[ad_1]

नवी दिल्ली : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने यावर्षी तीन अब्जाधीशांना धक्का देऊन मोठी कमाई केली आहे. हिंडेनबर्ग सुप्रसिद्ध कंपन्यांच्या विरोधात नकारात्मक अहवाल जारी करत शॉर्ट सेलिंग करतं. कंपनी शॉर्ट सेलिंग करून रग्गड कमाई करत आहे. या शॉर्ट सेलिंगने कंपनी एकीकडे आपला खिसा भरत असताना, दुसरीकडे कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. कंपनीविरुद्ध नकारात्मक अहवाल त्यांच्या शेअर्सवर परिणाम करतात. या वर्षी हिंडेनबर्गने तीन अब्जाधीशांच्या विरोधात आपला अहवाल जारी केला, ज्यामुळे या अब्जाधीशांना $ ९९ अब्जचा फटका बसला.

हिंडेनबर्गने तीन अब्जाधीशांना धक्का दिला

हिंडेनबर्गने या वर्षाच्या सुरुवातीला अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध केला. २४ जानेवारी २०२३ रोजी, शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपनीविरुद्ध अहवाल जारी केला. हा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये असलेले गौतम अदानी ३४ व्या क्रमांकावर घसरले. अदानी समूहाचे मार्केट कॅप $१०० अब्ज पेक्षा जास्त घसरले आहे. अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले आणि नीचांकी पातळीवर पोहोचले.

अदानीनंतर ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी हिंडनबर्गच्या निशाण्यावर आले. हिंडेनबर्गने ट्विटरच्या माजी सीईओ संदर्भात एक वादग्रस्त अहवाल जारी केला. यानंतर ८७ वर्षीय अमेरिकन अब्जाधीश कार्ल इकान हिंडनबर्गच्या निशाण्यावर आले. हिंडेनबर्गच्या गौप्यस्फोटामुळे कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. गुंतवणूकदारांकडून कंपन्यांचे पैसे काढण्यास सुरुवात केली. शेअर्सचे भाव गगनाला भिडले. अदानीबद्दल बोलायचे झाले तर अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स खालच्या पातळीवर पोहोचू लागले.

९९ अब्ज डॉलर्स टाकले

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने आपल्या अहवाल आणि गौप्यस्फोटांसह या कंपन्यांना मोठा धक्का दिला आहे. या अहवालामुळे गौतम अदानी, जॅक जर्सी, कार्ल इकान यांची संपत्ती ९९ अब्ज डॉलर म्हणजेच ८१,९७,०२,१८,००,००० इतकी संपत्ती बुडाली. इतकंच नाही तर हिंडेनबर्गच्या नकारात्मक अहवालामुळे या तीन अब्जाधीशांच्या कंपन्यांनी १७३ अब्ज डॉलरहून अधिक रक्कम बुडवली. कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या कंपन्यांचे मार्केट कॅप $ १७३ अब्जांनी घसरले.

हिंडनबर्गचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते पैशासाठी हे सर्व करत नाहीत. अँडरसनने सांगितले होते की, मी दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो. कंपन्यांचे खरे चित्र मी लोकांसमोर आणतो असे ते म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *