[ad_1]

पंकज गाडेकर, वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाच टर्म खासदार असलेल्या शिवसेनेच्या विद्यमान लोकप्रतिनिधी भावना गवळी यांचा पत्ता कट होणं निश्चित मानलं जात आहे. महायुतीकडून राजश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीनेही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेला उमेदवार बदलला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी वाटाघाटी केल्या होत्या, परंतु त्यांना यश न आल्याने अनेक ठिकाणी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून आंबेडकरांनी सुभाष पवार यांना तिकीट जाहीर केलं होतं.

यवतमाळ वाशिम येथे दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (४ एप्रिल) शेवटची तारीख आहे. त्याच्या आदल्या रात्री वंचितने अचानक उमेदवार बदलण्याचा निर्णय जाहीर केला.

वंचितने आता सुभाष पवार यांच्या जागेवर अभिजीत राठोड हे नवे उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे. अभिजीत राठोड हे आज वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी फायनल, ज्योती मेटे ‘सिल्व्हर ओक’ला, पाच संभाव्य उमेदवार कोण?
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मोठी खलबतं घडत आहेत. विद्यमान शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या जागेवर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपला उमेदवार बदलला आहे.
महायुती बैठकस्थळी उदयनराजेंची वेशांतर करुन एन्ट्री, पण चर्चेला दांडी; म्हणतात, निदान डोळा तरी मारा…
सुरुवातीला सुभाष पवार यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली होती. मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी कारंजा मानोरा विधानसभा प्रभारी अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

अभिजीत राठोड हे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील रहिवाशी असून कारंजा मानोरा विधानसभा प्रभारी आहेत. ते आज वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *