[ad_1]

मुंबई : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलन सरकारने चिरडून टाकलं. पोलिसांनी मागेपुढे न पाहता आंदोलकांवर तुफान लाठीचार्ज केला. या घटनेने महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध मोर्चे निघतायेत. दरम्यान, सरकारमध्ये नव्याने सामिल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतलेला नाहीये. अजित पवार यांनी सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारीही सर्व सार्वजनिक कार्यक्रम राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, सध्या हाती आलेल्या माहितीनुसार अजित पवार मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित झाले आहेत.

जालन्यातील अंबडच्या अंतरवाली सराटी गावात शांततेत होत असलेल्या आंदोलनाला पोलिसांच्या लाठीचार्जने वेगळे वळण लागले. संपूर्ण राज्यात पोलिसांच्या आणि शासनाच्या भूमिकेवर टीका होत असताना अजितदादाही झाल्या प्रकाराने नाराज असल्याची माहिती आहे. एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांची बाजू सावरत असताना अजितदादांनी मात्र पोलीस दोषी असल्याचंच थेट फेसबुकवरून म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा शब्द राज्यातील नागरिकांना दिला. दरम्यान, सराटी आंतरवलीमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते भेटी देत असताना दुसरीकडे अजितदादांनी मात्र सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारीही सर्व सार्वजनिक कार्यक्रम राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यांची तब्येत बरी नसल्याची देखील माहिती आहे.

५ मिनिट द्या, लगेच फोन करतो, मुख्यमंत्र्यांचा जरांगे पाटलांना मेसेज, नंतर पोलिसांनीच लाठीमार केला, आंतरवालीत काय घडलं?
मराठा समाजाचा वाढता रोष लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मराठा समाजाच्या आरक्षणाप्रकरणी महत्त्वाची बैठक पार पडतीये. सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यात यश आलं नाही. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं जरांगे पाटलांनी निक्षून सांगितलं. दरम्यान, बुलढाण्यातील शासन आपल्या दारी, पुण्यातील दोन-तीन कार्यक्रमांना गैरहजर राहिल्यानंतर आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला अजित पवार पवार उपस्थित राहणार आहेत.

बबनरावांना आसमान दाखवणारे पुतणे साजन पाचपुते शिवसेनेत, ठाकरेंचे हात बळकट करणार
अजितदादा, तुम्ही एक तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा तरी घ्या, नाही तर त्यांची साथ तरी सोडा. राज्यातील मराठा समाज तुमच्याकडे खूप आशेने बघतो अशी आग्रही मागणी अजितदादांच्या गावकऱ्यांनी म्हणजे काटेवाडीच्या तरुणांनी केलीये. मराठा आंदोलनाच्या वाढत्या उद्रेकामुळेच अजितदादांनी सर्व कार्यक्रम राखीव ठेवले का, या चर्चेला उधाण आलं आहे.

आमचं सरकार फेविकॉलचा मजबूत जोडा, फडणवीस-अजित पवारांच्या अनुपस्थितीवर शिंदेंचं स्पष्टीकरण

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *