[ad_1]

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : कांदळवन संरक्षण विभागाने खारफुटी आणि सागरी जैवविविधतेविषयी माहिती देणारे अन् ऐरोली खाडीलगत उभारलेले किनारा आणि विद्यार्थी तसेच, पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. हे दालन विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन आणि ज्ञानाचे केंद्र ठरत आहे. या माहिती केंद्राला डिसेंबरपासून आजतागायत नवी मुंबई महापालिकेच्या ११ तर १५ खासगी शाळांनी भेट दिली आहे. यामध्ये एकूण एक हजार ६५८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कांदळवन कक्ष विनाशुल्क असून खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी २५ रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.कांदळवन कक्षामध्ये असणाऱ्या दालनामध्ये सागरी प्राणी, पक्षी, कांदळवन यांची माहिती मिळत असल्याने पर्यावरणावरील अभ्यासासाठी हे केंद्र विद्यार्थ्यांना वरदान ठरत आहे. या दालनामध्ये मासे, प्राण्यांच्या माहितीसह भरतीओहोटीनुसार चित्रप्रदर्शन लावण्यात आले आहे. एलईडीच्या माध्यमातून प्राण्यांची माहितीही दिली जाते. रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये फिरणारे मासेही डिस्प्लेवर बघता येतात. दृकश्राव्य कक्षात १३ मिनिटांच्या व्हिडिओच्या माध्यमातून कांदळवनाबद्दल माहिती दाखवली जाते. त्यामुळे सागरी जैवविविधता केंद्राच्या प्रदर्शनाला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथील कर्मचाऱ्यांकडून कांदळवन विभागाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये असणारा भाग हा प्रत्यक्ष बघता येत असल्याने त्यांना अभ्यासातही फायदा होत आहे. या केंद्रामध्ये किनारपट्टीच्या रक्षणासाठी खारफुटीचे महत्त्व यांचीही माहिती दिली जाते. तसेच, वेगवेगळे पक्षी आणि प्राण्यांचे आवाजही ऐकता येतात.फ्लेमिंगो सफारीला प्रतिसाददरवर्षी हिवाळ्यामध्ये ठाण्याच्या खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्षी येण्यास सुरुवात होते. मात्र यंदा हिवाळा लांबल्याने फ्लेमिंगो पक्षीही उशीरा ऐरोली ठाणे खाडी परिसरात दाखल झाले आहेत. सुमारे ५० हजार फ्लेमिंगो पक्षी तिथे आले आहेत. डिसेंबरपासून आतापर्यंत सुमारे एक हजार पर्यटकांनी याचा आनंद लुटला आहे. पुढील १५ दिवसांचेही बुकिंग झाले आहे, असे कांदळवन कक्षाचे आधिकारी प्रशांत बहादुरे यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *