दक्षिण आफ्रिका: भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा अंडर-१९ विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने अंतिम फेरीत उतरणार आहे. यापूर्वी ५ वेळा अंडर-१९ चॅम्पियन बनलेल्या भारताला सहाव्यांदा हे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा २ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस हे भारताच्या विजयाचे नायक होते, पण त्यात आणखी एका खेळाडूचा महत्त्वाचा वाटा होता, ज्याने आधी चेंडूने कहर केला आणि नंतर शेवटच्या षटकात षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी बेनोनी येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंडर-१९ विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना झाला. टीम इंडियासाठी या सामन्यात उदय सहारनने ८१ आणि सचिन धसने ९६ धावा केल्या. या दोघांनी संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र या दोघांशिवाय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज राज लिंबानी यानेही महत्त्वाची भूमिका बजावली.

एक षटकार ठरला विजयासाठी महत्त्वाचा

राज लिंबानीने या सामन्यात टीम इंडियाच्या विजयात एक . छोटेखानी पण माहत्त्वाची भूमिका बजावली. सर्वप्रथम, लिंबानीने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या दोन विकेटसह ३ विकेट घेतल्या, ज्यामुळे स्फोटक फलंदाजांनी भरलेल्या आफ्रिकन संघाला वेगवान सुरुवात करता आली नाही आणि केवळ २४४ धावा करता आल्या. त्यानंतर जेव्हा टीम इंडियाने ७ विकेट गमावल्या होत्या आणि विजय जरा कठीण दिसत होता, तेव्हा फलंदाजीला आलेल्या राजने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले आणि त्यानंतर शेवटची धाव घेत संघ जिंकला.

उपांत्य फेरीआधीच राज लिंबानीने आपल्या उत्कृष्ट स्विंग गोलंदाजीने छाप सोडली होती. अंडर-१९ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापासून उपांत्य फेरीपर्यंत प्रत्येक सामन्यात लिंबानीच्या नावे विकेट्स आहेत. अवघ्या ५ सामन्यात त्याच्या नावावर ८ विकेट आहेत, त्यापैकी त्याने काही कमाल इनस्विंगर टाकत क्लीन बोल्डही केले आहेत. त्याची गोलंदाजी पाहता, एकाच वेळी इरफान पठाण आणि जसप्रीत बुमराहची आठवण होते, जे अशाच चेंडूंनी फलंदाजांना धक्के देतात.
१८ वर्षीय लिंबानी नेहमीच बुमराहला आपला आदर्श मानत आला आहे आणि त्याच्यासारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. तो वडोदरा येथे क्रिकेट शिकला, याच ठिकाणाहून टीम इंडियाला इरफान पठाण आणि हार्दिक पांड्यासारखे मजबूत अष्टपैलू खेळाडू मिळाले. वडोदरमध्ये सेण्यासाठी त्याला कच्छमधील दयापूर हे गाव सोडावे लागले, जे की ५५० किलोमीटर दूर होते, जिथे त्याचे वडील एरंडाची लागवड करत होते.

राजच्या इतर भावंडांनी शिक्षणाचा मार्ग निवडला पण राजने क्रिकेटला आपले माध्यम बनवले. २०१७ मध्ये तो वडोदरा येथे गेला आणि त्याचा क्रिकेट प्रवास सुरू झाला. इथेच त्याने प्रसिद्ध मोतीबाग क्रिकेट क्लबमध्ये एंट्री घेतली, जिथे त्याच्या क्रिकेट करियरला आकार मिळाला. महत्त्वाची बाब म्हणजे याच अकादमीने देशाला इरफान पठाण-युसूफ पठाण आणि हार्दिक पांड्या-कृणाल पांड्यासारखे खेळाडू दिले. आता या अकादमीतून भारतीय क्रिकेटला आणखी एक युवा अष्टपैलू खेळाडू मिळत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *