[ad_1]

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करताना सादर कराव्या लागणाऱ्या हमीपत्रात चार फुटांपर्यंतची मूर्ती, तसेच शाडू, पर्यावरणपूरक मूर्तींची अट घालण्यात आली होती. यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानग्या रखडल्या होत्या. या हमीपत्राविषयी मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी नाराजीही व्यक्त केली. अखेर गुरुवारी मुंबई महापालिकेने नवीन हमीपत्र जारी केल्याचे परिपत्रकच काढले. या नवीन हमीपत्रातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणेशमूर्तींची उंची आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट काढण्यात आली.

हमीपत्रात काही दुरुस्ती आवश्यक असल्याने सुधारित हमीपत्र तयार करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली. जुन्या हमीपत्रात ‘प्रतिष्ठापना करत असलेली चार फुटांपर्यंतची मूर्ती शाडू, पर्यावरणपूरक साहित्याने साकारलेली असेल, हे आम्हाला मान्य असेल,’ अशी अट होती. त्यामुळे मंडप परवानगीसाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाइन अर्ज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सादर करण्यात आले नाहीत. या हमीपत्रातील अटींवरून मंडळांमध्ये गोंधळ निर्माण झाला. अखेर गुरुवारी मुंबई महापालिकेने नवीन हमीपत्रासंदर्भात परिपत्रक जारी करून ही अट काढली.

ऑनर किलिंगच्या घटनेने महाराष्ट्र हादरला, बापाने लेकीला संपवलं अन् शेतात नेऊन मृतदेह जाळला
महापालिकेकडून ऑनलाइन परवानगीच्या अंतर्गत जे हमीपत्र मंडळांकडून सादर करण्यासाठी सांगितले होते, त्यामध्ये गणेशमूर्तींची उंची आणि पर्यावरणपूरक अटीवरून गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, नवीन हमीपत्र जारी करून मूर्तींच्या उंचीबाबत शिथिलता आणली आहे. राज्य सरकारने १७ मेच्या बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे पीओपीची मूर्ती ठेवण्यास आक्षेप घेतला नसल्याचे बृहन्मंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेचे उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक रमकांत बिरादार यांनी, नवीन हमीपत्र काढले आहे.

सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचे निलंबन

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *