पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. अगदी विशीतल्या पोरांनीसुद्धा हातात कोयता आणि बंदूक घेतली आहे. बोलायचं झालं तर पुणे शहरात दररोज काही ना काही, कुठे ना कुठे गुन्हा होत आहे. ज्या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं, त्याच पुण्यात तरुणांनी हातात कोयता आणि बंदुक घेऊन नंगानाच चालवला आहे. या सर्व घटनांवर कुठे ना कुठे चाप बसावा, म्हणून आज पुणे पोलीस आयुक्तालयात शहरातील कुख्यात तसेच नामचीन आणि नुकतेच गुन्हेगारीत पदार्पण केलेल्या तरुणांना बोलावण्यात आलं होतं. पुणे पोलीस आयुक्तालयात सर्व गुंडांची ओळख परेड करण्यात आली. आयुक्तालयात तब्बल २०० ते ३०० गुंडांची पोलिसांकडून परेड करण्यात आली आहे. कुख्यात गजा मारणे टोळी, निलेश घायवळ, गणेश मारणे टोळी, बापू नायर टोळी, उमेश चव्हाण टोळी, बंटी पवार टोळी आणि बाबा बोडकेसह अनेक गुंडांची ओळख करण्यात आली. पुण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त अमोल झेंडे यांचा गुंडांना हा पहिलाच दणका असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, पार्थ पवारांनी ज्या गुंडाची भेट घेतली तो म्हणजे गजा मारणे त्याची देखील पोलिसांकडून परेड करण्यात आली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ सोबतचा फोटो ट्विट केला, त्याची देखील पोलिसांनी परेड घेतली आहे. पोलीस उपाआयुक्त अमोल झेंडे यांनी गुन्हेगारी टोळ्यांना अटकाव करण्यासाठी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी टोळ्यातील प्रमुख आणि साथीदारांना ओळख परेडसाठी बोलावण्यात आले होते. पोलिसांच्या काय काय सूचना?गुन्हेगारी करायची नाही, रिल्स बनवायचे नाहीत. स्टेटसला गुंडगिरीचे व्हिडिओ ठेवायचे नाहीत, अशी तंबी पोलीस उपाआयुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गुन्हेगार आपलं स्वत:चं वर्चस्व दाखवण्यासाठी रिल्स शूट करून त्यांच्या अकाउंटवर पोस्ट करत असल्यामुळे समाजात विकृती पसरत आहे. त्यासोबतच गुन्हेगार यांना कोणताही गुन्हा केण्यापूर्वी विचार करावा अन्यथा कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल, असा थेट इशारा पोलीस उपाआयुक्त अमोल झेंडे यांनी दिला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *