[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : साडेसात हजार रुपये परत दे असा तगादा लावणाऱ्या तरुणाला रस्त्यामध्ये गाठून त्याचयावर गावठी कट्ट्याने गोळी झाडून त्याची हत्या केली. या घटनेतील मृत तरुणाचे नाव हमद सलेह अब्दुल्ला कुतुब ( वय २४,रा. गली नंबर १४, बायजीपुरा ) असे आहे. तर, गोळीबारात आणखी एक व्यक्ती जखमी झाला असून त्याचे नाव समोर आलेले नाही. गोळीबार करणाऱ्याचे नाव फैयाज पटेल (रा. गली नंबर २१ बायजीपुरा) असे आहे. ही घटना बुधवारी (९ ऑगस्ट) सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणात पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बायजीपुरा भागाच्या मुख्य रस्त्यावर हयात क्लिनिक आणि आर एम एस फार्मा नावाच्या दुकानासमोर मयत हमद चाऊस कुतुब आणि मारेकरी फैयाज पटेल यांच्यात जुन्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. या वादा नंतर फैयाज पटेल यानं सोबत आणलेल्या गावठी कट्ट्यानं हमद चाऊस याच्यावर नेम धरून गोळीबार केला. जवळून केलेल्या या गोळीबारामुळे हमद चाऊस कुतुब जखमी झाला. त्याच्यावर पुन्हा गोळीबार करण्याच्या इराद्याने पटेल यांनी गोळी चालवली ही गोळी हयात क्लिनिक मध्ये आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला लागली. हमदला वाचवण्यासाठी काही करून धावत आले. लोक जमा होत असल्याचे पाहून मारेकरी पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, तसेच विशेष पथकाचे पोलीस कर्मचारी पोहोचले होते. मारेकरी फैयाज पटेल याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना समजताच घटनास्थळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपयुक्त शीलवंत नांदेडकर, तासेच विविध ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोहोचले होते. आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून आरोपी हा बायजीपुरा परिसरातच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे दरम्यान, या घटनेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेप्रकरणी तपास सुरु केला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *