[ad_1]

अबू धाबी: अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या लॉटरी जिंकल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. यामध्ये भारतीयांचाही मोठा समावेश असतो. तसेच, विदेशातही अनेक भारतीय लॉटरी जिंकून श्रीमंत होतात. मध्य-पूर्व देशांमध्ये लॉटरी खरेदी करणे सामान्य आहे. येथे लोक लॉटरी जिंकून क्षणात श्रीमंत होतात. असाच काहीसा प्रकार एका भारतीय व्यक्तीसोबत घडला आहे. केरळमधील एका व्यक्तीने संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये लॉटरी जिंकली आहे. यामध्ये ३३ कोटी रुपये मिळाले आहेत.

खलीज टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ४० वर्षीय राजीव अरिक्कट यांनी सोमवारी (५ फेब्रुवारी) मोफत तिकीट क्रमांक ०३७१३० वर जॅकपॉट जिंकला आहे. राजीव हे येथे आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन म्हणून काम करतात. गेल्या १० वर्षांपासून तो अल ऐनमध्ये राहतात. त्यांनी खलीज टाईम्सला सांगितले की, ‘मी गेल्या तीन वर्षांपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करत आहे. पण, जिंकण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे.’ लॉटरी जिंकण्यासाठी त्याने एक युक्ती वापरली. त्याच्या पत्नीने त्याला ७ आणि १३ क्रमांकाची तिकिटं निवडण्यास मदत केली, या त्याच्या दोन मुलांच्या जन्मतारखा आहेत.
गवंड्याचं पालटलं नशीब! ज्या सवयीमुळे बायको रोज भांडायची, त्याचमुळे झाला कोट्यधीश; काय घडलं?
मात्र, त्यांना मोफत तिकीटावर जॅकपॉट लागला. ते म्हणाले, ‘मला बिग तिकीटमधून खास ऑफर मिळाली होती. दोन तिकिटं खरेदी केल्यावर मला चार मोफत तिकिटं मिळाली. मात्र, राजीवला त्याची जिंकलेली रक्कम काही लोकांसोबत वाटावी लागणार आहे. कारण, त्याने घेतलेल्या दोन तिकिटांसाठी काही लोकांनी पैसे दिले होते. बिग तिकीट हा अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी बक्षीस सोडत आहे.

तुम्ही गरिबांच्या अन्नधान्यात पैसे खाता? विवेक कोल्हे भर बैठकीत तहसीलदारावर संतापले

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अशी बातमी आली होती की UAE मध्ये राहणाऱ्या एका भारतीय ड्रायव्हरने ४५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती. मुनव्वर फिरोज नावाच्या व्यक्तीने ३० लोकांसोबत मिळून एक तिकीट खरेदी केलं होतं, ज्यावर त्याला ४५ कोटींची लॉटरी लागली होती. त्यालाही आपले पैसे इतर त्या लोकांसोबत शेअर करावी लागली होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *