नाशिक : शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारमधील कॅबिनेट मंत्री पक्षांतराच्या तयारीत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या यांनी केला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत असलेल्या छगन भुजबळ यांनी भाजपचा हात धरण्याची तयारी केला असल्याचा मोठा दावा अंजली दमानियांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावरुन केला आहे. मात्र आपल्याला कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

अंजली दमानिया यांचं ट्वीट काय?

“भुजबळ भाजप च्या वाटेवर? एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?कुठे फेडाल हे पाप” असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.छगन भुजबळ यांना देश पातळीवरील ओबीसी चेहरा भाजपला बनवायचं आहे, असं माझ्या कानावर आलं होतं. परंतु यात काही तथ्य नसेल, असं मला पूर्वी वाटलं होतं, परंतु आता याबाबत खात्रीशीर माहिती आहे. याच भाजपने भुजबळांच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पाडण्यासाठी जनहित याचिका केली होती. मला कळतं ते चुकीचं असू शकत नाही, असं दमानिया ठामपणे म्हणाल्या.

छगन भुजबळांनी दावा फेटाळला

भाजप प्रवेशाबाबत मला अजून काही माहिती नाही, त्यांना कशी काय माहिती मिळाली, हे मला कळत नसल्याचं छगन भुजबळ म्हणाले. मला कुठल्या पदाची हौस नाही, गेल्या ३५ वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे, अशी अपेक्षा नाही. असे कुठलेही प्रपोजल मला आले नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे, माझी काही घुसमट होत नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

भुजबळांचा राजकीय प्रवास

छगन भुजबळ यांनी शिवेसेनेतून राजकारणाला सुरुवात केली. नगरसेवकपदापासून सुरुवात करत भुजबळांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले आहे. त्यानंतर भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडत शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपदही सांभाळले आहे. गेल्या वर्षी अजित पवार यांनी केलेल्या बंडात भुजबळ सहभागी झाले होते. त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या गळ्यात पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. Read AndSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *