[ad_1]

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. विविध क्षेत्र आणि करदात्यांना निवडणुकीपूर्वीच्या या आगामी अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, पण या अपेक्षा कितपत पूर्ण होतील हे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच समजेल. अर्थसंकल्प २०२४ चे काउंटडाउन सुरू झाले असून आगामी अर्थसंकल्पाची सर्व तयारी पूर्ण झाली असून नुकताच पारंपारिक हलवा सोहळाही पार पडला.

यंदाचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्त्वाचा असेल प्रथम कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार अर्थसंकल्पातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदा नव्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. अंतरिम अर्थसंकल्प कधी सादर होणार, किती वाजता होणार, अर्थसंकल्पीय भाषण लाइव्ह कुठे बघायला मिळणार? चला, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

अर्थसंकल्पात मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट, निवडणुकीपूर्वी करोडो शेतकऱ्यांना फायदा होणारा निर्णय घेऊ शकते
२०२४ बजेट कधी सादर केले जाईल?
मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर २८ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारीला बजेट सादर करण्याची परंपरा सुरू केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील जो यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच अखेरचा अर्थसंकल्प असेल. अशा स्थितीत पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही आणि तात्पुरती आर्थिक योजना किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ असेल. दरवर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळीही अर्थसंकल्पासाठी हाच दिवस निश्चित करण्यात आला आहे.

Union Budget 2024: अर्थसंकल्पाकडून करदात्यांना मोठ्या अपेक्षा, अर्थमंत्र्यांच्या पिटाऱ्यातून काय निघणार?
अर्थसंकल्पीय भाषण किती वाजता सुरू होणार?
बजट सत्राची सुरुवात ३१ जानेवारी रोजी होते जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सत्राला उद्देशून भाषण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प सादर केले जाते. साधारणतः १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केले जाते. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पही ११ वाजता सादर केला जाईल. सामान्यांपासून क्षेत्रीय विकासासाठी यंदा अर्थमंत्र्यांच्या पिटाऱ्यातून काय-काय निघेल, याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे.

Union Budget 2024: मध्यमवर्गाला आयकरात सूट; उद्योग, शेतकऱ्यांना मदतीची आस, अर्थसंकल्पात कोणाला काय मिळणार?
केंद्रीय अर्थसंकल्प कुठे बघायला मिळणार?
केंद्रीय अर्थसंकल्पाचे लाइव्ह प्रक्षेपण खाली दिलेल्या चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिले जाऊ शकते.
– दूरदर्शन
– संसद टीव्ही
– अर्थ मंत्रालयाचे YouTube चॅनेल
– विविध वृत्तवाहिन्या

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *