मुंबई : सचिन तेंडुलकरचा लाडका मुलगा, अशी काही वर्षांपूर्वी अर्जुनची ओळख होती. पण अर्जुन तेंडुलकर आता आपली स्वत:ची ओळख बनवू लागला आहे. आयपीएलमध्ये त्याने चमक दाखवलीच, पण रणजी स्पर्धेतही तो चमकत आहे. अर्जुन हा सतत चाहत्यांच्या चर्चेचा एक विषय असतो. पण गेले काही दिवस अर्जुन नेमका आहे तरी कुठे हे कोणालाच माहिती नाही. कारण आता आयपीएलचा मोसम काही दिवसांवर आला असताना अर्जुन नेमका आहे तरी कुठे, ही चर्चा सुरु झाली आहे.

अर्जुनने मुंबई इंडियन्सच्या संघाकडून फक्त गेल्या मोसमात पदार्पण केले नाही, तर विजयातही मोलाचा वाटा उचलला. सुरुवातीच्या षटकांत स्विंग गोलंदाजी तर त्याने केलीच, पण अखेरच्या षटकांमध्ये अचूक आणि भेदक मारा करत संघाच्या विजयाच हातभार लावला. अर्जुन हा फक्त एक गोलंदाज नाही, तर तो धडाकेबाज फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे अर्जुनसारखा अष्टपैलू खेळाडू मुंबई इंडियन्सला मिळाला आहे आणि आता पुढच्या मोसमात त्याच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. त्यामुळे अर्जुन मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर सराव करतोय की नाही, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन तेंडुलकरचे काही फोटो फेसबूकवर पाहायला मिळाले होते. त्यावेळी अर्जुन हा एका सलुनमध्ये असल्याचे दिसत आहे आणि आपली नवीन हेअरस्टाइल करत असल्याचे दिसत आहे. अर्जुन चांगला क्रिकेट खेळतोच पण आता त्याला बॉलीवूडचे वेध लागले आहेत की का, अशी चर्चा हे फोटो पाहिल्यावर चाहत्यांच्या मनात आले आहेत. काही चाहत्यांना अर्जुन हेअरस्टाइल चांगलीच आवडली आहे आणि तो आता मॉडेलिंगकडे वळणार का, अशी चर्चाही ते करत आहेत. पण अर्जुन हा आयपीएलची तयारी करण्यात मग्न असेल, असे संकेत मिळत आहेत. अर्जुन सध्या कुठे आहे, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण आयपीएलसारख्या थकवणाऱ्या स्पर्धेपूर्वी कूल लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

अर्जुनसाठी यावर्षी काय महत्वाचे असेल…

अर्जुनने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते, त्यावेळी तो नवीन होता. पण यावर्षी मात्र त्याला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आणि संघातील स्थान निश्चित करावी लागेल. त्यामुळे यावर्षी अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून खेळताना चांगलाच घाम गाळावा लागेल.

सचिनचा लकी नंबर अर्जुनच्या पाठीशी; जर्सीचे खास कनेक्शन!

अर्जुनने जर मुंबई इंडियन्सकडून खेळताना नेत्रदीपक कामगिरी केली, तर त्याची वर्णी ही भारताच्या संघातही लागू शकते. त्यामुळे या आयपीएलच्या हंगामात तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *