[ad_1]

बंगळुरू: कर्नाटकात नदीपात्रात शिवलिंग आणि विष्णूची मूर्ती सापडली आहे. मूर्ती १००० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबद्दलची माहिती दिली. कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील एका गावात भगवान विष्णूंची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीच्या चारही बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत. कृष्णा नदीच्या पात्रात ही मूर्ती सापडली.

अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण २२ जानेवारीला झालं. या मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कृष्णा नदीपात्रात सापडलेली भगवान विष्णूंची मूर्ती अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीशी साधर्म्य असणारी आहे. मूर्तीमध्ये विष्णू उभ्या स्थितीत आहेत. त्यांच्या पाठीमागे प्रभावळ असून त्यावर विष्णूचे १० अवतार कोरण्यात आलेले आहेत. मूर्तीसोबत एक प्राचीन शिवलिंगदेखील सापडलं आहे.

नदीपात्रात सापडलेली मूर्ती एखाद्या आधी एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात असावी. मंदिराला नुकसान पोहोचल्यानंतर ती नदीत फेकली गेली असावी, असा अंदाज रायपूर विद्यापीठच्या प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्व विषयाच्या प्राध्यापिका डॉ. पद्मजा देसाईंनी वर्तवला. शिवलिंग आणि विष्णूची मूर्ती १००० वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे. मूर्ती ११ व्या किंवा १२ व्या शतकातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे.

कुणाल गवाणकर यांच्याविषयी

कुणाल गवाणकर
कुणाल गवाणकर

महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… Read More

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *