी झाली आहे.एका रुग्णाचा मृत्यूराज्यामध्ये बुधवारी सांगलीमध्ये करोनाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर राज्यामध्ये बुधवारी करोनाचे ४५ नवे रुग्ण सापडले. यामध्ये मुंबईमध्ये १० रुग्णांची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्या २१६ इतकी आहे. राज्यात बुधवारी ९ हजार ४२१ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातील ०.४७ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *