येत्या काही दिवसांत टायर कंपनीचा स्टॉक ३००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने १९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अहवालात ३००० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह सीएट टायरचे शेअर्स खरेदी (बाय) करण्याचा सल्ला दिला आहे, तर १४ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या नोटमध्ये प्रभुदास लिलाधर यांनी २४३० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी शेअर होल्ड करण्यास सांगितले होते. दरम्यान, सोमवारच्या सत्रात कंपनीचा स्टॉक ०.३४% वाढीसह २१४६.१० रुपयांवर बंद झाला.
दरम्यान, गेल्या एका महिन्यात स्टॉकच्या किंमतीत ६.३४% घट झाली असली तरी तीन महिन्यांत ३.४१% परतावा दिला आहे. तसेच एका वर्षात परतावा ३४% हून अधिक, तर गेल्या तीन वर्षांत स्टॉक १२३ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
सीएट शेअर Buy की Sell?
याशिवाय एकूण २० विश्लेषकांनी CEAT टायर्सवर आपले मत दिले, यापैकी पाच विश्लेषकांनी स्ट्राँग बाय रेटिंग दिले तर तीनने बायचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे काही विश्लेषक या शेअर्सबाबत बियरिश आहेत. यापैकी पाच जणांनी सेल रेटिंग दिले असून तीनने स्ट्रॉंग सेल रेटिंग दिले आहे, तर चौघांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
गुंतवणूकदारांचे एक लाखाचे झाले एक कोटी
जर आपण CEAT टायर शेअर्सच्या परताव्याबद्दल बोललो, तर आतापर्यंत त्याने ९९०९ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. २१.४५ रुपये किंमत असलेल्या या शेअरने गेल्या २३ वर्षे आणि नऊ महिन्यांत प्रत्येक शेअरवर २१२५.६५ रुपयांचा फायदा दिला असून या शेअरमध्ये पैसे गुंतवलेल्या लोकांच्या एक लाख रुपयांची गुंतवणूक आजपर्यंत १ कोटी रुपयांमध्ये रूपांतरित झाली असेल.
(Disclaimer: तज्ञांनी दिलेल्या शिफारशी, सूचना, विचार आणि मते ही त्यांची स्वतःची आहेत आणि महाराष्ट्र टाइम्सची नाही. इथे दिलेली माहिती फक्त शेअर्सच्या कामगिरीबद्दल आहे आणि गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीच्या अधीन असते आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)