[ad_1]

कोल्हापूर: राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला, मात्र लग्न झालं नाही अशी तिरकस प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली होती. या प्रतिक्रियेला राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून आम्ही अशा पद्धतीने कोणाकडे ही जात नाही आणि यामुळे साखरपुडा करायचा प्रश्नच येत नाही. मुळात तुमच्याकडे एवढी ताकत होती क्षमता होती तर मला मशाल चिन्ह घ्या म्हणून का म्हणत होता या प्रश्नाचे उत्तर आधी त्यांनी द्यावं, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.ठाकरे गट आणि स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांची चर्चा फिसकटल्याने ठाकरे गटाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सत्यजीत पाटील यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे राजू शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात असून यामुळे आता या मतदारसंघात चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान या सर्वांवर स्वाभिमानी पक्षाकडून उमेदवार असलेले राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत, उमेदवार म्हणून लढत किती रंगी असावी हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. निवडणूक लढवणं माझं काम आहे आणि निवडणूक लढवणार हे काय आज मी जाहीर केलेलं नाही. किती रंगीत लढत का होईना मी तयारी करत चाललो आहे. मत विभागणीची चिंता जे उमेदवार उभे करत आहेत, त्यांनी करावी असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
सांगलीच्या जागेवरून मविआमध्ये ठिणगी; जागा लढण्याबाबत काँग्रेस ठाम, कार्यकर्ते राजीनामे देण्याच्या तयारीत
तसेच पहिल्यापासूनच महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही हा निर्णय आमचा पक्का होता. याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष राज्यामध्ये होते. तेव्हा उसाची तीन टप्प्यात एफआरपी करण्यात आली होती. जो शेतकऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवणार होता. त्यासाठी आम्हाला संघर्ष करून एक रकमी एफआरपी घ्यावी लागली. शक्तीपीठ महामार्ग करण्याची महायुती सरकारची हिम्मत कशी झाली ते म्हणजे महाविकास आघाडीने त्यांच्या काळात यासाठी पायघड्या घालून ठेवल्या होत्या. शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाकारला गेला. मग आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचे कायदे होत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलो. यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणुकीत येणार नाही, असे आम्ही म्हणालो होतो, असं शेट्टी यावेळी म्हणाले.

गेल्या तीन निवडणुका मी या मतदारसंघातून लढलो आहे. यामुळे मत विभागणीची काळजी आम्हाला करायची गरज नाही. मात्र यामध्ये भाजपच्या मतांचे भर पडले तर निवडणूक सुखकर होईल. यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा केली. त्यासाठी दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलो सुरुवातीला अनुकूलता दाखवली. मात्र कुठून काय चाव्या फिरल्या माहित नाही. मात्र दोन्ही आघाड्यामधील कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान करत आहेत, असे माझ्यात कानावर आले आहे. मात्र पुन्हा एकदा त्यांना आम्ही मैदानात लोळवू. त्यांनी दुसरा उमेदवार दिला याबद्दल माझी काहीही तक्रार नाही, असे ही शेट्टी यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर देखील निशाणा साधला असून अजून कोणाला जातीचे कार्ड घेऊन निवडणुकीत उतरायचं असेल तर त्यांनी खुशाल उतरावं. हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि शाहू महाराजांचा जिल्हा आहे, असेही शेट्टी म्हणाले आहे.

चौरंगी लढतीत जिंकण्याचा आनंद वेगळा, राजू शेट्टी जिंकतीलच!; कार्यकर्त्यांना विश्वास

महाविकास आघाडीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिसरा उमेदवार दिल्यानंतर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, अशी टीका केली होती. दरम्यान या टीकेला राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले असून मला आता कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही. हे केस पांढरे झाले ते चळवळीतून आणि अनुभवातून. मला सल्ला देण्यापेक्षा आपलं काय आहे ते त्यांनी बघावं. मतदारसंघात जाईल तेथे लोक अडवत आहेत आणि मित्र पक्षाचे लोक तुम्हाला जवळ करत नाही आहेत. मतदारसंघात माझा एक राऊंड झाला त्यांचा अजून समजूत काढण्यात दिवस चालले आहेत. ते त्यांनी पहावं असा टोला शेट्टीने धैर्यशील माने यांना लगावला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *