बिजापूर: छत्तीसगडच्या सुकमा-बिजापूर जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या टेकलगुडेम गावात सीआरपीएफच्या कॅम्पवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले आहेत तर १४ जवान जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.सुकमा पोलिस ठाण्याअंतर्गत जगरगुंडा परिसरात नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी आणि या परिसरातील नागरिकांना मदत करण्यासाठी आज ३० जानेवारी रोजी सुरक्षा कॅम्प सुरू केला होता. कॅम्पनंतर सीआरपीएफचे जवान जोनागुडा-अलीगुडा परिसरात सर्च ऑपरेशन करत होते. या दरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनी गोळीबार केला. सीआरपीएफच्या जवानांनी आक्रमक उत्तर देण्यास सुरुवात केल्याने नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले आहेत तर १४ जण जखमी झालेत. जखमी जवानांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रायपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. याआधी गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी आधी नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. १३ डिंसबर रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूर येथे IED ब्लॉस्ट केला होता. ज्यात एक जवान शहीद झाला होता. तर एक जण जखमी झाला होता. हा हल्ला राजधानीत विष्णुदेव साय हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार त्याआधी झाला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *