[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ट्रॅव्हल्सने जबलपूरला गेल्यानंतर भाजप नेत्या सना खान यांनी २ ऑगस्टला सकाळी नातेवाइकाच्या मोबाइलवर संपर्क साधला. मुलाबाबत विचारणा करून त्याला शाळेत पाठविण्यास सांगितले. खान यांचे हे बोलणे अखेरचे ठरले. त्यानंतर त्यांचा कोणताही सुगावा लागला नाही. दरम्यान सना खान या अद्यापही बेपत्ताच असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. त्यांचा घातपात झाला का, या दिशेनेही पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.

जबलपूरमधील कुख्यात अमित ऊर्फ पप्पू याने १ ऑगस्टला सायंकाळी सना खान यांच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉल केला. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तडकाफडकी सना खान यांनी जबलपूरला जाण्याचा निर्णय घेतला. एका नातेवाइकाने त्याना इंदोरा चौकात सोडले. अखेरच्या ट्रॅव्हल्सने त्या जबलपूरला गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास खान यांनी नातेवाइकाच्या मोबाइलवर संपर्क साधून मुलाबाबत विचारणा केली. त्याला खाऊ घालून शाळेत पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या मोबाइल बंद झाला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास नातेवाइकांनी संपर्क साधला असता खान यांचा मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ होता.

Mumbai Traffic : मुंबईत आजपासून पोलिसांची विशेष मोहीम; वाहन चालवताना ही काळजी घ्यावीच लागेल, अन्यथा…

दरम्यान, सना यांच्या आईने ३ ऑगस्टला मानकापूर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्या बेपत्ता असल्याची नोंद घेतली. पोलिसांचे पथक जबलपूरला रवाना झाले. पोलिसांनी येथे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. रात्री सना व पप्पू यांच्यात वाद झाला. सकाळी ७.१० वाजता मोठी पिशवी घेऊन पप्पू घराबाहेर पडला. कारच्या डिक्कीत पिशवी ठेऊन तो घरून निघाला. त्याच्या दमूआ येथील ढाब्यावर गेला. येथे काम करणाऱ्या जितू नावाच्या नोकराला त्याने डिक्की धुवायला लावली. डिक्कीत रक्त होते. डिक्की धुतल्यानंतर पप्पू तेथून कार घेऊन पसार झाला. दरम्यान, जितूही सागरला गेला. नागपूर पोलिसांचे पथक महुआ येथील ढाब्यावर पोहोचले. चौकशी केली असता जितू गायब असल्याचे समोर आले. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने नागपूर पोलिसांनी त्याला सागरहून जबलपूरला आणले. चौकशी केली असता त्याने डिक्कीतील रक्त साफ केल्याचे सांगितले. भीतीमुळे सागरला गेल्याचेही तो म्हणाला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *