[ad_1]

मुंबई: मोबोईलमुळे आज संपूर्ण जग जवळ आलं आहे. आज बहुतेक लोकांच्या जीवनात मोबाईल फोनने आपलं महत्त्वाचं स्थान निर्माण केले आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. मोबाईल हा एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. पण, थोड्याशा निष्काळजीपणामुळे तो फटाक्यासारखा स्फोट होऊन आपल्यासाठी जीवघेणा ठरु शकतो. जवळपास प्रत्येक मोबाईल कंपनी सांगते की मोबाइल चार्ज होत असताना मोबाइलवर बोलू नये, त्यामुळेच असे अपघात घडतात. पण, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याचे काय परिणाम होतात, याचच उदाहरण सध्या एका व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खुर्चीवर आरामात बसून बोलताना दिसत आहे. तो त्याच्या संवादात पूर्णपणे मग्न होता.

मोबाइलवर बोलत होता आणि दुसरीकडे तोच मोबाइल चार्जरला जोडलेला होता. मोबाइल चार्ज करत असताना तो मोबाइलवर बोलत होता. तेवढ्यात तिच्या कानाजवळ मोबाइलचा जोरात स्फोट झाला. स्फोट होताच त्याने मोबाइल फेकला आणि आपला कान झटकत इकडे तिकडे पळू लागला.

चार्ज होत असताना कधीही वापरु नये असे प्रत्येक मोबाईल कंपनी सांगते. चार्जिंग दरम्यान मोबाईलचे तापमान वाढते. अशा परिस्थितीत अपघाताची शक्यताही वाढते. या व्यक्तीबाबतही असेच घडले. मोबाईल चार्ज झाल्यामुळे तो खूप गरम झाला आणि त्याच्या कानात स्फोट झाला. हा व्हिडिओ शेअर करून इतरांनी अशा चुका करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुलाचा मृत्यू, वडिलांनी विम्याचे ९० लाख घेतले, १७ वर्षांनी घरच्यांनीच धक्कादायक रहस्य उलगडलं
Read Latest Maharashtra News And Marathi News



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *