या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांचे लोक मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. हे प्रकरण शहर कोतवाली येथील छोटा बाजार परिसरातील आहे. मंत्र्याचे पीआरओ दिलीप गुप्ता आपल्या कुटुंबासह येथे राहतात. त्यांचा १४ वर्षांचा मुलगा हा शहरातील एका शाळेत दहावीचा विद्यार्थी होता. त्याच्या परीक्षाही सुरू होत्या.
अचानक त्याने घरातील खोलीत दुपट्ट्याने गळफास लावून घेतला. त्यावेळी घरातील सदस्य घरी नव्हते. काही वेळाने कुटुंबीय घरी पोहोचले असता खोलीत त्याचा मृतदेह लटकलेला दिसला. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेनंतर राज्यमंत्री रामकेश निषाद, भाजप जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्यातील सर्व नेते घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे की मृताच्या कुटुंबीयांनी परीक्षेमुळे मोबाईल फोन वापरल्याने त्याला रागावलं होतं. त्यामुळे तो तणावाखाली आला.
कोतवाली नगरचे एसएचओ मनोज कुमार शुक्ला यांनी सांगितले की, शहरातील छोटा बाजार परिसरात एका मुलाने आत्महत्या केली आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रागावले होते, त्यामुळे तणावाखाली येऊन त्याने हे पाऊल उचलल्याचं समोर आले आहे. शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली जाईल. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.