[ad_1]

नवी दिल्ली: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत अनेक रोमांचक सामने झाले पण यापैकी बांगलादेश आणि श्रीलंका सामन्यात मोठा वाद निर्माण झाले आहेत. सोमवारी (६ नोव्हेंबर) श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज टाइम आउटझाल्याने मोठा वाद रंगला आहे. मॅथ्यूज आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आउट होणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. पण मॅथ्यूजच्या आधी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली देखील एकदा टाइमआऊट होण्यापासून वाचले, हा नेमका किस्सा काय आहे जाणून घेऊया.

१६ वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. त्यावेळी गांगुली जर टाइम आउट झाला असता तर आज मॅथ्यूज दुसरा फलंदाज ठरला असता. पण त्यावेळी दादा म्हणून प्रसिद्ध असलेला गांगुली टाइम आउट होण्यातून थोडक्यात बचावला. आता हा प्रश्न नक्कीच चाहत्यांच्या मनात असेल की शेवटी ते प्रकरण काय होतं?

टाइम आउटपासून कसा वाचला होता गांगुली?

हा किस्सा आहे, २००७ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा. जेव्हा भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये कसोटी सामना खेळला जात होता. त्या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने दुस-या डावात तिस-या षटकात दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स ६ धावांत गमावल्या. वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर बाद झाले. यानंतर सचिन तेंडुलकर येणार होता, मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो काही काळ मैदानाबाहेर राहिला. त्यामुळे तो निर्धारित वेळेपूर्वी फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण आंघोळीसाठी गेले होते. त्यादरम्यान सौरव गांगुली ट्रॅकसूटमध्ये फिरत होता. त्याला लगेच तयार होऊन मैदानात यावे लागले. तेव्हा स्टाफमधील अनेकजण गांगुलीला तयार करू लागले.

एकाच चेंडूवर दोन खेळाडू बाद, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टाईम आऊटचा निर्णय

कुणी गांगुलीला पॅड घातले होते तर कुणी इतर मदत करत होते. एवढे सगळे करूनही गांगुलीला मैदानात येण्यास ६ मिनिटे उशीर झाला. तर नियमानुसार त्याला मैदानात जाऊन पुढचा चेंडू ३ मिनिटांत खेळायचा होता. गांगुली ६ मिनिटांच्या विलंबाने मैदानात आला तेव्हा पंचांनी सर्व नियम आणि प्रकरण दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार ग्रॅमी स्मिथला समजावून सांगितले होते. मात्र त्यादरम्यान स्मिथने टाइम आउटचे अपील केले नाही. त्याने खेळाचा आत्मा जपला आणि गांगुलीला टाइम आउट होऊ दिले नाही. अशाप्रकारे गांगुलीने त्या सामन्यात वेळ मारून नेली.

हेल्मेटमुळे टाइम आउट झाला अँजेलो मॅथ्यूज

मात्र, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्यात परिस्थिती पूर्णपणे उलट होती. येथे फलंदाज अँजेलो मॅथ्यूज वेळेवर क्रीझवर आला होता, परंतु त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली आणि त्याने पहिला चेंडू खेळण्यास उशीर केला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनच्या अपीलनंतर मॅथ्यूजला टाइम आउट दिले गेले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *