मुंबई : विधिमंडळ पक्षातील बहुमत अधोरेखित करून अगदी शिवसेनेसारखाच निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही निवडणूक आयोगाने दिलेला आहे. यांचा गट म्हणजेच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असा निर्णय देतानाच चिन्ह घड्याळ हे देखील अजित पवार यांनाच बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. या निर्णायाने आनंदित होऊन राज्यभरातील अजित पवार गटाचे कार्यकर्ते सेलिब्रेशन करतायेत. दुसरीकडे गटाने मात्र निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा निकाल हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानण्यात येतोय. दुसरीकडे वारंवार शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या अजित पवार गटाला हा सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय.निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवारांचा व्हिडीओ ट्विटमी आता ८०-८२ वर्षांचा झालो- म्हातारा झालो असं म्हणतात…. मी म्हटलं कुणाला सांगता म्हातारा झालोय… तुम्हाला काय ठाऊक आहे अजून… तुम्ही काय खोलात जाऊन बघितलंय काय? जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ आहे तोपर्यंत हे गाडं थकणार नाही आणि थांबणार नाही, असे सांगताना एकप्रकारे शरद पवार हे सक्रिय राजकारणातून बाजूला जाणार नाही, असेच पवार गटाने सूचित केले आहे.अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही२०२२च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत, असं राष्ट्रवादीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय.माझ्यासोबत कुठल्याही जिल्ह्यात या मग वास्तव कळेल, अजित पवार यांचं शरद पवार गटाला चॅलेंजपक्षसंघटनेतील बहुसंख्य सदस्य माझ्या बाजूने आहेत. हेच लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने आजचा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. या निर्णयाचा आनंद देखील आहे. निवडणूक आयोगाने आमची बाजू खरी मानली. बहुसंख्य लोक ज्यांच्या बाजूने तेच लोक पक्ष चालवतात. त्यामुळे आम्ही पक्ष पळवला हे म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांनी कुठल्याही जिल्ह्यात माझ्यासोबत यावं- मग त्यांना वास्तव परिस्थिती कळेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *