[ad_1]

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे समूहानं केलेल्या सर्वेक्षणातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. येत्या निवडणुकीत भाजपला ३०४ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजप मित्रपक्षांसह ३३५ चा आकडा गाठेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला १६६ जागा मिळतील असा कयास आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसरी टर्म मिळेल अशी शक्यता सर्वेक्षणातून समोर आली आहे. मोदींनंतरचं नेतृत्त्व कोणाकडे असेल, मोदींचा वारसदार कोण ठरेल, असे प्रश्न सर्वेक्षणातून विचारण्यात आले. मोदींचा वारसदार होण्यासाठी बहुतांश लोकांना केंद्रीय गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग्य वाटत आहेत. त्यांना मिळालेल्या पसंतीच्या टक्केवारीत फारसं अंतर नाही.मोदींचा वारसदार कोण या प्रश्नाला २९ टक्के लोकांनी अमित शहा असं उत्तर दिलं. तर २५ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या बाजूनं कौल दिला. तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा क्रमांक आहे. त्यांना १६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली. देशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यासाठीही सर्वेक्षण करण्यात आलं. या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशात पहिल्या स्थानी आहेत. त्यांना ४६.३ टक्के लोकांनी पसंती दिली. ऑगस्टमध्ये हाच आकडा ४३ टक्के होता. गेल्या सहा महिन्यांत आदित्यनाथांची लोकप्रियता वाढली आहे.टॉप १० मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठव्या म्हणजेच शेवटून तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांना १.९ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. या यादीत योगींनंतर दुसऱ्या क्रमांकावर अरविंद केजरीवाल आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन चौथ्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पाचव्या स्थानी आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *